महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

20 ऑक्टोबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आजचा दिवस व्यापारासाठी शुभ आहे; जाणून घ्या आजचे राशीभविष्य - horoscope for the day 20 october

कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य

20 ऑक्टोबर राशीभविष्य
20 ऑक्टोबर राशीभविष्य

By

Published : Oct 20, 2021, 12:02 AM IST

मेष - आज चंद्र मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज मनाची एकाग्रता कमी झाल्याने मनास दुःख होईल. मानसिक ताण जाणवेल. गुंवणूकीतून फारसा लाभ होणार नसल्याने आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी. महत्वाच्या कागदपत्रांच्या बाबतीत अधिक काळजी घ्यावी लागेल. दुपार नंतर कामाचा प्रारंभ सहजपणे होईल. कौटुंबिक वातावरणात सुधारणा होईल. धार्मिक कार्ये घडतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. मित्रांसह स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेता येईल.

वृषभ -आज चंद्र मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस व्यावहारिक कार्ये पूर्ण करण्याच्या दृष्टिने शुभ फलदायी आहे. मित्र व वडीलधार्‍यांचा सहवास लाभेल. नवे मित्र होतील व ती मैत्री दीर्घकाल टिकून राहील. संततीच्या प्रगतीमुळे मनाला आनंद मिळेल. प्रवास संभवतात. दुपार नंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. आप्तांवर खर्च होईल. त्यांच्याशी मतभेद सुद्धा होतील. धार्मिक कार्यांवर खर्च होईल. स्वभाव उदासीन होईल. कोर्ट- कचेरीच्या कामात सावध राहावे लागेल. आध्यात्मिक बाबींमध्ये सक्रीय होऊन त्यात आनंद मिळवू शकाल.

मिथुन - आज चंद्र मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस व्यापारासाठी शुभ फलदायी आहे. व्यापारी लोकांना व्यवसायवृद्धी बरोबरच यश मिळेल व येणी वसूल होतील. वडील आणि वडीलधार्‍यांकडून लाभ होईल. अर्थ प्राप्ती संभवते. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. त्यामुळे काही लाभ संभवतात. मित्रांकडून सुद्धा लाभ होतील. दुपार नंतर एखाद्या ठिकाणी सहलीस जाण्याचा बेत आखू शकाल. अचानक धनलाभ संभवतो.

कर्क -आज चंद्र मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजच्या दिवसाचा प्रारंभ मानसिक तणाव व बेचैनीने होईल. शारीरिक दृष्टया आळस व मरगळ जाणवेल. पोटाचा त्रास संभवतो. कोणत्याही कार्यात नशिबाची साथ लाभणार नाही. संतती विषयक चिंता वाढेल. दुपार नंतर मात्र मन प्रसन्न होऊन शारीरिक उत्साह वाढेल. व्यापारी येणी वसूल होतील. उच्च पद व मान- प्रतिष्ठा लाभेल.

सिंह - आज चंद्र मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आचार विचारांवर संयम ठेवून अवैध गोष्टींपासून दूर राहणे हितावह राहील. मानसिक व शारीरिक त्रास वाढतील. त्यामुळे प्रकृती बिघडेल. अचानक धनलाभ होईल. संतती विषयक चिंता वाढल्याने निरर्थक खर्च करावा लागेल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतो. नकारात्मक विचार दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.

कन्या -आज चंद्र मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज आपणास आपली कला सादर करण्याची संधी मिळेल. सामाजिक मान - सन्मान होतील. व्यवसायात भागीदारी करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. करमणुकीमुळे दिवस आनंदात जाईल. व्यापारी येणी वसूल होतील. दुपार नंतर प्रकृती नरम गरम होईल. अचानक लाभ संभवतात.

तूळ -आज चंद्र मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस आपल्यासाठी शुभ फलदायी आहे. कोणतेही कार्य खंबीर मनाने व आत्मविश्वासाने पूर्ण कराल. मन शांत ठेवा. घरातील वातावरण आनंददायी व शांत राहील. वाणीवर संयम ठेवावा लागेल. कलावंतांना आजचा दिवस शुभ आहे. कार्यनैपुण्य आणि कलेची जाण प्रदर्शीत करण्याची संधी मिळेल. मनोरंजक वातावरणात आपण आनंदात असाल व आप्तेष्टांना त्यात सहभागी करून घ्याल. प्रत्येक क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल.

वृश्चिक -आज चंद्र मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपल्यातील मानसिक हळवेपणा वाढेल. मानसिक समतोल साधावा लागेल. अभ्यास व कारकीर्द ह्या संबंधी कामात विद्यार्थ्यांना यश मिळेल. आपली कल्पनाशक्ती व साहित्य निर्मिती ह्यात नावीन्य दिसेल. घरात सुख - शांतीचे वातावरण राहील. व्यवसायात यशस्वी व्हाल. सहकारी पूर्ण सहकार्य करतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल.

धनू - आज चंद्र मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज कौटुंबिक शांतता राखण्यासाठी निरर्थक वाद - विवाद टाळणे हितावह होईल. आईची तब्बेत बिघडण्याची शक्यता आहे. धन व प्रतिष्ठेची हानी होण्याचा संभव आहे. दुपार नंतर स्वभावातील हळुवारपणा वाढेल. सृजनशक्तीत सकारात्मकता वाढेल. आजचा दिवस विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. स्नेहीजनांशी जवळीक वाढेल.

मकर - आज चंद्र मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दृढ व स्थिर विचार ह्यांना अग्रस्थान द्यावे लागेल. मित्र व प्रिय व्यक्तीच्या भेटीमुळे आनंद वाटेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. भावंडांशी जवळीक वाढेल. दुपार नंतर मात्र अप्रिय घटनांमुळे आपले मन अस्वस्थ होईल. शारीरिक दृष्टया स्फूर्ती वाटणार नाही. धन व प्रतिष्ठेची हानी होईल. स्थावर संपत्तीचे व्यवहार करताना सावध राहा. आईच्या तब्बेतीची काळजी घ्यावी लागेल.

कुंभ - आज चंद्र मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज वाद होऊन कटुता निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे राग व वाणी ह्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. मनात नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. खाण्या - पिण्यात संयम बाळगा. दुपार नंतर वैचारिक स्थैर्य लाभेल. तसेच हाती घेतलेले कार्य तडीस नेऊ शकाल. रचनात्मक व सृजनशील क्षेत्रात मान - सन्मान मिळू शकेल.

मीन -आज चंद्र मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहिल्याने आपण उत्साहित राहाल. नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबीयांसह वेळ आनंदात घालवाल. धार्मिक कार्यात खर्च होईल. प्रवास संभवतात. दुपार नंतर मात्र मनावर संयम ठेवा, अन्यथा कोणाशी वादविवाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. पैशाच्या देवाण- घेवाणीच्या व्यवहारात सावध राहावे लागेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

ABOUT THE AUTHOR

...view details