मेष - आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात भावात असणार आहे. आजचा दिवस आपणास लाभदायी आहे. व्यापार - व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढेल. दिवसभर आनंदी व खेळीमेळीचे वातावरण राहील. वाहनसौख्य मिळेल. सामाजिक कार्यासाठी प्रवास होतील. रमणीय स्थळाच्या प्रवासाचा आनंद उपभोगू शकाल.
वृषभ - आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आज आपण व्यापार वृद्धीवर आपले लक्ष केंद्रित कराल. दुपार नंतर व्यापारातील परिस्थिती अनुकूल होईल. कामा निमित्त प्रवास करावा लागण्याची सुद्धा शक्यता आहे. पदोन्नती होईल. आपल्या कामाच्या पद्धतीमुळे वरिष्ठ आपणावर खुश होतील. वडील व वडीलधार्यांकडून लाभ संभवतात.
मिथुन - आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आज मनात नकारात्मक विचार येतील, जे दूर करावे लागतील. अपघात होण्याची शक्यता असल्याने वाहन सावधपणे चालवावे. अचानकपणे खर्च वाढतील. व्यापार - व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. दुपार नंतर वैचारिक घोळ निर्माण होईल. मन बेचैन होईल. संततीच्या समस्येमुळे काळजी वाढेल. खर्चाचे प्रमाण वाढणार नाही याकडे लक्ष द्यावे लागेल.
कर्क - आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आज आपणास स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद, सुंदर वस्त्रालंकारांचा लाभ व भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास लाभल्याने आपण आनंदित व्हाल. नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. नवीन कामे सुरू करताना अडचणी येतील.
सिंह - आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा भावात असणार आहे. आजचा दिवस व्यापार वृद्धी करण्यास अनुकूल आहे. व्यवसायातील आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. योग्य कारणांसाठी पैसा खर्च होईल. प्रवास होतील. अचानकपणे पैसा खर्च होईल. भागीदारांबरोबर मतभेद असले तरी परिस्थिती अनुकूल राहील. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. नवीन कामात अडथळे येतील.
कन्या -आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. आजचा दिवस सौख्यदायी आहे. अलंकार खरेदी करू शकाल. कलेत आवड निर्माण होईल. व्यापारासाठी दिवस उत्तम आहे. आर्थिक बाबी मार्गी लागतील. घरात आनंद व शांतता लाभेल. प्रकृती उत्तम राहील. व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. सहकार्यांचे उत्तम सहकार्य लाभेल.