मेष -आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांत आपण प्रशंसेस पात्र ठराल. धनलाभाची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सुख व संतोष अनुभवू शकाल. बौद्धिक चर्चेत सहभागी व्हाल. वाणीवर संयम राखणे आवश्यक आहे. वैचारिक दृष्टया उत्साह वाटेल. एखाद्या व्यवहारातून अतिरिक्त लाभ होण्याची शक्यता आहे.
वृषभ -आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. वाणीच्या प्रभावाने इतरांना मंत्रमुग्ध करून लाभ मिळवाल. नवीन संबंध जुळण्याची शक्यता आहे. वैचारिक समृद्धी वाढेल व मन आनंदी रहील. शुभ कार्याची प्रेरणा मिळेल. कष्टाच्या मानाने फळ मात्र कमी मिळेल. तरीही निश्चयपूर्वक पुढे जात राहाल. आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस अनुकूल आहे.
मिथुन - आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपल्या मनात विविध विचार तरंग उमटतील. त्या विचारांत आपण गढून जाल. आज बौद्धिक कार्य कराल. मात्र वाद टाळावेत. आपण आज संवेदनशील व्हाल. आई व स्त्रियांशी संबंधित विषयात हळवे व्हाल. शक्यतो प्रवास टाळण्याचा प्रयत्न करावा. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. प्रवाही पदार्थां पासून सावध राहावे लागेल. मानसिक ताण राहील.
कर्क - आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक उत्साहा बरोबर घरातील वातावरणही आनंदी असेल. मित्र - स्नेहीजन ह्यांचा सहवास घडेल. मित्रांकडून लाभ होईल. मंगल कार्याची सुरूवात करायला आजचा दिवस अनुकूल आहे. कामातील यश व प्रिय व्यक्तीचा सहवास ह्यामुळे आपण आनंदी राहाल. आर्थिक लाभ संभवतो. नशिबाची साथ लाभेल. लहान सहलीस जाऊ शकाल. मान - सन्मान वाढतील.
सिंह - आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज विविध योजनांच्या विषयांवर अधिक विचार केल्यामुळे द्विधा अवस्था होईल. तरीही कुटुंबीयांसह चांगले वातावरण राहील्याने आपली प्रसन्नता वाढेल. दूरस्थ व्यक्ती किंवा संस्था यांच्या बरोबरचे संबंध दृढ होतील की ज्यामुळे भविष्यात फायदा होईल. अतिरिक्त खर्च संभवतात. निर्धारित कामात अपेक्षे प्रमाणे यश मिळणार नाही. एकंदरीत आजचा दिवस मध्यम आहे.
कन्या -आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. गोड बोलण्याने आपण आपले निर्धारित काम पूर्ण करू शकाल. प्रकृती उत्तम राहील. शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळावी. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. प्रवास संभवतो. वायफळ खर्च होतील. विद्यार्थ्यांना मात्र आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे.