मेष - आज चंद्र मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आजचा दिवस अत्यंत सावधपणे घालवा. सर्दी, खोकला व ताप यामुळे प्रकृती बिघडेल. स्वकीयांचा वियोग होईल. परोपकारात धनाची लूट होण्याची परिस्थिती निर्माण होईल. सबब सांभाळून राहा. मानसिक बेचैनी राहील. मांगलिक व सामाजिक कार्यावर पैसा खर्च करावा लागेल.
वृषभ - आज चंद्र मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज अयोग्य ठिकाणी पैशाची गुंतवणूक होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. कुटुंबात सुख व शांती राहील. कुटुंबीय व मित्रांसह आनंदात वेळ घालवाल. उत्पन्नात व व्यापार - व्यवसायात वाढ होईल. रम्य स्थळी पर्यटनाला जाण्याचा बेत आखाल. स्त्री वर्गाकडून लाभ होईल. त्यांच्याकडून आदर मिळेल. व्यापारात ओळख व संपर्क यांमुळे लाभ होईल. संतती व पत्नी यांच्याकडून चांगल्या बातम्या मिळतील. दांपत्यसुख उत्तम मिळेल.
मिथुन - आज चंद्र मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल. प्राप्तीत वाढ होईल. मित्रांच्या भेटीतून आनंद मिळेल व फायदा सुद्धा होईल. संतती कडून लाभ होऊ शकतो. उत्तम भोजन मिळेल. संतती कडून एखादी चांगली बातमी मिळेल. नोकरी - व्यवसायात प्राप्ती वाढेल.
कर्क - आज चंद्र मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आरामदायी दिवस आहे. प्रत्येक काम सहज पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठ खूश असतील. बढती मिळू शकते. वरिष्ठांशी महत्वपूर्ण चर्चा होतील. तसेच कुटुंबियांसह सुद्धा मनमोकळी चर्चा होईल. गृहसजावटी संदर्भात नवीन काही योजना आखाल. कामासाठी प्रवास करावा लागेल. मातुल घराण्याशी संबंध दृढ होतील. आरोग्य उत्तम राहील. तसेच सरकार कडून ही फायदा संभवतो.
सिंह - आज चंद्र मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. ठरविलेल्या कामाकडे लक्ष द्यावे लागेल. धार्मिक किंवा मंगल कार्यात आपणास सहभागी व्हावे लागेल. प्रवास संभवतात. आज आपला संताप वाढल्याने आपले मन अशांत होईल. संतती विषयक काळजी निर्माण होईल. आज व्यवसायात अडथळा येईल. परदेशातील आप्तांकडून खुषालीची बातमी मिळेल.
कन्या - आज चंद्र मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज नवीन कामाची सुरूवात न करणे हितावह राहील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. बाहेरचे खाणे - पिणे टाळावे लागेल. आज आपला स्वभाव चिडचिडा झाल्याने बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. खूप खर्च होईल. पाण्या पासून जपून राहावे लागेल. सरकार विरोधी कृत्ये, भांडणे ह्यापासून शक्य तितके दूर राहावे.