मेष -चंद्र वृषभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी असेल. आज स्वतःबद्धलचे विचार बाजूला ठेवून इतरांचा विचार करावा लागेल. कुटुंबीयांसाठी काही विशेष काम व व्यवहार करावे लागतील. इतरांशी वाद व मतभेद टाळण्यासाठी आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. भोजन नेहेमीच्या वेळेस घेता येणार नाही. अतिरिक्त खर्च टाळण्यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक व्यवहार सावधपणे करावे लागतील.
वृषभ - चंद्र वृषभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आर्थिक व्यवहारांचे यशस्वीपणे नियोजन कराल. आर्थिक लाभ संभवतो. उत्साही मन व स्थिर विचारांमुळे सर्व कामे आपण व्यवस्थित पूर्ण करू शकाल. आज मनोरंजन, सौंदर्य प्रसाधने, अलंकार ह्यासाठी पैसा खर्च होईल. कुटुंबीयांसह आनंदात वेळ घालवू शकाल.
मिथुन -चंद्र वृषभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी असेल. आजचा दिवस कष्टदायी असल्याने प्रत्येक काम सावधपणे करावे लागेल. कुटुंबीय व संततीशी मतभेद संभवतात. आवेश व संतापावर नियंत्रण ठेवल्यास कामे बिघडणार नाहीत. शरीर प्रकृती बिघडेल. डोळ्यांचा त्रास जाणवेल. एखादा अपघात संभवतो. अचानकपणे खर्चात वाढ होईल. भाषा व व्यवहारात नम्रपणे वागावे लागेल.
कर्क - चंद्र वृषभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस उत्साहात व आनंदात जाईल. व्यापारात लाभ होईल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. मित्रांशी चर्चा झाल्याचा आनंद होईल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. रमणीय स्थळी सहलीचे बेत आखाल. पत्नी व संतती कडून सौख्य लाभेल. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल.
सिंह -चंद्र वृषभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी असेल. आज आपल्या कार्यक्षेत्रात आपले वर्चस्व राहील. वरिष्ठ आपल्या कामगिरीने प्रभावित होऊन आपणावर खूष होतील. दृढ मनोबल व खंबीर आत्मविश्वासामुळे आपले प्रत्येक काम यशस्वी होईल. वडिलांशी सौहार्दाचे संबंध राहतील व त्यांच्या कडून लाभ सुद्धा होईल. जमीन, वाहन, संपत्ती संबंधीत कार्य करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे.
कन्या -चंद्र वृषभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मनात चिंता राहील. शारीरिक स्फूर्तीचा अभाव जाणवेल. थकवा व अशक्तपणामुळे कामे धीम्या गतीने होतील. नोकरी - व्यवसायात सहकारी व अधिकारी नाराज होतील. संतती विषयक चिंता राहील. त्यांच्याशी मतभेद होतील. प्रतिस्पर्ध्यांच्या कारवाया वाढतील.