महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

16 ऑक्टोबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आज कार्यारंभ करण्यासाठी अनुकूलता लाभेल! - horoscope for the day 16 october

कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य

16 ऑक्टोबर राशीभविष्य
16 ऑक्टोबर राशीभविष्य

By

Published : Oct 16, 2021, 12:03 AM IST

Updated : Oct 16, 2021, 5:49 AM IST

मेष -आज चंद्र रास बदलून कुंभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. वडीलधारी व स्नेहीजन ह्यांच्याशी संपर्क होऊन काही व्यवहार वाढतील. एखाद्या रम्य स्थळी सहलीस जाण्याचा बेत आखू शकाल. अचानक धनलाभ संभवतो. संतती कडून एखाद्या लाभाची अपेक्षा बाळगू शकता.

वृषभ -आज चंद्र रास बदलून कुंभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. नवीन कामाच्या योजना यशस्वीपणे आखू शकाल. नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. अपूर्ण कामे तडीस जातील. बढती मिळून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. घरात वर्चस्व राहील व आपलेपणा वाढेल.

मिथुन -आज चंद्र रास बदलून कुंभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा असल्याने आपल्या कामास विलंब होईल. शरीरात स्फूर्ती व मनात उत्साह असणार नाही. पोटाचे विकार सतावतील. नोकरीत वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. राजकीय अडचणी व्यत्यय आणतील. महत्वाचे काम किंवा निर्णय आज स्थगित ठेवणे हिताचे राहील. संततीशी मतभेद होतील. प्रतिस्पर्धी व विरोधक ह्यांचा त्रास होईल.

कर्क -आज चंद्र रास बदलून कुंभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आपल्या मनातील नकारात्मकता नैराश्य निर्माण करेल. बाहेरील पदार्थांच्या खाण्या पिण्यामुळे आरोग्य बिघडेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबियांशी भांडण होईल. नवे संबंध त्रासदायक ठरतील. आर्थिक चणचण भासेल. एखादी दुर्घटना किंवा शस्त्रक्रिया संभवते. मनाला शांतात लाभण्यासाठी प्रयत्न करावेत.

सिंह -आज चंद्र रास बदलून कुंभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज पती - पत्नीत किरकोळ कारणांनी खटका उडून मतभेद होतील. जोडीदाराच्या प्रकृतीची चिंता राहील. प्रापंचिक गोष्टींबाबत उदासीन राहाल. सार्वजनिक जीवनात अपयश किंवा मानभंग होण्याची शक्यता आहे. भागीदारांशी मतभेद होतील. भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास त्रासदायक ठरेल. कोर्ट - कचेरीतील प्रश्न सुटायला विलंब होईल.

कन्या - आज चंद्र रास बदलून कुंभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज आपणास शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभेल. कुटुंबातील शांती - सुखाचे वातावरण मनाला प्रसन्नता देईल. आर्थिक लाभ व कामात यश मिळेल. आजारातून मुक्त व्हाल. नोकरीत फायदा होईल. आपल्या हाता खालचे कर्मचारी व सहकारी यांचे सहकार्य मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल.

तूळ -आज चंद्र रास बदलून कुंभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज कल्पनाशक्ती व सृजनशक्ती यांचा चांगला उपयोग आपण कराल. संततीची प्रगती होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी ठरेल. तन व मन तरतरी व स्फूर्तीचा अनुभव घेईल. विचारांचा अतिरेक मन विचलित करेल. आज एखाद्याशी बौद्धिक चर्चा किंवा वादविवादाची संधी येईल पण त्यात फार खोलात उतरू नका.

वृश्चिक -आज चंद्र रास बदलून कुंभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक दृष्टया भीतीचा अनुभव आपण घ्याल. आज कोणती ना कोणती चिंता सतावेलच. कुटुंबीय, नातलग व संबंधित यांच्याशी पटणार नाही. आईची प्रकुती बिघडेल. जमीन, वाहन इत्यादींच्या खरेदीपत्रा बद्दल सावध राहा.

धनू -आज चंद्र रास बदलून कुंभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज आपणास एखाद्या गूढ विद्येचे आकर्षण वाटेल. भावंडांशी चांगले संबंध राहतील. नवीन कार्यारंभ करण्यासाठी अनुकूलता लाभेल. मित्रमंडळींशी संपर्क होऊ शकेल. कामात यश मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. एखादा प्रवास संभवतो. नशिबाची साथ मिळेल. सामाजिक मान - सन्मान संभवतात.

मकर - आज चंद्र रास बदलून कुंभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज आपली उक्ती व कृती यावर संयम ठेवावा लागेल. कुटुंबियांशी मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. शेअर - सट्टा बाजार यात गुंतवणूक कराल. आर्थिक लाभ होईल. प्रकृतीच्या काही तक्रारी उदभवतील. डोळ्यांचा त्रास जाणवेल. नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने लाभ होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष केंद्रित करावे लागेल.

कुंभ -आज चंद्र रास बदलून कुंभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपण शारीरिक व मानसिक दृष्टया प्रफुल्लित राहाल. नातलग, मित्र, कुटुंबीय यांच्यासह घरात उत्सवाचे वातावरण राहील. स्वादिष्ट भोजन मिळेल. पर्यटनाचा बेत आखाल. आर्थिक दृष्टया आजचा दिवस लाभदायी आहे. गूढ विषयांची गोडी लागेल.

मीन -आज चंद्र रास बदलून कुंभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज आर्थिक नियोजन व गुंतवणूक करताना खूप दक्ष राहावे लागेल. एकाग्रता कमी असल्याने आपण बेचैन राहाल. मंगल कार्यावर खर्च होईल. मित्र - स्वकीयांशी मतभेद होतील. लालसा नुकसान करेल. जामीन किंवा कोर्ट - कचेरी प्रकरणात न पडणे अधिक चांगले ठरेल.

Last Updated : Oct 16, 2021, 5:49 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details