महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

15 ऑक्टोबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आजचा दिवस मध्यम फलदायी! - horoscope for the day 15 october

कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य

15 ऑक्टोबर राशीभविष्य
15 ऑक्टोबर राशीभविष्य

By

Published : Oct 15, 2021, 12:02 AM IST

Updated : Oct 15, 2021, 5:43 AM IST

मेष - आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. आज आपण आपल्या कौटुंबिक गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल. कुटुंबीयांची एकत्रितपणे बैठक घेऊन एखाद्या महत्वाच्या विषयावर चर्चा कराल. घराचा कायापलट करण्याच्या दृष्टीने काही नवीन मांडणी - सजावट ह्याचा सुद्धा विचार कराल. कामात समाधान लाभेल. स्त्रीयांकडून एखादा सन्मान होईल. आईशी सुसंवाद साधू शकाल. निरूत्साहीपणा सोडून द्यावा लागेल.

वृषभ -आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आज परदेशस्थ स्नेहीजनां कडून व मित्रवर्गा कडून आनंददायी बातम्या मिळाल्याने आपण आनंदित व्हाल. परदेशी जाण्यास इच्छुक असणार्याना चांगली संधी प्राप्त होईल. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. एखाद्या प्रवासामुळे मनास आनंद होईल. नोकरी - व्यवसायात कामाचा व्याप वाढला तरी सुद्धा आर्थिक लाभाची शक्यता आहे.

मिथुन -आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज नकारात्मक विचारांपासून दूर राहणे हितावह राहील. शक्यतो नवीन कार्य किंवा औषधोपचार आज सुरू करू नये. रागावम संयम ठेवला नाही तर एखाद्या अप्रिय प्रसंगास सामोरे जावे लागेल. खर्च जास्त झाल्याने आर्थिक चणचण भासेल. नकारात्मक विचारांपासून दूर राहण्यासाठी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करावा.

कर्क -आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आजचा पूर्ण दिवस आनंद, उत्साह व मनोरंजनात जाईल. भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास लाभेल. आनंदाची साधने, वस्त्रे इ. खरेदी होईल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. वाहन सौख्य लाभेल. प्रतिष्ठेस तडा जाऊ शकतो. व्यावसायिक क्षेत्रात लाभ संभवतात. प्रकृती उत्तम राहील.

सिंह -आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. घरात शांतता नांदेल. नोकरीच्या ठिकाणी सहकार्‍यांचे अपेक्षित सहकार्य मिळविण्यात अडचणी येतील. दैनिक कामात अडथळे येतील. शत्रू व प्रतिस्पर्ध्यांमुळे त्रास होईल. वरिष्ठांशी वाद संभवतात. स्त्रियांना माहेरहून एखादी अप्रिय बातमी मिळण्याची शक्यता आहे. आज उदासीनता व साशंकता अधिक प्रमाणात राहिल्याने मन उदास होईल. प्रकृती साधारण राहील. प्रयत्नांच्या मानाने यश कमीच मिळेल.

कन्या -आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आज संतती विषयक काही चिंता निर्माण होतील. मन विचलीत होईल. पोटाच्या तक्रारीमुळे यातना होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येतील. अचानक खर्च उदभवतील. बोलताना बौद्धीक चर्चे पासून दूर राहणे हितावह राहील. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. शेअर्स, लॉटरीत नुकसान संभवते.

तूळ -आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आज मानसिक थकवा जाणवेल. आपण जास्त हळवे व्हाल. मनात उठणार्‍या विचार तरंगांमुळे त्रास होईल. आई व स्त्री विषयक चिंता सतावेल. आजचा दिवस प्रवासासाठी प्रतिकूल आहे. पाण्या पासून दूर राहणे हितावह राहील. झोप पूर्ण न झाल्याने मानसिक ताण येईल. कौटुंबिक तसेच जमीन - जुमल्याच्या बाबतीत सावध राहावे लागेल.

वृश्चिक - आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आज दिवसभर आपण आनंदित राहू शकाल. नवीन कार्याचा आरंभ करू शकाल. सहकार्‍यांकडून सौख्य व आनंद मिळेल. मित्र व नातलगांची भेट होईल. कोणत्याही कामात आज यश मिळेल. आर्थिक फायदा होईल. नशिबाची साथ मिळेल. भावंडांकडून लाभ होतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. स्नेह संबंध जुळतील. छोटे प्रवास होतील.

धनू -आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. वायफळ खर्च होतील. मनास मरगळ येईल. कुटुंबीयांशी गैरसमज झाल्याने मनस्ताप होईल. कामात अपेक्षित यश मिळणार नाही. व्दिधा मनःस्थितिमुळे कोणताही महत्वाचा निर्णय आपण घेऊ शकणार नाही. दूर राहणार्‍या नातलगांशी संपर्क साधू शकाल. कामाचा व्याप वाढेल.

मकर -आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. एखाद्या सामाजिक कार्यात आपण सहभागी व्हाल. नोकरी - व्यवसायात अनुकूल परिस्थिती असेल. प्रत्येक काम सहजपणे पूर्ण होईल. मान - सन्मान होतील. नोकरीत बढतीची शक्यता आहे. आप्तेष्टां कडून भेटवस्तू मिळाल्याने आपण आनंददित व्हाल. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. एखादा अपघात संभवतो. प्रकृती उत्तम राहील.

कुंभ -आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज आर्थिक देवाण- घेवाण किंवा जामीनकीत आपली फसवणूक होण्याची शक्यता आहे. एकाग्रता न झाल्याने मानसिक अस्वास्थ्य वाढेल.प्रकृती विषयी समस्या उदभवतील. आर्थिक गुंतवणूक अयोग्य ठिकाणी होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. कुटुंबियांशी पटणार नाही. गैरसमज, दुर्घटना यापासून जपून राहावे. एखाद्याचे भले करण्याच्या नादात स्वतःचे नुकसान होण्याची वेळ येईल.

मीन -आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आज मित्रां कडून आपणाला लाभ होईल व त्यांच्यासाठी खर्च सुद्धा करावा लागेल. सामाजिक कार्यात गोडी वाटेल. मित्र व वडीलधार्‍यांशी संपर्क साधू शकाल. एखाद्या रम्य स्थळी सहलीचे नियोजन कराल. नवे स्नेह - संबंध जुळतील व भविष्यात त्याच्यांकडून लाभ होईल. घरातून चांगली बातमी मिळेल. संतती कडून लाभ होईल. अचानक धनलाभ संभवतो.

Last Updated : Oct 15, 2021, 5:43 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details