मेष -आज चंद्र रास बदलून सिंह राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. शारीरिक थकवा जाणवेल. आज शक्यतो प्रवास टाळावा. हट्टीपणा सोडून द्यावा. पोटाच्या तक्रारी उदभवतील, तेव्हा प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. संततीची काळजी राहील. कामात यश लाभेल. कामाच्या धावपळीमुळे कुटुंबीयांसाठी वेळ देऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांच्याशी मतभेद होण्याची शक्यता आहे.
वृषभ -आज चंद्र रास बदलून सिंह राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. पैतृक संपत्ती पासून लाभ संभवतात.वडील आपणांशी खूप चांगल्या रीतीने वागतील. खेळाडू व कलाकारांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. त्यांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. संततीसाठी खर्च करावा लागेल.
मिथुन -आज चंद्र रास बदलून सिंह राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस आनंददायी आहे. भावंडे, मित्र, शेजारी ह्यांच्याशी संबंध चांगले राहतील. आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल. गुंतवणूक करताना विचारपूर्वकच पैसे गुंतवावेत. मनाच्या चंचलतेमुळे विचार सतत बदलतील. तन - मनाला स्फूर्ती लाभेल. नवीन कामाचा आरंभ करण्यास दिवस अनुकूल आहे. विरोधकांना नामोहरम करू शकाल. नशीबाची साथ लाभेल.
कर्क - आज चंद्र रास बदलून सिंह राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. मनात मरगळ राहील. केलेल्या कामाचे समाधान वाटणार नाही. प्रकृती ठीक राहणार नाही. उजव्या डोळ्याला त्रास होण्याची शक्यता आहे. कुटुंबात मतभेद होतील. मानसिक दृष्टीकोन नकारात्मक राहील. विद्यार्थ्यांना शिक्षणात अडचणी येतील. सर्व प्रकारच्या अवैध बाबींपासून दूर राहणे हितावह राहील. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.
सिंह -आज चंद्र रास बदलून सिंह राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आत्मविश्वास वाढेल. प्रत्येक काम दृढ विश्वासाने पूर्ण करू शकाल. सरकारी कामात यश मिळेल. वडील व वडीलधार्यांचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान होतील. उतावीळपणा सोडावा लागेल. काही कारणाने आपला संताप वाढेल. पोटदुखीचा त्रास संभवत असल्याने खाण्या - पिण्याकडे लक्ष द्यावे लागेल. पूर्ण दिवस आनंदात जाईल.
कन्या - आज चंद्र रास बदलून सिंह राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. दिवसभर शारीरिक व मानसिक चिंतेच्या दडपणाखाली राहाल. आज कोणाशीही अहंपणामुळे वाद होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. कोर्ट-कचेरी संबंधी कामात सावध राहावे लागेल. अचानकपणे खर्च उदभवतील. मित्रांचे गैरसमज होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागेल. मानसिक बेचैनी जाणवेल. तब्बेतीकडे लक्ष द्यावे लागेल. नोकरीत हाताखाली काम करणार्यां पासून सावध राहावे.