महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

18 August Rashi Bhavishya या राशीवाल्यांनी आज गैरसमजापासून जपून राहावे, जाणून घ्या, आजचे राशीभविष्य - महाराष्ट्राचे राशिभविष्य

कसा असेल तुमचा दिवस अभ्यास प्रेम लग्न व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का मुलांना अभ्यास करावा वाटत नाही काय करावे येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी ईटीव्ही भारतवर वाचा आजचे राशीभविष्य

18 August Rashi Bhavishya
18 August Rashi Bhavishya

By

Published : Aug 18, 2022, 12:04 AM IST

मेष - चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून प्रथम भावात असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. सगळ्या कामात यश मिळाल्याने आपण खूप आनंदी व प्रसन्न व्हाल. आर्थिक लाभ सुद्धा होईल. मित्र व सगे सोयरे ह्यांच्या भेटीने घरातील वातावरण आनंदी होईल. उत्तम कपडे व भोजन प्राप्ती होईल. मित्र व शुभेच्छुक ह्यांच्या कडून भेटवस्तू मिळाल्याने आपण आनंदित व्हाल.

वृषभ - चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून बारावा भावात असेल. आज सावध राहावे लागेल. आपले मन अनेक प्रकारच्या चिंतांनी व्यग्र असेल. स्वास्थ्यही जरा नरमच राहील. विशेषतः डोळ्यांचा त्रास संभवतो. स्नेही व कुटुंबीय ह्यांच्याशी मतभेद झाल्याने आपण दुःखी व्हाल. आपण सुरू केलेले काम अपूर्ण राहील. खर्च वाढेल. कष्टाचे योग्य फळ न मिळाल्याने मन निराश होईल. अविचाराने घेतलेल्या निर्णयाने गैरसमज निर्माण होतील.

मिथुन -चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून लाभात भावात असेल. आज विविध मार्गांनी लाभ झाल्यामुळे हर्षोल्हास वाढेल. पत्नी व संतती कडून फायदेशीर बातमी मिळेल. मित्रांशी संवाद साधल्याने आनंद मिळेल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळेल. सुग्रास भोजनाचा आस्वाद घेता येईल.

कर्क -चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दशमात भावात असेल. आज नोकरीत वरिष्ठांच्या प्रोत्साहनाने आपला उत्साह द्विगुणित होईल. पगारवाढ किंवा पदोन्नती झाल्यास आश्चर्य वाटायला नको. आई तसेच इतर कुटुंबीय ह्यांच्याशी सौहार्दाचे संबंध राहतील. मान - प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल. स्वास्थ्य उत्तम राहील. सरकारी कामात अनुकूलता लाभेल.

सिंह -चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून भाग्यात भावात असेल. आज आळस, थकवा व ऊबग आपल्या कामाचा वेग कमी करतील. पोटाच्या तक्रारी मुळे अस्वस्थता अनुभवाल. नोकरी - व्यवसायात विघ्न संतोषी लोकांमुळे प्रगतीत अडथळा येईल. वरिष्ठांशी मतभेद होतील. रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मांगलिक कार्य किंवा प्रवास ह्यामुळे मनाची अशांती दूर होईल.

कन्या -चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून अष्टमात भावात असेल. आज 'मनावर संयम ठेवावा लागेल. स्वभावांतील उग्रतेमुळे मतभेद होण्याची शक्यता आहे. हितशत्रू विघ्न उपस्थित करतील. नवीन कार्यारंभ लांबणीवर टाका. जलाशया पासून दूर राहा. खर्च खूप होईल. गूढ विद्या व रहस्य ह्यांची गोडी लागेल.

तूळ -चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सातवा भावात असेल. आज दैनंदिन कामाच्या व्यापातून जरा हलके वाटावे म्हणून आपण मेजवानी, सिनेमा किंवा पर्यटन ह्यांची योजना आखून मित्रांना आमंत्रित कराल. भिन्नालिंगी किंवा प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे आपणास खूप आनंद होईल. नवीन वस्त्रालंकारांची खरेदी किंवा परिधान करण्याची संधी मिळेल. सार्वजनिक मान - सन्मान प्राप्त होईल. वैवाहिक जोडीदाराच्या प्रेमाची उब व सहवास ह्यामुळे आपण आनंदित व्हाल.

वृश्चिक -चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सहावा भावात असेल. आजचा दिवस सौख्यदायी आहे. कुटुंबीयांसह आनंदात वेळ घालवू शकाल. शारीरिक स्वास्थ्य व मानसिक प्रसन्नता अनुभवाल. नोकरीत सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. स्त्रीयांना माहेरहून एखादी चांगली बातमी मिळेल. धनलाभ होईल. अपूर्ण कामे तडीस जातील.

धनू -चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून पाचवा भावात असेल. आज आपण संततीचा अभ्यास व स्वास्थ्य ह्यामुळे चिंतीत व्हाल. पोटाच्या तक्रारी सतावतील. कामातील अपयशाने आपण निराश व्हाल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. साहित्य, लेखन व कला ह्या विषयांची गोडी वाढेल. प्रिय व्यक्तीचा सहवास संस्मरणीय होईल. आज वाद - विवाद किंवा चर्चा ह्यात भाग घेऊ नका.

मकर - चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून चवथा भावात असेल. आज उत्साह व स्फूर्ती ह्यांचा अभाव असल्याने अस्वस्थता वाटेल. मनाला चिंता लागून राहील. कुटुंबियांशी मतभेद झाल्याने मन खिन्न होईल. वेळेवर भोजन व शांत झोप मिळणार नाही. स्त्रीवर्गा कडून काही नुकसान होईल किंवा काही कारणाने त्यांच्याशी मतभेद होतील. धन, खर्च व अपयश ह्या पासून सांभाळून राहावे लागेल.

कुंभ -चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून तिसरा भावात असेल. आज आपणास मोकळेपणा जाणवेल. शारीरिक स्वास्थ्य आपला उत्साह वाढवेल. शेजारी व भावंडांशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित होतील. स्नेहीजन घरी आल्याने आनंद वाटेल. प्रवासाची शक्यता आहे.

मीन - चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दुसरा भावात असेल. आज खर्च, संताप व जीभ यावर संयम ठेवावा लागेल. कोणाशी भांडण होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार व पैश्यांच्या देवाण - घेवाणीत सावध राहावे. कुटुंबियांशी भांडण होईल. नकारात्मक विचार मनावर छाप पाडतील. ते दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. खाण्या - पिण्याच्या बेपर्वाहीमुळे आरोग्य खराब होण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details