महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

18 ऑक्टोबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आज परदेशातून सुखद बातम्या येतील; जाणून घ्या आजचे राशीभविष्य - horoscope for the day 18 october

कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य

18 ऑक्टोबर राशीभविष्य
18 ऑक्टोबर राशीभविष्य

By

Published : Oct 18, 2021, 12:01 AM IST

मेष -चंद्र मीन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी असेल. आजचा दिवस अस्वास्थ्य व त्रासाचा आहे. ताप, सर्दी, खोकला ह्यांचा त्रास संभवतो. इतरांचे भले करण्याच्या नादात आपणावर संकटे कोसळतील. शक्यतो आज आर्थिक व्यवहार टाळावेत. तसेच कोणाला जामीन राहू नये. निर्णयशक्तीच्या अभावामुळे मनःस्थिती द्विधा होईल व त्यामुळे चिंता वाढतील. अधिक लाभाच्या हव्यासापोटी नुकसान होण्याची शक्यता आहे.

वृषभ -चंद्र मीन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. धनवृद्धी व पदोन्नती संभवते. व्यापारी सौदे यशस्वी होतील. कुटुंबीय व मित्रांसह आनंदाचे सुखद क्षण अनुभवू शकाल. एखादा प्रवास होऊन त्यातून काही लाभदायी नवीन संबंध प्रस्थापित होतील.

मिथुन -चंद्र मीन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी असेल. आज आपले प्रत्येक काम सुरळितपणे पार पडेल. घर, कार्यालय व सार्वजनिक ठिकाणी अनुकूल वातावरण राहिल्याने मनास प्रसन्न वाटेल. मान - सन्मान वाढतील. वरिष्ठांच्या सहकार्यामुळे आपल्या प्रगतीचा मार्ग रुंदावेल. कौटुंबिक जीवनात आनंद पसरेल. सांसारिक सुख उत्तम मिळेल. आज सरकारी कामात येणारे अडथळे दूर होऊन आपला मार्ग मोकळा होईल.

कर्क -चंद्र मीन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्या बरोबरच भाग्योदयाची संधी आपली प्रसन्नता वाढवेल. परदेशातून सुखद बातम्या येतील. मंगल कार्य, प्रवास ह्यामुळे आपल्या आनंदात भर पडेल. कुटुंबियांसह चांगल्या प्रकारे वेळ जाईल. परदेशगमनाची इच्छा बाळगणारे, तसेच नोकरदारांना लाभ होण्याची शक्यता आहे.

सिंह -चंद्र मीन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आपल्या प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आजारपणामुळे दवाखान्याचा खर्च वाढेल. राग व बोलणे ह्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबियांशी मतभेद होतील. बाहेरच्या खाण्या - पिण्यामुळे प्रकृती बिघडेल. आपल्या मनात नकारात्मक विचार येतील. अवैध कामात कोठेही सहभागी न होण्याविषयी दक्ष राहा. मनाला दिलासा मिळण्यासाठी प्रयत्न करावेत.

कन्या - चंद्र मीन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी असेल. आज सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांत लाभाबरोबरच प्रसिद्धी सुद्धा मिळेल. स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल. दांपत्य जीवनात परमोच्च सुखाचे क्षण अनुभवाल. नव्या वस्त्रालंकाराची खरेदी करून ते वापरण्याची संधी मिळेल. भिन्नलिंगी व्यक्तींशी परिचय होईल. त्यांच्याशी मैत्री जुळेल. आजचा दिवस भागीदारीसाठी अनुकूल आहे. प्रवास पर्यटनाची शक्यता आहे.

तूळ -चंद्र मीन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस अत्यंत लाभदायी आहे. नोकरीत यश मिळेल. घरातील वातावरण सुखद राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. कामाच्या ठिकाणी सहकारी चांगले सहकार्य करतील. मातुल घराण्याकडून चांगल्या बातम्या मिळतील. प्रकृती उत्तम राहील. बौद्धिक चर्चेत भाग घेण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. आजचा दिवस आर्थिक योजना बनविण्यासाठी अनुकूल आहे. परिश्रम प्रगति पथावर नेतील. संतती विषयक आनंददायी बातम्या समजतील. भिन्नलिंगी व्यक्तींचे आकर्षण राहील.

वृश्चिक -चंद्र मीन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आरोग्य विषयक थोडी तक्रार राहील. संततीची समस्या काळजीत टाकील. मानहानीची शक्यता आहे. शेअर - सट्टा यात न पडणे हिताचे राहील. शक्यतो प्रवासात जपून राहा. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. आर्थिक नियोजन यशस्वीरीत्या पूर्ण कराल.

धनू -चंद्र मीन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी असेल. आज शरीर व मनात उत्साहाचा अभाव राहील. मनावर चिंतेचे ओझे राहील. कौटुंबिक वातावरण कलुषित राहील. आईशी मतभेद होईल किंवा तिच्या प्रकृती संबंधी चिंता राहील. सार्वजनिक दृष्टया आपला मानभंग होऊ नये याकडे लक्ष द्या. वेळेवर जेवण व झोप न मिळाल्यामुळे स्वभाव चिडचिडा होईल. महत्वाची खरेदीपत्रे करू नका.

मकर - चंद्र मीन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी असेल. आज दैनंदिन कामात अनुकूलता लाभल्याने दिलासा मिळेल. कौटुंबिक जीवनातील अडचणी दूर होत असल्याचा प्रत्यय येईल. संपत्ती विषयक कामांचा निर्णय होईल. व्यापार - व्यवसायात आर्थिक लाभ होईल. भावंडांचे सहकार्य लाभेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. नवीन काम हाती घेण्यास दिवस अनुकूल आहे.

कुंभ -चंद्र मीन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी असेल. वाणीवर ताबा ठेवाल तर अनेक समस्यांपासून बचाव होईल. वाद - विवाद करताना जास्त खोलात जाऊ नका. अनावश्यक खर्चावर अंकुश ठेवा. कामात अल्प यश मिळेल. समाधानाची भावना अनुभवाल. पण आरोग्य बिघडेल. विद्यार्थ्यांना विद्या प्राप्तीत अडचणी येतील. आर्थिक नुकसानीची शक्यता आहे.

मीन -चंद्र मीन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपणास आनंद, उत्साह व प्रसन्नतेचा अनुभव येईल. नवीन कार्यारंभ लाभदायक ठरेल. मित्र व कुटुंबीय ह्यांच्यासह स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी मिळेल. प्रवास संभवतात. आर्थिक लाभ होईल. परोपकारी कार्यावर खर्च होईल. ठरवलेली कामे पूर्ण होतील. दांपत्य जीवनात सुख प्राप्ती होईल. कुटुंबात शांततेचे वातावरण पसरेल.

ABOUT THE AUTHOR

...view details