मेष -आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आपणास रागावर ताबा ठेवावा लागेल. अन्यथा आपल्या कामात बिघाड व संबंधात कटुता निर्माण होईल. मानसिक व्यग्रता व मनाची बेचैनी ह्यामुळे आपले कामात लक्ष लागणार नाही. प्रकृती नरमच राहील. एखाद्या मंगल प्रसंगी हजर राहण्याचे आमंत्रण मिळेल.
वृषभ - आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. शारीरिक दृष्टया अस्वस्थ असल्याने कामात सफलता मिळण्यास उशीर होईल व त्यामुळे निराश व्हाल. आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका. योग्य आहार घ्या. आज कामाचा व्याप वाढेल. शिथिलता राहील. प्रवासात विघ्ने येतील. एखाद्या कामाच्या मागे लागून सुख शांती गमावून बसण्याची शक्यता आहे.
मिथुन - आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक उत्साहामुळे प्रसन्नता लाभेल. मित्र व कुटुंबीयांसह प्रवास किंवा मेजवानीचा बेत ठरवाल. मनोरंजनाची सर्व साधने आज उपलब्ध होतील. भारी वस्त्रे, स्वादिष्ट भोजन व वाहन सुख मिळेल. भिन्नलिंगी व्यक्तीकडे आकर्षित व्हाल.
कर्क - आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस यशदायी व आनंददायी आहे. कुटुंबियांसह घरात सुखा - समाधानात दिवस घालवाल. नोकरदारांना लाभ होतील. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. आपल्या आधीन असणार्या व्यक्ती व सहकारी ह्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. प्रकृती उत्तम राहील.
सिंह -आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपणास लेखन व साहित्य क्षेत्रात काही नवनिर्मिती करण्याची प्रेरणा मिळेल. विद्यार्थी अभ्यासात चमकतील. प्रणयातील यश व प्रिय व्यक्तीशी झालेला सुसंवाद आपले मन आनंदित करेल. स्त्री वर्गाकडून अधिक सहकार्य मिळेल. शरीर प्रकृती उत्तम राहील. परोपकाराचे कार्य करण्यात धन्यता वाटेल.
कन्या - आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज प्रत्येक कार्यात प्रतिकूलतेचा अनुभव येईल. आरोग्य बिघडेल. मन चिंताग्रस्त राहील. कुटुंबियांशी पटणार नाही व त्यामुळे घरात शांतता नांदणार नाही. पाण्या पासून भीती आहे. सबब जलाशयाच्या ठिकाणी दुस्साहस करू नका. स्थावर मालमत्ता, वाहन इत्यादी संबंधीच्या कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी पूर्ण विचार करा.