महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

24 May Rashi Bhavishya : 'या' राशीवाल्यांना आज संतती विषयक समस्या निर्माण होतील; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य

Rashi Bhavishya 24 May Marathi
Rashi Bhavishya 24 May Marathi

By

Published : May 24, 2022, 12:08 AM IST

मेष -आज चंद्र रास बदलून कुंभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज मित्रांच्या सहवासात आपण आनदात वेळ घालवू शकाल. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. तसेच आपल्याला सुद्धा त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल. नवीन मित्रांमुळे भविष्यात लाभ होतील. संतती कडून सुद्धा फायदा होईल. निसर्गरम्य ठिकाणी सहलीस जाण्याचा बेत आखाल. सरकारी कामात यशस्वी व्हाल.

वृषभ - आज चंद्र रास बदलून कुंभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. नोकरी करणार्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल. वरिष्ठांची आपणावर मर्जी राहील. पदोन्नती पण मिळू शकेल. वैवाहिक जीवनात माधुर्य वाढेल. अपूर्ण कामे तडीस जातील. सरकारी लाभ मिळू शकतील.

मिथुन -आज चंद्र रास बदलून कुंभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आपणाला प्रतिकूलतेला तोंड द्यावे लागेल. आरोग्य बिघडल्याने कोणतेही काम करण्याचा उत्साह असणार नाही. नोकरी - व्यवसायात सहकारी व वरिष्ठांचे सहकार्य न मिळाल्याने मानसिक दृष्टया निराश व्हाल. संतती विषयक समस्या निर्माण होतील. विरोधकां बरोबर वाद - विवाद करणे उचित ठरणार नाही. वडिलांना त्रास होईल.

कर्क -आज चंद्र रास बदलून कुंभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आपल्यावर नकारात्मक विचारांचा पगडा राहील. संतापाचे प्रमाण वाढेल. आरोग्याच्या तक्रारी राहतील. अवैध काम व चोरी ह्या सारख्या विचारांवर ताबा ठेवा अन्यथा अरिष्ट येईल. वाणीवर पण नियंत्रण ठेवा. कुटुंबियांशी वादविवाद होण्याची शक्यता आहे. आर्थिक टंचाई जाणवेल. अशा वेळी मानसिक शांततेसाठी प्रयत्न करावेत.

सिंह -आज चंद्र रास बदलून कुंभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज पति - पत्नीत मतभेद होऊन कटुता निर्माण होईल. दोघां पैकी एकाचे स्वास्थ्य बिघडणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. सांसारिक किंवा इतर प्रश्नांमुळे मन उदास राहील. सामाजिक क्षेत्रात अपयशी व्हाल. भागीदारांशी सुद्धा मतभेद होऊ शकतात. कोर्ट - कचेरीपासून शक्यतो दूरच राहा.

कन्या -आज चंद्र रास बदलून कुंभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज नोकरी - व्यवसायात यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. सहकार्‍यांचे सहकार्य वाढेल. कुटुंबातील वातावरण सुखावह असेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभ होईल. आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल.

तूळ -आज चंद्र रास बदलून कुंभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आपली वैचारिक व मधुर वाणी लोकांना प्रभावित करेल व तसेच त्यामुळे इतर व्यक्तींशी संबंध दृढ होतील. चर्चा - वादविवाद ह्यात सुद्धा आपला प्रभाव राहील. कष्टाच्या मानाने यश संतोषजनक नसेल. कामात सांभाळूनच पुढे चला. आहाराकडे लक्ष द्या. अजीर्णाचा त्रास संभवतो. साहित्य, लेखन ह्यात गोडी निर्माण होईल.

वृश्चिक -आज चंद्र रास बदलून कुंभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज मित्रांशी सावधपणे वागावे लागेल. शारीरिक व मानसिक अस्वस्थता राहील. मातेचे स्वास्थ्य बिघडू शकते. धन व किर्तीची हानी होईल. कौटुंबिक वातावरण त्रासदायक राहील. मन प्रसन्न नसल्याने आज झोप सुद्धा होणार नाही.

धनू -आज चंद्र रास बदलून कुंभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस नव कार्यारंभास शुभ फलदायी आहे. भावंडांशी सलोखा वाढेल. तसेच कुटुंबीयांसह प्रवासाचे बेत ठरवाल. आरोग्य उत्तम राहील. नशिबाची साथ लाभेल. गूढ विषयांची गोडी वाटेल. आज कार्यसिद्धीचा दिवस आहे. सामाजिक मान - सन्मान होतील.

मकर - आज चंद्र रास बदलून कुंभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. कुटुंबियांशी गैरसमजातून मतभेदाचे प्रसंग घडल्याने मन दुःखी होईल. विनाकारण खर्च होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आज विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही. शेअर्स मध्ये गुंतवणूक करू शकाल. गृहिणी आज असंतुष्ट राहतील. शांती मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

कुंभ -आज चंद्र रास बदलून कुंभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस आपणास आर्थिक दृष्टया लाभदायी आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. मित्र व कुटुंबीय ह्यांच्यासह आनंदात दिवस घालवाल. प्रवास, सहल ह्यातून सुद्धा आज आनंद मिळवू शकता. आज विचारातील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करा.

मीन -आज चंद्र रास बदलून कुंभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. स्थावर संपत्ती व कोर्ट - कचेरी ह्यांच्या पासून आज शक्यतो दूर राहा. मनाच्या एकाग्रतेमुळे सर्व कामात फायदा होईल. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. स्वकीयांचा वियोग घडू शकतो. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. मिळणार्‍या फायदयात नुकसान होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. आर्थिक देवाण - घेवाणीचे निर्णय विचार पूर्वक घ्या. अपघात व गैरसमज ह्यापासून दूरच राहा.

ABOUT THE AUTHOR

...view details