मेष -चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून प्रथम भावात असेल. आजचा दिवस आनंदोस्तव साजरा करण्याचा आहे. आजचा दिवस शारीरिक व मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने चांगला जाईल. प्रत्येक काम यशस्वी होईल. घरातील वातावरण आनंदाचे असेल. स्त्रीयांना माहेरहून काही लाभ होऊन एखादी चांगली बातमी मिळेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे.
वृषभ - चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून बारावा भावात असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आपणास विविध चिंता सतावतील. प्रकृतीची साथ मिळणार नाही. स्नेही व नातलग ह्यांच्याशी मतभेद झाल्याने घरात विरोधी वातावरण निर्माण होईल. कामे अपूर्ण राहतील.
मिथुन - चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून लाभात भावात असेल. आजचा दिवस व्यापारी वर्गासाठी शुभ फलदायी आहे. व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल. मित्रांकडून लाभ होतील. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीमुळे आपल्याला पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे.
कर्क -चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दशमात भावात असेल. आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टीने लाभदायक आहे. वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. कामाच्या ठिकाणी आपले वर्चस्व वाढेल. बढतीची हमखास शक्यता आहे. कुटुंबात महत्वाच्या विषयावर चर्चा होईल.
सिंह - चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून भाग्यात भावात असेल. आज मंगल कार्यात आपल्या स्नेहीजनांसह सहभागी व्हाल. कर्तव्यनिष्ठ राहून हाती घेतलेले काम तडीस नेण्याचा प्रयत्न कराल. सर्व व्यवहार न्यायानुसार असेल. क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल.
कन्या - चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून अष्टमात भावात असेल. आज वाणीवर संयम ठेवावा लागेल. आज नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील. आज आपला आवेश व क्रोध वाढणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. स्नेही व कुटुंबीयांशी जोराचे वाद झाल्याने आपण दुःखी व्हाल. शक्यतो प्रवास टाळा. हितशत्रूपासून सावध राहा.
तूळ - चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सातवा भावात असेल. आज आपले मन मित्रांसह खाणे - पिणे, फिरावयास जाणे तसेच प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे आनंदी राहील. एखादी सहल संभवते. मनोरंजनाची साधने व वस्त्रालंकार यांची खरेदी होईल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. मान - सन्मान संभवतात.
वृश्चिक - चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सहावा भावात असेल. आज कौटुंबिक शांतीचे वातावरण आपले शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम ठेवू शकेल. नियोजित कामात यश मिळेल. नोकरीत सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. प्रतिस्पर्धी व शत्रूंवर मात करू शकाल. मातुल घराण्याकडून लाभ होईल. आर्थिक लाभ होईल. विशेष कामात खर्च होईल. आजारी व्यक्तिच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसेल.
धनू -चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून पाचवा भावात असेल. आज आपण संततीचा अभ्यास व स्वास्थ्य ह्यामुळे चिंतीत व्हाल. पोटाच्या तक्रारी सतावतील. कामातील अपयशाने आपण निराश व्हाल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. साहित्य, लेखन व कला ह्या विषयांची गोडी वाढेल. प्रिय व्यक्तीचा सहवास संस्मरणीय होईल. आज वाद - विवाद किंवा चर्चा ह्यात भाग घेऊ नका.
मकर - चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून चवथा भावात असेल. आज उत्साह व स्फूर्ती ह्यांचा अभाव असल्याने अस्वस्थता वाटेल. मनाला चिंता लागून राहील. कुटुंबियांशी मतभेद झाल्याने मन खिन्न होईल. वेळेवर भोजन व शांत झोप मिळणार नाही. स्त्रीवर्गा कडून काही नुकसान होईल किंवा काही कारणाने त्यांच्याशी मतभेद होतील. धन, खर्च व अपयश ह्या पासून सांभाळून राहावे लागेल.
कुंभ - चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून तिसरा भावात असेल. आज आपल्या मनावरील चिंतेचे ओझे कमी झल्याने मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्य सुद्धा उत्तम राहील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. विशेषतः भावंडांशी संबंधात गोडी निर्माण होईल. एखादा प्रवास संभवतो.
मीन -चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दुसरा भावात असेल. आज मनातून नकारात्मक विचार काढून टाकावे लागतील. वाद होण्याची शक्यता असल्याने रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल. खाण्या पिण्यावर संयम ठेवावा लागेल. आरोग्य मात्र नरम गरमच राहील.