महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

23 सप्टेंबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आज कौटुंबिक जीवनात सुख - शांती लाभेल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य

23 सप्टेंबर राशीभविष्य
23 सप्टेंबर राशीभविष्य

By

Published : Sep 23, 2021, 12:03 AM IST

मेष -आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज ''कमी वेळात अधिक लाभ'' अशा एखाद्या योजनेत आपली फसवणूक होण्याची शक्यता असल्याने सावध राहावे लागेल. कोर्ट- कचेरीच्या प्रकरणात अडकू नका. आज कोणाला जामीन राहू नका. आज मनाची एकाग्रता कमी राहील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक देवाण - घेवाणीत लक्ष द्यावे लागेल. एखादी दुर्घटना संभवते. दुपार नंतर मात्र खूप खुशीत राहाल. घरात सुख- शांतीचे वातावरण राहील.

वृषभ - आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आज घर व संतती ह्यांच्याशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळेल. जुन्या परंतु बालपणीच्या मित्रांच्या सहवासाने मनाला आनंद होईल. नवीन मैत्री सुद्धा होईल. व्यावसायिक व आर्थिक लाभ होईल. तरीही दुपार नंतर सांभाळून राहावे लागेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. गुंतवणूक करताना सावधानी बाळगा. धार्मिक कार्यावर पैसा खर्च होईल. कोर्ट - कचेरीची प्रकरणे सांभाळून हाताळा.

मिथुन -आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. आजचा दिवस पूर्णतः अनुकूल व लाभदायी आहे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन झाल्याने आपला प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. व्यापारात उत्पन्न वाढेल व जुनी येणी वसूल होतील. वडील व वयस्कर यांच्या आशीर्वादाचा लाभ होईल. दुपार नंतर मित्रांकडून लाभ होईल. एखाद्या सामाजिक कार्यास हजेरी लावाल. अचानक धनलाभाची शक्यता आहे.

कर्क -आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आज वरिष्ठांशी वाद होण्याच्या शक्यतेमुळे उक्ती व कृती संयमित ठेवावी लागेल. शारीरिक अस्वास्थ्य व मानसिक चिंता राहील. व्यापारात विघ्ने येतील. दुपार नंतर मात्र व्यवसायात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. वरिष्ठ अधिकारी आपल्या कामामुळे संतुष्ट राहतील. आर्थिक दृष्टया लाभ होईल.

सिंह -आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज वाद होण्याची शक्यता असल्याने संताप व वाणी ह्यावर संयम ठेवावा लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आपल्या हातून एखादे सरकार विरोधी कृत्य घडण्याची शक्यता आहे. मानसिक व्यग्रता राहील. कुटुंबियांशी भांडणे होतील. शांतता लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल. वरिष्ठ व प्रतिस्पर्ध्यांशी शक्यतो वादविवाद करू नका. नकारात्मक विचारां पासून दूर राहा.

कन्या -आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आजचा सकाळचा वेळ मित्रांसोबत फिरणे, खाणे - पिणे व मनोरंजन ह्यात आनंदाने घालवाल. भागीदारांशी संबंध चांगले राहतील. दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल. प्रकृतीस त्रास संभवतो. एखाद्या आजारावर अचानकपणे खर्च करावा लागेल. त्याच बरोबर अचानक धनलाभ झाल्याने आपली काळजी काही प्रमाणात दूर होऊ शकेल.

तूळ -आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आज आपण दृढ मनोबल व आत्मविश्वासामुळे प्रत्येक कामात यशस्वी व्हाल. कौटुंबिक जीवनात सुख - शांती लाभेल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. स्वभाव उग्र बनेल. सबब वाणीवर नियंत्रण ठेवा. दुपार नंतर परिस्थितीत बदल होऊन आपण मनोरंजनाचा विचार कराल. मित्रांसोबत एखाद्या पर्यटनास जाऊ शकाल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल.

वृश्चिक - आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आजचा दिवस साहित्यिकांना अनुकूल आहे. आजचा दिवस विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. शेअर्स, लॉटरी यात लाभ होईल. खंबीर मन व आत्मविश्वास वाढेल. प्रकृती उत्तम राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. तरीही प्रत्येक कार्य शांतपणे करावे लागेल. व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल.

धनू -आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. आईच्या तब्बेतीत बिघाड व घरातील गढूळ वातावरण यामुळे आपल्या प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. आर्थीक नुकसान व मानहानी संभवते. दुपार नंतर मात्र मन विधायक कार्याकडे वळेल. प्रेमभावना वाढीस लागेल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस शुभ आहे.

मकर - आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा आहे. जोडीदाराशी संबंधातील गोडवा टिकून राहील. मित्रांसह एखाद्या सहलीचे आयोजन कराल. भावंडे व नातलगांशी चांगले संबंध राहतील. मान सम्मान वाढेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. दुपार नंतर एखाद्या दुर्घटनेमुळे मनःस्वास्थ्य बिघडेल. आईच्या तब्बेतीची काळजी राहील. व्यावसायिकांना व्यावसायिक चिंता भेडसावतील. घर किंवा स्थावर मालमत्ते संबंधीच्या कागदपत्रांवर विचारपूर्वक स्वाक्षरी करावी.

कुंभ -आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आज खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. तसेच संतापावर व जिभेवर ताबा ठेवावा लागेल. त्यामुळे कोणाशी कटुता येणार नाही व मनातून नकारात्मक विचार दूर होतील. दुपार नंतर विचारात स्थैर्य येईल. सृजनशील व कलात्मक गोष्टींकडे आपला कल राहील. घरातील वातावरण सुख- समाधानाचे राहील. कार्यात यश मिळू शकाल.

मीन -आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आज आपल्या घरी एखादे मंगल कार्य होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. कार्ये तडीस जातील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे लागेल. आजचा दिवस नवीन कामे हाती घेण्यास शुभ आहे. दुपार नंतर संतापी वृत्ती वाढीस लागेल. त्यामुळे उक्ती आणि कृतीवर संयम ठेवावा लागेल. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. आहाराची काळजी घ्यावी लागेल. मनात नकारात्मक विचार येतील.

ABOUT THE AUTHOR

...view details