महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

24 नोव्हेंबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आज रागावर संयम ठेवावा लागेल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य

राशीभविष्य
राशीभविष्य

By

Published : Nov 24, 2021, 12:03 AM IST

मेष - चंद्र मिथुन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी असेल. आजची सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल आहे. सरकारी लाभ होतील. व्यापार-व्यवसायात लाभ होतील. नोकरीत वरिष्ठ खुश होतील. आपल्या विचारात एकदम बदल होईल. दुपार नंतर मात्र मनाचा खंबीरपणा कमी होऊन मन विचारात गढून जाईल. अपघाताची शक्यता असल्याने जलाशया पासून दूर राहावे.

वृषभ -चंद्र मिथुन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस आपणाला मध्यम फलदायी आहे. मित्र व स्नेहीजनांच्या सहवासाने आपण आनंदित व्हाल. आज दिवसाचा बहुतांश वेळ आपण आर्थिक नियोजन करण्यासाठी द्याल.

मिथुन -चंद्र मिथुन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस आर्थिक लाभाचा आहे. आज आप्तेष्टांचा सहवास आनंददायी ठरेल. सुंदर वस्त्रे आणि उत्तम भोजनाचा लाभ होईल. मनात विविध प्रकारचे नकारात्मक विचार येतील, ते दूर सारणे हितावह राहील. व्यापार- व्यवसायात वातावरण अनुकूल असल्याने मन प्रसन्न राहील. दिवसभर मनात उत्साह आणि चैतन्य दरवळेल.

कर्क -चंद्र मिथुन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी असेल. आज प्राप्तीपेक्षा खर्चात वाढ होत असल्याचे जाणवेल. नेत्र विकार संभवतात. मानसिक चिंता वाढतील. आपल्या एखाद्या वक्तव्याने अडचणीत येऊ शकाल. दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील. मनातील नकारात्मक विचार काढून टाकल्यास, कौटुंबिक वातावरण आनंदी होऊ शकेल. आर्थिक लाभ संभवतात.

सिंह -चंद्र मिथुन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी असेल. आज आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आजचा दिवस आरोग्यास चांगला नाही. काही ना काही कारणाने मन चिंतीत होईल. कुटुंबियांशी कटुता निर्माण होईल. दुपार नंतर मात्र परिस्थितीत सुधारणा होईल. मन शांत होईल. कुटुंबियांच्या सहवासात रात्री भोजन घेऊ शकाल. आरोग्यात सुधारणा होईल. खर्च नियंत्रित ठेवावे लागतील.

कन्या -चंद्र मिथुन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी असेल. आज सकाळची वेळ आपणास आनंददायी व लाभदायी आहे. सार्वजनिक क्षेत्रात आपली प्रशंसा होईल. थकबाकी मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. दुपार नंतर मात्र परिस्थिती प्रतिकूल होईल. प्रकृतीच्या तक्रारी उदभवतील. वाद होण्याच्या शक्यतेमुळे बोलण्यावर संयम ठेवावा लागेल.

तूळ -चंद्र मिथुन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. नोकरी - व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल. नोकरीत पदोन्नती संभवते. शासकीय कामे सहजपणे होऊ शकतील. आपल्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. धनप्राप्ती संभवते. पत्नी व संतती संबंधित लाभ होतील. मित्रांच्या सहवासाने आनंद होईल. प्राप्तीत वाढ संभवते.

वृश्चिक -चंद्र मिथुन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज विरोधक व प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास प्रतिकूल राहील. संततीशी मतभेद संभवतात. दुपार नंतर सर्वांचा कल आपल्या विरुद्ध होईल. संततीची चिंता वाटेल. कौटुंबिक जीवन समाधानी राहील. शासकीय कामे पूर्ण होतील. नोकरी - व्यवसायात अनुकूलता लाभेल.

धनू -चंद्र मिथुन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी असेल. आज आपल्या संतापामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैनी वाढेल. नोकरी - व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य लाभू शकणार नाही. संततीच्या समस्येमुळे आपण चिंतीत व्हाल. प्रतिस्पर्धी व विरोधक ह्यांच्याशी वाद संभवतात. नवीन कार्यारंभात अडचणी निर्माण होतील. महत्वाचे निर्णय घेऊ शकणार नाही.

मकर -चंद्र मिथुन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी असेल. आज प्रिय व्यक्तीच्या सहवासात बाहेर फिरावयास व मेजवानीस जाऊन आपण आनंदित व्हाल. वाहनसौख्य व मान - सन्मान संभवतात. दुपार नंतर मात्र शारीरिक व मानसिक आरोग्याच्या तक्रारी उदभवण्याची शक्यता आहे. खर्चात वाढ होईल. काही ना काही कारणाने संताप वाढेल व त्यामुळे कुटुंबीय व सहकारी ह्यांचे मन दुखावेल. मनात नकारात्मक विचार थैमान घालतील.

कुंभ -चंद्र मिथुन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस कार्य सफलतेचा असून आपल्या कीर्तीत भर पडेल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. सामाजिक मान - सन्मानात वाढ होईल. दुपार नंतर एखाद्या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करून त्यात आप्तेष्टांना सहभागी करून घेऊ शकाल.

मीन -चंद्र मिथुन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी असेल. आजचा दिवस आनंददायी आहे. मित्रांच्या व प्रिय व्यक्तीच्या सहवासाचा आनंद घेऊ शकाल. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. घरातील वातावरण आनंदी राहील. दुपार नंतर एखादा आर्थिक लाभ संभवतो. काही कारणाने आपल्यातील रागीटपणा वाढेल. अशा वेळेस आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. विरोधकांवर मात करू शकाल. अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होतील.

ABOUT THE AUTHOR

...view details