मेष -मकर राशीचा चंद्र आज आपल्या दशमात स्थानी असेल. आज आपल्या एखाद्या कामास किंवा प्रकल्पास सरकारी लाभ मिळतील. कामाच्या ठिकाणी महत्वाच्या मुद्दया संबंधी वरिष्ठांशी विचार - विनिमय होतील. कार्यालयीन कामानिमित्त प्रवास करावा लागेल. कार्यभार वाढेल. कौटुंबिक गोष्टीत मनापासून रस घेऊन कुटुंबियाशी सल्ला - मसलात कराल. गृहसजावटीचे आयोजन कराल. आईशी जास्त जवळीक निर्माण होईल.
वृषभ -मकर राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात स्थानी असेल. आज विदेश गमनाच्या सुवर्णसंधी येतील. परदेशातील मित्राकडून बातम्या समजतील. व्यापार्यांना व्यापारात धनलाभ होईल. नवे बेत हाती घ्याल. दूरचे प्रवास होतील. एखाद्या विषयात प्रगती होईल. संततीची प्रगती होईल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल.
मिथुन -मकर राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा असल्याने प्रत्येक बाबतीत सावध राहावे लागेल. आज नवीन कामाची सुरुवात न करणे हितावह राहील. आज खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. घरात किंवा कार्यालयात वाणीवर ताबा ठेवा. वाद टाळा. काही कारणाने खाण्या - पिण्याची आबाळ होऊ शकते. मनास शांतता लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल.
कर्क - मकर राशीचा चंद्र आज आपल्या सातवा स्थानी असेल. समृद्ध जीवनशैली व मनोरंजक वृत्ती ह्यामुळे आज आपण आनंदी राहाल. व्यावसायिक क्षेत्रात लाभ होईल. प्रकृती उत्तम राहील. मान - प्रतिष्ठा वाढेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखू शकाल.
सिंह - मकर राशीचा चंद्र आज आपल्या सहावा स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कुटुंबियांशी बोलताना वाणीवर संयम ठेवावा. दैनंदिन कामात विघ्ने येतील. कार्यपूर्तीत अडचणी येतील. कष्टाच्या मानाने प्राप्ती कमी झाल्याने नैराश्य येईल. आई विषयक चिंता राहील.
कन्या -मकर राशीचा चंद्र आज आपल्या पाचवा स्थानी असेल. आज शक्यतो वाद व चर्चा ह्यापासून दूर राहणे हितावह राहील. अचानकपणे खर्चात वाढ होईल. विद्यार्थी वर्गाला शिक्षणात अडचणी येतील. प्रिय व्यक्तीचा सहवास घडल्याने मन आनंदित होईल. पोटाच्या तक्रारी वाढू शकतील. शेअर्स, सट्टे बाजारात गुंतवणूक करताना सावध राहावे.