मेष - चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दशमात भावात असेल. आजचा दिवस थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास व प्रवास ह्यासाठी उत्तम आहे. व्यापार विषयक कामासाठी दिवस लाभदायक आहे. घरात शुभ प्रसंगाचे नियोजन होईल. जुगार, शेअर्स यांत आज फायदा होईल. पत्नीच्या आरोग्या विषयी काळजी राहील.
वृषभ -चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशी पासून भाग्यात भावात असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. व्यवसायात नवीन विचार प्रणाली अंमलात आणाल. प्रकृतीकडे थोडे लक्ष द्यावे लागेल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. अचानकपणे एखाद्या संकटास सामोरे जावे लागेल. व्यापारात पैशाच्या देवाण- घेवाणीसाठी केलेला प्रवास लाभदायी ठरेल. नोकरीत बढती संभवते. संततीच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील. कौटुंबिक जीवन आनंदी राहील.
मिथून - चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशी पासून अष्टमात भावात असेल. आज आपल्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. मनातून नकारात्मक विचार काढून टाकल्याने नैराश्यातून बाहेर पडू शकाल. अवैध कामे करून अडचणीत सापडण्याचा शक्यतेमुळे त्यापासून दूर राहणे हितावह होईल. अचानकपणे प्रवास करावा लागेल. दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. नैराश्य दूर होऊ शकेल. लेखन वा साहित्यीक प्रवृत्ती मध्ये रस घ्याल. व्यापारात विकासाच्या दृष्टीने नव्या योजना अंमलात आणू शकाल. वरिष्ठांशी वाद संभवतात.
कर्क - चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सातवा भावात असेल. आज आपण एखाद्याशी भावनात्मक नात्याने जोडले जाल. आनंद व मनोरंजनात्मक प्रवृत्तीमुळे मन प्रफुल्लित राहील. त्यात मित्रांचे सहकार्य मिळाल्याने मनोरंजनाचा आनंद द्विगुणित होईल. दुपार नंतर तब्बेत बिघडू शकते. वाहन जपून चालवा व रागावर नियंत्रण ठेवा. शब्द जपून वापरा. नवीन कार्य सुरू करायला आजचा दिवस प्रतिकूल आहे.
सिंह - चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सहावा भावात असेल. आजचा दिवस व्यापार विस्ताराच्या दृष्टीने आर्थिक नियोजन करण्यास अनुकूल आहे. व्यावसायिकांना त्यांच्या हाताखाली असणार्या लोकांकडून व्यावसायिक लाभ होतील. धनप्राप्ती संभवते. व्याज, दलाली इत्यादी मार्गांनी प्राप्तीत वाढ होऊन आर्थिक विवंचना दूर होईल. चांगले कपडे, स्वादिष्ट भोजन ह्यामुळे मन प्रफुल्लित होईल. एखादा प्रवास संभवतो.
कन्या -चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशी पासून पाचवा भावात असेल. वस्त्र व अलंकारांची खरेदी आनंददायी राहील. कलेत विशेष आवड निर्माण होईल. व्यापारातील विकासामुळे मनास आनंद होईल. आजचा दिवस व्यवसायासाठी अनुकूल आहे. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.