मेष - आज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपणाला अतिशय संवेदनशीलता जाणवेल. आज आपल्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. घर, जमीन इत्यादींशी संबंधित व्यवहार शक्यतो आज करू नयेत. एखाद्या अपघाताची शक्यता असल्याने जलाशया पासून दूर राहावे. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी मध्यम फलदायी आहे.
वृषभ - आज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज आपण अती संवेदनशीलतेमुळे व भावूक विचारांमुळे खूप हळवे व्हाल. आपली व इतरां विषयीची काळजी दूर झाल्यामुळे मनाला दिलासा मिळेल. कल्पनाशक्ति व सृजनशीलतेने काम कराल. कुटुंबीय व मित्रांसह स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. अचानकपणे प्रवास करावा लागेल. पैशा विषयी दक्ष राहून आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल.
मिथुन - आज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज नातलग व मित्रांशी संवाद साधल्याने आपण आनंदित व्हाल. सुरवातीस आर्थिक नियोजनात काही अडचणी येतील. पण नंतर सहजपणे ते काम पार पाडू शकाल. महत्वाच्या कामाची सुरुवात उशीरा होईल पण नंतर मात्र सहजगत्या ती पार पडतील. त्यामुळे मनःशांती अनुभवू शकाल. नोकरी - व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकेल.
कर्क -आज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपल्या मनात प्रेमालापाचे तरंग उमटतील. दिवसभर त्याच मनःस्थितीत आपण राहाल. मित्र, स्वकीय व संबंधितांकडून भेट वस्तू मिळतील. त्यांच्यासह आपण आपला दिवस आनंदात घालवाल. प्रवास, मनपसंत भोजन व प्रिय व्यक्तीचा सहवास ह्यामुळे प्रफुल्लित राहाल. पत्नीच्या सहवासात मन प्रसन्न राहील.
सिंह - आज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज कोर्ट - कचेरीच्या प्रश्नात सावध राहावे लागेल. आज मनात भावनांचा कल्लोळ उठेल. त्यामुळे हातून काही अवैध कृत्य घडण्याची शक्यता आहे. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. उक्ती व कृती ह्यात समतोल साधावा लागेल. विदेशातून एखादी आनंददायी बातमी येईल. कायदेशीर गोष्टींचा निर्णय विचार पूर्वक घ्यावा.
कन्या -आज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. मित्रांसह एखादा आनंददायी प्रवास होईल. दांपत्य जीवनात जादा जवळीक निर्माण होईल. स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल. धनप्राप्ती साठी आजचा दिवस अनुकूल आहे. व्यापारातील पैसे मिळविण्यासाठी प्रवास करावा लागेल. अविवाहितांना जोडीदाराच्या शोध मोहीमेत यश मिळेल.