मेष -चंद्र कर्क राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी असेल. आजचा दिवस सावध राहण्याचा असून प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागेल. एखाद्या व्यक्तीशी तीव्र मतभेद संभवतात. शारीरिक व मानसिक दृष्टया त्रस्त व्हाल. निद्रानाश झाल्यामुळे आरोग्यावर ताण येईल. बौद्धिक चर्चेत सहभागी झाल्याने आनंदित व्हाल, मात्र त्यात वाद निर्माण होणार नाहीत ह्याची दक्षता घ्यावी लागेल. प्रवासात त्रास संभवतो.
वृषभ -चंद्र कर्क राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी असेल. आज आपण भावनेच्या बंधनात गुंतण्याची शक्यता आहे. कामे पूर्ण झाल्याने आनंदाचे प्रमाण वाढेल. भावंडांकडून लाभ होईल. शारीरिक व मानसिक दृष्टया ताजेतवाने राहाल. आर्थिक लाभ संभवतात. परंतु दुपार नंतर परिस्थितीत एकदम बदल होईल. खर्च वाढेल व कामात यशप्राप्ती होणे कठीण होऊन बसेल.
मिथुन -चंद्र कर्क राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी असेल. आज मनातील नकारात्मक विचार काढून टाकावे लागतील.मनात असंतोष वाढेल. कौटुंबिक वातावरण गढूळ होईल. शारीरिक स्वास्थ्य पण मिळणार नाही. वाचन- लेखनात विद्यार्थ्यांचे मन लागणार नाही. दुपार नंतर मात्र मन प्रसन्न राहील. तरीही नवीन कार्याचा आरंभ करण्याचे धाडस करू नका. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. स्वकीयांच्या सहवासामुळे मन आनंदीत होईल. प्रवास आनंददायी होतील.
कर्क - चंद्र कर्क राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. मित्र व स्नेहीजनांच्या सहवासाने आपण आनंदित व्हाल. दुपार नंतर मात्र कुटुंबियांशी एखादा वाद होण्याची शक्यता आहे. मन दुःखी होईल. आपल्या मनात नकारात्मक विचार येऊन नैराश्य येण्याची शक्यता आहे.
सिंह -चंद्र कर्क राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी असेल. आपल्या वक्तव्याने गैरसमज होण्याची किंवा एखादी व्यक्ती दुखावली जाण्याची शक्यता असल्याने आपणास संयमित राहावे लागेल. अपेक्षेहून अधिक खर्च होईल. मानसिक चिंता वाढतील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. दुपार नंतर परिस्थितीत सुधारणा होईल. नवीन कार्याची सुरवात करू शकाल. प्रियजनांचा सहवास घडेल. एखादा आर्थिक लाभ संभवतो. आपली कामे सहजपणे पूर्ण करू शकाल.
कन्या - चंद्र कर्क राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी असेल. आज अनेक प्रकारचे लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात फायदा होईल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल. दुपार नंतर मात्र एखाद्या व्यक्तीशी मतभेद होतील. संतापाच्या भरात कोणाशी वाद होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागेल. प्रकृती नरम गरम होईल. प्राप्तीच्या मानाने खर्चात वाढ होईल.