महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

21 July Rashi Bhavishya : 'या' राशीवाल्यांना आज उच्च पद व मान- प्रतिष्ठा लाभेल; जाणून घ्या, आजचे राशीभविष्य - महाराष्ट्राचे राशिभविष्य

कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य

21 July Rashi Bhavishya
21 July Rashi Bhavishya

By

Published : Jul 21, 2022, 12:04 AM IST

मेष -आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कुटुंबीय, स्नेही व मित्रांसह एखाद्या स्नेहसंमेलनास उपस्थित राहाल. नवे कार्य हाती घेऊ शकाल. पण अती उत्साहाच्या भरात कामात बिघाड होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याकडे सुद्धा लक्ष द्यावे लागेल. धन प्राप्ती संभवते.

वृषभ - आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आजचा दिवस शारीरिक व मानसिक दृष्टया व्यस्त राहण्याचा आहे. एखाद्या काळजीमुळे मनावर ताण येऊन मन:स्वास्थ्य मिळू शकणार नाही. कष्टाच्या मानाने अपेक्षित प्राप्ती होणार नाही. त्यामुळे आर्थिक चिंता निर्माण होईल. पूर्ण विचार केल्या शिवाय कोणताही निर्णय आज घेऊ नये.

मिथुन -आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. पत्नी व संतती कडून फायदेशीर बातम्या मिळतील. मित्रांच्या भेटी आनंद देऊन जातील. व्यापारी वर्गाच्या प्राप्तीत भर पडेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळेल. स्त्री मित्रांकडून लाभ संभवतो. प्रवास आनंददायी होतील. स्वास्थ्य उत्तम राहील.

कर्क - आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. नोकरी - व्यवसाय करण्यार्‍यांना आजचा दिवस खूप लाभदायी आहे. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खूश होतील व त्यामुळे पदोन्नती होऊ शकते. घर सजावटीत आपण रस घ्याल. वाहनसौख्य मिळेल. सरकार कडून फायदा होईल. संसारिक सुखात वाढ होईल.

सिंह -आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. एखाद्या मंगलकार्यात हजेरी लावाल. न्यायी व्यवहार कराल. एखादा प्रवास ठरवाल. स्वास्थ्य साधारणच राहील. पोट दुखीचा त्रास संभवतो. संततीची काळजी राहील. शरीरास थकवा, आळस व विमनस्कता जाणवेल.

कन्या -आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज नवीन कामे सुरू केल्यास त्यात अडचणी येतील. बाहेरचे खाद्य पदार्थ खाऊन स्वास्थ्य बिघडू शकते. मन रागीट होईल, म्हणून बोलण्यावर ताबा ठेवावा लागेल. महत्वाचे निर्णय किंवा जोखिम ह्यापासून वाचण्यासाठी विल, विरासत इत्यादीत अडचणी निर्माण होऊ शकतात. हितशत्रूंचा त्रास संभवतो. गूढ व रहस्यमय गोष्टीत रूची राहील.

तूळ - आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस यशस्वितेचा व आनंदाचा आहे. सार्वजनिक जीवनाशी संबंधीत कार्यात यशस्वी व्हाल. आज आपल्यावर भिन्नलिंगी व्यक्तीचा प्रभाव राहील. मौजमजे साठी खर्च होईल. नवीन वस्त्रालंकार खरेदी कराल. व त्यांच्या वापरासाठी संधी सुद्धा मिळेल. आजचा दिवस प्रणयाराधनेसाठी अनुकूल आहे.

वृश्चिक - आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज घरातील वातावरण आनंदी राहील. आरोग्य उत्तम राहील. योग्य गोष्टींसाठी पैसा खर्च होईल. आजारी माणसांच्या आरोग्यात सुधारणा होईल. शत्रूवर मात करू शकाल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. भिन्नलिंगी व्यक्तींशी ओळखी होतील. स्त्रीयांना माहेरहून चांगली बातमी ऐकावयास मिळेल. धनलाभ होईल. कामे पूर्ण होतील.

धनू - आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज कार्यपूर्ती न झाल्याने नैराश्य येण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. संतती विषयक बाबींमुळे चिंता वाढतील. शक्यतो आज प्रवास टाळावेत.

मकर -आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. कुटुंबियांशी कटुता निर्माण झाल्याने मनाची बेचैनी वाढेल. भोजन अवेळी होऊ शकते. शांत झोप मिळणार नाही. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. जलाशया पासून सावध राहावे लागेल. एखादी धनहानी व मानहानी संभवते.

कुंभ - आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज आपण तना - मनाने प्रसन्न व्हाल. मनात असलेले चिंतेचे मळभ दूर होऊन उत्साह वाढेल. भाऊबंदांसह नवीन योजना ठरवाल. त्यांच्यासह आनंदात वेळ जाईल. लहान प्रवास होतील. मित्र व स्वजनांच्या सहवासाने आपले मन आनंदीत होईल. आपल्या कार्यक्षेत्रात कौशल्य पूर्वक उत्तम यश मिळवाल.

मीन -आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस आर्थिक नियोजन करण्यासाठी अनुकूल आहे. नियोजित कामे पूर्ण होतील. प्राप्तीत वाढ होईल. कुटुंबात सुख शांतीचे वातावरण असेल. उत्कृष्ट भोजन मिळेल. स्वास्थ्य ठीक राहील, तसेच मनाचे स्वास्थ्य सुद्धा आपण चांगले टिकवून ठेवाल.

ABOUT THE AUTHOR

...view details