मेष -चंद्र वृषभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी असेल. दिवसाची सुरवात द्विधा मनःस्थितीने होईल. इतरांशी वाद होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल. आपल्या गोड बोलण्याने इतरांची मने जिंकू शकाल. आज आपली मनःस्थिती दोलायमान असल्याने शक्यतो नवीन कार्याची सुरवात करू नये. दुपार नंतर उत्साहित व्हाल. कुटुंबियांशी सुसंवाद साधू शकाल. एखाद्या सहलीचे आयोजन यशस्वीपणे करू शकाल. आर्थिक नियोजन होऊ शकेल.
वृषभ -चंद्र वृषभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा आपला दिवस मध्यम फलदायी आहे. दिवसाच्या सुरवातीस शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. कलेस वाव मिळेल. दुपार नंतर मात्र द्विधा मनःस्थिती झाल्याने आपण महत्वाचे निर्णय घेऊ शकणार नाही.
मिथुन - चंद्र वृषभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. प्रकृती नरम गरम राहील. मन चिंताग्रस्त राहील. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. दुपार नंतर परिस्थितीत सुधारणा होईल. कामे होतील. उत्साह वाढेल. कौटुंबिक वातावरणात बदल होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
कर्क - चंद्र वृषभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस व्यापारासाठी लाभदायी आहे. एखाद्या सहलीचा बेत आखू शकाल. दुपार नंतर मात्र शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. डोळ्यांच्या विकाराचा त्रास सतावेल. कुटुंबातील व्यक्तींसाठी खर्च करावा लागेल. एखादा अपघात संभवतो.
सिंह -चंद्र वृषभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस नवीन कार्यारंभास शुभ फलदायी आहे. हाती घेतलेली कामे पूर्ण होतील. मित्र व स्नेह्यांकडून भेटवस्तू मिळतील. नवीन ओळखींचा भविष्यात व्यापारासाठी लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबीय व मित्रांच्या सहवासात दिवस आनंदात जाईल. प्राप्तीत वाढ होईल. छोटा पण आनंददायी प्रवास होईल.
कन्या -चंद्र वृषभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आपणास आपल्या व्यवसायात धनलाभ होईल. दूरवरचे प्रवास करू शकाल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. परदेशस्थ स्नेह्यांकडून एखादी चांगली बातमी मिळेल. दुपार नंतर नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. दिवसभर मनात सुखा- समाधानाची भावना राहील. नोकरीत मिळालेल्या बढतीमुळे लाभ होईल. सामाजिक मान - सन्मान मिळाल्याने मन प्रसन्न होईल.
तूळ - चंद्र वृषभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आळस व कामाचा व्याप ह्यामुळे मन व्याकुळ होईल. नियोजित वेळेत कार्य पूर्ण करू शकाल. प्रकृतीकडे लक्ष देण्याच्या दृष्टीने बाहेरील पदार्थ खाऊ नका. प्रवासात अडचणी येतील. पण दुपार नंतर मात्र परदेशस्थ मित्र व संबंधितांकडून काही चांगली बातमी आल्याने आपला आनंद द्विगुणित होईल. नवीन कार्यारंभाच्या दृष्टीने पण आजचा दिवस उत्साह वर्धक आहे. परदेशगमनाचे योग आहेत. व्यापारात लाभ होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक -चंद्र वृषभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी असेल. आज सकाळच्या वेळेत आपला शारीरिक उत्साह व मानसिक प्रसन्नता वाढेल. कुटुंबीय व मित्रांसह मेजवानीचा आनंद लुटाल. कामे अपूर्ण राहातील. प्रवासात अडचणी येतील. आध्यात्म आणि ईश्वरभक्ती ह्यामुळे आपणास मदत होईल.
धनू - चंद्र वृषभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस आनंदी व उत्साहवर्धक मानसिकतेत जाईल. आपल्या नियोजनानुसार कामे पूर्ण होतील. अपूर्ण कार्ये तडीस जातील. धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात गोडवा टिकून राहील. अचानक धनलाभ होईल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. व्यापार वृद्धी संभवते. परदेशस्थ नातेवाईकांकडून काही आनंददायी बातम्या येतील.
मकर - चंद्र वृषभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपणास कष्टाचे अपेक्षित फळ मिळण्याची शक्यता धूसरच आहे. तरी सुद्धा कामावरील आपली निष्ठा कमी होणार नाही. इतरांशी सौहार्दपूर्ण संबंध राहतील. प्रकृती उत्तम राहण्यासाठी बाहेरचे पदार्थ खाणे टाळा. दुपार नंतर अपुरी कामे पूर्ण होतील. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. एखादा आर्थिक लाभ संभवतो. स्त्रियांना माहेर कडून एखादी चांगली बातमी मिळू शकेल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकेल.
कुंभ - चंद्र वृषभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी असेल. विद्यार्थी, कलाकार व खेळाडू ह्यांच्यासाठी आजचा दिवस शुभ फलदायी आहे. पिता व शासनाकडून काही लाभ होऊ शकेल. खंबीर मनोबलामुळे कार्यपूर्ती होण्यात कोणतीही आडकाठी येणार नाही. पोटाच्या तक्रारी निर्माण होतील, सबब शक्यतो बाहेरचे खाणे- पिणे टाळा. लेखन- वाचन यांत गोडी वाढेल. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल.
मीन - चंद्र वृषभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस काल्पनिक विश्वात घालवाल. सृजनशीलतेला अचूक दिशा मिळेल. कुटुंबीय व मित्रांसह मेजवानीचा बेत ठरवू शकाल. दैनंदिन कामे आत्मविश्वास व एकाग्रचित्ताने पूर्ण करू शकाल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासाच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल आहे. संततीसाठी अनुकूल दिवस. पित्याकडून लाभ होईल.