महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

16 ऑगस्ट राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांसाठी आजचा दिवस सावध राहण्याचा आहे; जाणून घ्या आजचे राशीभविष्य - horoscope for the day 1 august

कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य

horoscope for the day 16 august
horoscope for the day 16 august

By

Published : Aug 16, 2021, 12:01 AM IST

Updated : Aug 16, 2021, 1:32 AM IST

मेष -आज आपणास सांसारिक बाबींचा विसर पडेल. गूढ, रहस्यमय विद्या ह्याची गोडी लागेल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळविण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. बोलण्यावर संयम ठेवा म्हणजे अनर्थ होणार नाही. हितशत्रूंचा त्रास होईल. आज शक्यतो नवीन कार्य सुरू करू नका.

वृषभ -आजचा दिवस शुभ फलदायी आहे. प्रकृती उत्तम राहील. मन प्रसन्न राहील. स्वकीय व जवळच्या लोकांसह जास्त वेळ घालवू शकाल. सामाजिक जीवनात यशप्राप्ती होईल. परदेशातून मनासारख्या बातम्या येतील. वैवाहिक जीवनात गोडी राहील. वैवाहिक सौख्याचा आनंद उपभोगता येईल. अचानक धनलाभ संभवतो.

मिथुन -आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कार्यपूर्ती व यश - कीर्ती प्राप्तहोईल. कुटुंबीयांसह आज आनंद, उल्हासपूर्ण वातावरणात सुखात वेळ घालवाल. आर्थिक लाभाची सुद्धा आज शक्यता आहे. महत्वाच्या गोष्टींवर खर्च होईल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य राहील. तरी सुद्धा आपण वाणी व क्रोध यावर संयम ठेवणे आवश्यक आहे. आपले मन दुखावले जाण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सहकारी अपेक्षित सहकार्य करतील. त्याच बरोबर मान - सन्मान सुद्धा प्राप्त होतील. अपूर्ण कामे तडीस जातील.

कर्क -आजचा दिवस शारीरिक ढिलेपणाचा व मानसिक तापाचा आहे. मित्र व संतती विषयक काळजी राहील. अचानक पैसा खर्च करावा लागेल. वादग्रस्त विषय आज टाळावेत. शक्य असेल तर प्रवास सुद्धा करू नका. अपचन, अजीर्ण असे विकार त्रास देतील. आज बौद्धिक चर्चेपासून ही दोन हात दूर राहणे उचित ठरेल.

सिंह -आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. उक्ती व कृती ह्यावर संयम ठेवल्यास संभाव्य वाद टाळू शकाल. आईशी मतभेद होण्याची शक्यता आहे. मनावर वैचारिक नकारात्मकतेचा पगडा राहील. संपत्तीच्या कागदपत्रावर सही करताना दक्षता घ्यावी. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

कन्या -आजचा दिवस शारीरिक उत्साह व मानसिक प्रसन्नता ह्यामुळे मनाला शांतता मिळवून देणारा आहे. कार्यात यश मिळेल. कुटुंबीय व मित्रपरिवार ह्यांच्याशी असलेल्या संबंधात गोडवा वाढेल. त्यांचे चांगले सहकार्य मिळेल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल.

तूळ -आज आपली मनःस्थिती द्विधा झाल्याने आपण कोणत्याही बाबतीत ठाम निर्णय करू शकणार नाही. अशा परिस्थितीत नवीन कामाची सुरवात न करणे हितावह राहील. संबंधितांशी मतभेद संभवतात. व्यवहारात हट्टीपणा सोडावा लागेल. प्रवासात अडचणी येतील. आर्थिक लाभ होईल. कुटुंबियांशी वाद संभवतात. शक्यतो आज कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

वृश्चिक -आजचा दिवस साधारणच आहे. तन - मनाला सुख - आनंद मिळेल. कुटुंबियांसह उत्साहात व आनंदात वेळ घालवाल. मित्रांकडून भेटवस्तू मिळाल्याने मनाला आनंद होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. एखादी आनंददायी बातमी मिळेल. प्रवास सुखद होतील. उत्तम वैवाहिक सुख उपभोगता येईल.

धनू -आजचा दिवस कष्टदायी आहे. कुटुंबियांशी मतभेदाचे प्रसंग उदभवतील. स्वभावात रागीटपणा येऊन वाद होतील. आरोग्यास त्रास संभवतो. वर्तन व बोलणे संयमित ठेवावे लागेल. एखादा अपघात संभवतो. खर्चात वाढ होईल. कोर्ट - कचेरीचे प्रश्न काळजीपूर्वक सोडवावे लागतील. फुटकळ कामातून मनःशांती भंग पावेल.

मकर -आज विविध क्षेत्रातून लाभ होण्याचा दिवस असल्याने सामाजिक कार्यांतून लाभ होईल. मित्र व स्नेही यांच्या भेटीतून लाभ होईल. विवाहोत्सुकांचे विवाह सहज जुळतील. शुभ प्रसंगाचे आयोजन घडेल. पत्नी व संततीचा सहवास लाभेल. खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. शेअर बाजारातून फायदा होईल. पत्नीच्या स्वास्थ्या विषयी चिंता निर्माण होईल.

कुंभ -आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. आज आपले प्रत्येक काम सहजपणे पार पडेल. त्यामुळे आनंदी राहाल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण राहील. त्यामुळे मोठे यश मिळू शकेल. वरिष्ठ व वडीलधार्‍यांचे आशीर्वाद मिळाल्याने मनावरील ताण कमी होईल. गृहजीवन आनंदी राहील. मान - मरातब वाढतील.

मीन -मनातील दुःख व अशांतता ह्याने आजच्या दिवसाची सुरुवात होईल. शारीरिक थकवा जाणवेल. वरिष्ठांशी वाद संभवतात. संतती विषयी काळजी सतावेल. निरर्थक खर्च होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद टाळा. पोटाची तक्रार राहील. नशिबाची साथ लाभणार नाही. मनात नकारात्मक विचार येतील.

Last Updated : Aug 16, 2021, 1:32 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details