मेष -आज चंद्र रास बदलून कन्या राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी आहे. धनलाभा बरोबरच दीर्घकालीन आर्थिक नियोजनही करू शकाल. व्यापार करीत असाल तर व्यापार विस्ताराची योजना तयार कराल. तन व मन एकदम ताजेतवाने राहील. आजचा दिवस मित्र व नातलगांसह आनंदात जाईल. जवळचा प्रवास होईल. आज हातून एखादे धार्मिक किंवा पुण्य कर्म होईल.
वृषभ -आज चंद्र रास बदलून कन्या राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपल्या बोलण्याच्या जादूने कोणी प्रभावीत होऊन आपला फायदा होईल. तसेच मधुर व सौम्य भाषणाने नवे संबंध प्रस्थापित व्हायला मदत होईल. मंगल कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. वाचन - लेखन ह्या सारख्या साहित्य प्रकारात अभिरुची वाढेल. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभू शकेल. पोटाच्या तक्रारीने त्रस्त व्हाल.
मिथुन - आज चंद्र रास बदलून कन्या राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. द्विधा अवस्थेतील आपले मन महत्वाचे निर्णय घेऊ शकणार नाही. वैचारिक वादळामुळे मानसिक अस्वस्थता अनुभवाल. अधिकतम हळवेपणा आपल्या दृढतेला कमकुवत करेल. पाणी तसेच इतर प्रवाही पदार्थां पासून सावध राहा. कुटुंब किंवा जमीन ह्या संबंधी विषयावर चर्चा किंवा प्रवास टाळा. शारीरिक व मानसिक स्वस्थतेचा अभाव राहील.
कर्क -आज चंद्र रास बदलून कन्या राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. शारीरिक व मानसिक उत्साहा बरोबर घरातील वातावरण सुद्धा आनंदी असेल. मित्र व स्नेहीजन ह्यांचा सहवास घडेल. मित्रां कडून लाभ होईल. मंगल कार्याची सुरूवात करायला आजचा दिवस अनुकूल आहे. कामातील यश व प्रियव्यक्तीचा सहवास ह्यामुळे आपण आनंदीत राहाल. आर्थिक लाभ होऊ शकेल. लहान सहलीस जाऊ शकाल. मान - सन्मान वाढेल.
सिंह -आज चंद्र रास बदलून कन्या राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस कुटुंबियासह सुखात घालवाल. त्यांचे सहकार्य मिळेल. स्त्री मित्रां कडून विशेष मदत प्राप्त होईल. दूरचे मित्र व स्नेही ह्यांच्याशी साधलेला संपर्क फायदेशीर ठरेल. आपल्या प्रभावी संभाषणाने लोकांचे लक्ष वेधून घ्याल. प्राप्ती पेक्षा खर्च जास्त होईल. उत्कृष्ट भोजन मिळेल. नियोजित कामात यश कमीच मिळेल.
कन्या -आज चंद्र रास बदलून कन्या राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आपले विचार समृद्ध होतील. आपल्या वाणीमुळे आपण फायदेशीर संबंध जुळवाल. व्यावसायिक दृष्टया आजचा दिवस लाभदायी आहे. प्रकृती उत्तम राहील. मन आनंदी राहील. आर्थिक लाभ होतील. सुख व आनंद मिळेल. चांगल्या बातम्या समजतील. आनंददायी प्रवास होईल. उत्तम वैवाहिक सुखाचा अनुभव घ्याल.