महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

14 ऑगस्ट राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांसाठी आजचा दिवस संघर्षाचा आहे; जाणून घ्या आजचे राशीभविष्य - 14 august horoscope

कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य

check astrological prediction for your sign
14 ऑगस्ट राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांसाठी आजचा दिवस संघर्षाचा आहे; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

By

Published : Aug 14, 2021, 12:02 AM IST

मेष -आज आपणास सुखदायी दांपत्य जीवन, हिंडणे - फिरणे व सगळेच मनासारखे मिळू शकेल. आयात - निर्यात व्यापाराशी संबंधितांना लाभ व यश मिळेल. हरवलेली वस्तू परत मिळेल. प्रिय व्यक्तीशी प्रेमाचा सुखद अनुभव येईल. प्रवास होईल. आर्थिक लाभ व वाहनसुख मिळेल. वाद - विवादापासून दूर राहणे हिताचे ठरेल.

वृषभ -आजचा दिवस खूप आनंदात जाईल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आपले काम निर्धारित वेळेत पूर्ण होईल. आर्थिक लाभ संभवतात. अपूर्ण कामे पूर्ण होतील. स्त्रीयांना माहेरहून आनंददायी बातम्या मिळून काही लाभ सुद्धा होईल. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत सुधारणा होईल. सहकार्‍यांकडून लाभ संभवतो.

मिथुन -आज शरीर व मन बेचैन राहील. नवीन कार्य सुरू करण्याचा बेत आखाल पण काम सुरू करण्यात अडचणी येतील. मानहानी होण्याची शक्यता आहे. संतती विषयक कामासाठी खर्च करावा लागेल. पचनसंस्येचे विकार बळावतील. जोडीदाराच्या तब्बेतीची सुद्धा चिंता वाटेल. विद्यार्थ्यांसाठी फार चांगला दिवस. प्रवासात त्रास संभवतो.

कर्क -आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळेल. छातीत दुखणे किंवा अन्य विकारामुळे कुटुंबात अशांतीचे वातावरण राहील. स्त्री वर्गाशी मतभेद वा भांडण होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक जीवनात अपमान झाल्याने दुःख होईल. वेळेवर जेवण मिळणार नाही. निद्रानाश होईल. धन खर्चाची व अपयशाची शक्यता आहे.

सिंह -आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आज आरोग्य उत्तम राहील. भावंडांसह आनंदात वेळ जाईल. त्यांच्या कडून फायदा होईल. एखादया सुंदर स्थळाला भेट देण्यास जाल. मित्र भेटतील. कार्य यशस्वी झाल्याने मित्र आनंदीत होतील. भावनिक संबंध प्रस्थापीत होतील. कलाक्षेत्रात रुची राहील. मानसिक दृष्टया दिवस चांगला जाईल.

कन्या -आज कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. गोड वाणी व न्यायप्रिय व्यवहार ह्यामुळे लोकप्रियता मिळेल. आर्थिक लाभ होतील. स्वादिष्ट भोजन मिळेल. विद्यार्जनासाठी विद्यार्थ्यांनाआजचा दिवस अनुकूल आहे. हौस - मौज ह्यावर खर्च होईल. अवैध प्रवृत्ती पासून दूर राहावे.

तूळ -आजचा दिवस शुभ फलदायी आहे. रचनात्मक व कलात्मक शक्तीची चमक दिसेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल. विधायक कार्य हातून घडेल. खंबीर विचाराने काम पूर्ण कराल. आर्थिक योजना ठरवाल. प्रिय व्यक्तीसह दिवस आनंदात घालवू शकाल. अलंकार, मनोरंजन, आनंद इत्यादींसाठी पैसा खर्च होईल.

वृश्चिक -आज मनोरंजन, आनंद ह्यासाठी पैसा खर्च होईल. चिंता व शारीरिक कष्ट ह्यामुळे आपण त्रासून जाल. एखादा अपघात संभवतो. गैरसमज होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागेल. स्वभाव रागीट बनेल म्हणून भांडणापासून दूर राहावे लागेल. संबंधितां बरोबर काही अप्रिय घटना घडू शकते. आज मानहानी व धनहानी होण्याची शक्यता आहे. न्यायालयीन कामे जपून करा. अविचाराने केलेला व्यवहार अडचणीत आणू शकतो.

धनू -आर्थिक, सामाजीक व कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी आहे. वैवाहिक जीवनात पूर्णतः आनंद मिळेल. प्रेमाचा सुखद आनंद घेऊ शकाल. मित्रांसह एखाद्या रम्य स्थळी फिरायला जावू शकाल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरण्याची शक्यता आहे. संतती व पत्नी ह्यांच्या कडून लाभ होईल. व्यापारात फायदा होऊन उत्पन्नात वाढ होईल. स्त्री वर्गाकडून लाभ होईल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल.

मकर -आजचा दिवस संघर्षाचा आहे. आज अग्नी, पाणी व वाहन ह्यापासून एखादा अपघात संभवतो. व्यापारात कार्यमग्न राहाल. व्यापारा निमित्त प्रवास करावा लागेल व त्याचा फायदा सुद्धा होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. नोकरीत बढती मिळेल. संततीच्या शिक्षणा विषयी समाधान वाटेल. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. पैसा व प्रतिष्ठा मिळेल. मित्र व नातेवाईकांकडून लाभ होतील.

कुंभ -आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. प्रकृती नरम गरम राहील. तरीही मनस्वास्थ्य चांगले राहील. कामाचा उत्साह कमी होईल. वरिष्ठांशी सांभाळून राहावे लागेल. अकारण खर्च वाढेल. आनंद - सोहळा, प्रवास- पर्यटन ह्यावर पैसा खर्च होईल. प्रवास व सहलीची शक्यता आहे. परदेशातून काही बातमी मिळेल. संतती विषयक काळजी राहील. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात.

मीन -आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. मानसिक व शारीरिक कष्ट अधिक होतील. अचानक धनलाभ संभवतो. व्यापारी वर्गाला जुनी येणी वसूल होतील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. चुका होऊ नयेत, म्हणून संयमित राहणे हितावह राहील.

ABOUT THE AUTHOR

...view details