मेष -आज नोकरीत वरिष्ठां बरोबर महत्वाच्या विषयावर चर्चा होऊन आपण आखलेल्या योजनेला सरकार कडून फायदा होईल. कार्यालयीन कामासाठी प्रवास घडतील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल व त्यात बदल करून वातावरण प्रसन्न बनवाल. व्यावहारिक दृष्टया विचार करूनच प्रत्येक कामाचा निर्णय घ्यावा. कामाच्या व्यापामुळे कामात दिरंगाई होईल. आईच्या प्रकृतीत सुधारणा होईल.
वृषभ -आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. व्यापारी आपल्या व्यापारात भांडवल घालून नवीन कामे सुरू करतील व भविष्यातील योजना ठरवतील. परदेशी प्रवास घडतील. एखाद्या प्रवासाने मन प्रसन्न झाले तरी सुद्धा प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. कामाचा व्याप वाढेल.
मिथून -आज अनियंत्रित रागाला लगाम घालावा लागेल. बदनामी व नकारात्मक विचारांपासून दूर राहणे हिताचे ठरेल. खर्च अधिक झाल्याने आर्थिक चणचण भासेल. कुटुंबीय व कार्यालयातील सहकारी यांच्याशी मतभेद किंवा वादविवादाचे प्रसंग येतील. त्यामुळे मन सुन्न राहील. आजारी व्यक्तीची नव्याने तपासणी किंवा शस्त्रक्रिया शक्यतो आज करू नका. मानसिक शांतीसाठी प्रयत्न करा.
कर्क -आजचा दिवस सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रांत आपणाला लाभदायक ठरेल. मौज - मजेची साधने, उत्तम दागीने व वाहन खरेदी होईल. मौज - मस्ती व मनोरंजनात वेळ खर्च होईल. तसेच भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास आपणास सुखद अनुभव देईल. दांपत्य जीवनात उत्कट प्रेमाचा अनुभव येईल. भागीदारीत फायदा होईल. सहलीची शक्यता आहे.
सिंह -आज उदासीन वृत्ती व संशयाचे काळे ढग आपल्या मनाला वेढून टाकतील. त्यामुळे मनःस्वास्थ्य लाभणार नाही. तरीही घरात शांततेचे वातावरण राहील. दैनंदिन कामात जरा अडचणी येतील. खूप परिश्रम कराल. वरिष्ठांशी वाद - विवाद टाळा.
कन्या -आजचा दिवस चिंता व उद्विग्नपूर्ण असून या ना त्या कारणाने काळजी वाढवेल. विशेषतः संतती व आरोग्य विषयक जास्त चिंता वाटेल. पोटाच्या तक्रारी राहतील. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनात अडचणी येतील. अचानक धनखर्च होईल. शेअर - सट्टा यांपासून दूर राहावे. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल.