मेष -आज सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांत आपण प्रशंसेस पात्र ठराल. धनलाभ संभवतो. कौटुंबिक जीवनात सुख व संतोष अनुभवाल. बौद्धिक चर्चेत सहभागी व्हाल. वाणीवर संयम राखणे आवश्यक आहे. वैचारिक गोष्टीत उत्साह वाटेल. एखाद्या व्यवहारातून अधिक लाभ होण्याची शक्यता आहे.
वृषभ -आजचा दिवस आनंददायी आहे. कामात आघाडीवर राहाल व योजनेनुसार कार्य पूर्ण करू शकाल. अपूर्ण कामे यशस्वीरीत्या तडीस न्याल. कामाच्या ठिकाणी सहकारी अपेक्षित सहकार्य करतील. स्त्रीयांना माहेरहून एखादी सुखद बातमी मिळण्याची शक्यता आहे. मानसिक दृष्टया आनंदात राहाल. आरोग्य उत्तम राहील.
मिथुन -आज वैवाहिक जोडीदार व संतती ह्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. शक्यतो वाद - विवाद व बौद्धिक चर्चे पासून दूर राहावे. मानहानी संभवते. मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. पोटाच्या तक्रारी त्रास देतील. नव्या कार्याचा आरंभ करण्यात अडचण येण्याची शक्यता आहे. प्रवासात त्रास संभवतो.
कर्क -आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आज आनंद व उत्साह यांचा अभाव राहील. मन चिंतेने ग्रासलेले व अशांत राहील. घरात भांडणाचे वातावरण असेल. आप्तांबरोबर मतभेद होऊ शकतात. स्त्रियांबरोबर सुद्धा मतभेद व तणाव राहील. पैसा खर्च होईल. अपयश मिळेल. झोपही शांत मिळणार नाही. एखादी मानहानी संभवते.
सिंह -आजचा दिवस सुखा समाधानात जाईल. भावंडा बरोबरच्या संबंधात जवळीक निर्माण होईल. त्यांचे सहकार्य पण आपणास मिळेल. संबंधां मधील भावनांची जाणीव आपणाला होईल. एखाद्या रम्य स्थळी सहलीला जाण्याचा बेत ठरवू शकाल. मानसिक चिंता दूर होतील. कार्यात यशस्वी व्हाल.
कन्या -आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपल्या गोड बोलण्याने कोणाचेही मन जिंकू शकाल. कामे सफल होण्याची जास्त शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. त्यांच्यासह दिवस आनंदात जाईल. आर्थिक लाभ संभवतात. आरोग्य उत्तम राहील. प्रवासाचे बेत ठरतील. बौद्धिक चर्चेत सहभागी होण्याची संधी मिळेल, मात्र त्यात संभाव्य वाद टाळावे लागतील. स्वादिष्ट बोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. आयात - निर्यात संबंधित व्यापारात यश प्राप्ती होईल.