मेष - आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. दिवसाच्या सुरुवातीला नवीन कार्यारंभ करण्यास आपण खूप उत्साहीत असाल. शारीरिक व मानसिक आरोग्य हा उत्साह द्विगुणित करेल. स्नेही, मित्र व कुटुंबीय ह्यांच्यासह एखाद्या स्नेहसंमेलनास जाऊ शकाल. दुपार नंतर मात्र काही कारणास्तव आपली प्रकृती नरम गरम होईल. आपल्या आहाराकडे लक्ष द्यावे लागेल. आर्थिक देवाण- घेवाणीत सुद्धा सावध राहावे लागेल. मनाच्या उदासीनतेमुळे नकारात्मक विचार येण्याची शक्यता आहे.
वृषभ -आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज कुटुंबियांशी आपण विचार - विनिमय करू शकाल. घराच्या नूतनीकरणासाठी काही तरतूद कराल. घरी मातेशी व नोकरीत वरिष्ठांशी संबंधातील सौहार्दता वाढेल. दुपार नंतर आपण सामाजिक कार्यात जास्त रस घ्याल. मित्रां कडून लाभ होईल. स्वकीयांशी संपर्क वाढून त्यांच्याशी संबंध सुधारतील. संतती कडून एखादा लाभ संभवतो. नवीन परिचयामुळे मन आनंदित होईल. अचानक धनलाभ संभवतो.
मिथुन - आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. व्यक्तिगत व व्यावसायिक क्षेत्रात आजचा दिवस फार चांगला जाईल. दोन्ही ठिकाणी महत्त्वाच्या विषयांवर चर्चेत सहभागी होऊ शकाल. कामाचा व्याप वाढून त्याचा आपल्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, दुपार नंतर प्रकृतीत सुधारणा होईल. मित्रांच्या भेटीने आनंद होईल. त्यांच्यासह सहलीला जाण्याचा बेत आखाल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.
कर्क - आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. आज कौटुंबिक व व्यावसायिक जीवन आनंदी राहील. ह्या दोन्ही ठिकाणी महत्वाच्या चर्चेत आपण सहभागी व्हाल. कामाचा व्याप वाढल्याने प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम होईल. दुपार नंतर प्रकृतीत सुधारणा होऊ लागेल. मित्र भेटीने आपण आनंदित व्हाल. त्यांच्यासह एखाद्या सहलीचे नियोजन करू शकाल. सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकाल.
सिंह - आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. दिवसाची सुरवात शारीरिक व मानसिक अस्वस्थतेने होईल. अती संतापाने इतरांची मने दुखवाल. दुपार नंतर प्रकृतीत सुधारणा होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नोकरीत वरिष्ठांशी महत्वाच्या चर्चेत सहभागी व्हाल.
कन्या - आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. इतरांशी वाद होऊ नयेत म्हणून आपली वाणी संयमित ठेवावी. प्रकृती नरम गरमच राहील. दुपार नंतर एखाद्या प्रवासाचे नियोजन करू शकाल. एखाद्या मंगल कार्यात सहभागी होऊ शकाल. गूढ विद्येची आवड निर्माण होईल.