मेषआज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आपल्या तापट स्वभावावर आज नियंत्रण ठेवणे हितावह राहील. मानसिक थकवा जाणवेल. कष्टाच्या मानाने प्राप्ती कमी होईल. संतती विषयी काळजी राहील. कामाच्या व्यापामुळे कुटुंबियांना वेळ देऊ शकणार नाही. सरकारी कामात मात्र यश मिळेल. पोटाचे विकार संभवतात.
वृषभआज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आज आपण कोणतेही कार्य खंबीर मनोबल व दृढ आत्मविश्वास ह्यांच्या जोरावर पूर्ण कराल. पैतृक घराण्याकडून आपणाला लाभ होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाटेल. सरकारी कामात आर्थिक यश मिळेल. संततीसाठी पैशांची गुंतवणूक करू शकाल.
मिथुन आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आजचा दिवस नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल आहे. शासनाकडून काही लाभ होतील. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. भावंडे व शेजारी - पाजारी ह्यांच्याशी असलेले गैरसमज दूर होतील. वैचारिक बदल संभवतो. आर्थिक व्यवहारात मात्र सावधानता बाळगावी लागेल.
कर्कआज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आज नकारात्मक विचार दूर सारावे लागतील. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. निराशा व असंतोषाची भावना होईल. कुटुंबियांशी गैरसमज होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अपेक्षित परिणाम मिळू शकणार नाही. अवैध गोष्टींपासून शक्यतो दूरच राहावे.
सिंहआज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आज आपला आत्मविश्वास दांडगा असेल. कोणतेही काम करण्याचा निर्णय आपण झटकन घेऊ शकाल. वडील व वडीलधार्यांकडून लाभ होतील. सामाजिक मान - मरातब वाढेल. वाणी व कृती ह्यावर नियंत्रण ठेवणे हितावह राहील. काही कारणाने आपल्या रागाचे प्रमाण वाढेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
कन्याआज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज एखाद्या व्यक्तीशी आपला वाद होण्याची शक्यता आहे. शारीरिक थकवा व मानसिक तणाव वाढेल. एखाद्या गोष्टीवरून मित्रांशी गैरसमज होतील. स्वभावात तापटपणा वाढेल. एखाद्या मांगलिक कार्यासाठी खर्च होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. अचानकपणे खर्च उदभवतील. शक्यतो भांडणा पासून दूर राहावे.
तूळआज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातून झालेल्या लाभातून आपल्याला समाधान मिळेल. प्राप्तीत वाढ संभवते. मित्रांकडून फायदा होईल पण त्यांच्यासाठी खर्च सुद्धा करावा लागेल. एखाद्या पर्यटन स्थळाला भेट देऊन आपले मन प्रफुल्लित होईल. भिन्नलिंगी मित्रांशी झालेली भेट आनंददायी ठरेल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळेल. उत्तम भोजन प्राप्ती होईल.
वृश्चिकआज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण आपणास अनुकूल राहील. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. आपली कामे सहजपणे पूर्ण होतील. मान मरातब वाढेल. नोकरीत बढती मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. व्यापारासाठी प्रवास करावा लागेल. संततीच्या प्रगतीमुळे आनंदित व्हाल.
धनुआज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आज आपली प्रकृती नरम गरम राहील. आळस व अशक्तपणा जाणवेल. मनाला चिंता लागून राहील. व्यवसायात अडथळे येतील. शक्यतो नकारात्मक विचारां पासून दूर राहावे. कोणतीही योजना विचारपूर्वक अंमलात आणा. प्रतिस्पर्धी व विरोधक यांच्याशी संभाव्य वाद टाळा.
मकरआज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज अचानकपणे खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. हा खर्च आजारपणावर, व्यावहारिक किंवा सामाजिक कामासाठी बाहेर जावे लागल्यामुळे होऊ शकतो. खाण्या - पिण्याकडे लक्ष द्यावे लागेल. क्रोध तसेच नकारात्मक विचारांवर संयम ठेवावा लागेल. नोकरी- व्यवसायात मात्र अनुकूलता राहील. भागीदारांशी मतभेद संभवतात.
कुंभआज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. प्रणय, प्रेमालाप, प्रवास, पर्यटन, मनोरंजन हे आजच्या दिवसाचा भाग बनतील. मित्र व कुटुंबीयांसह भोजनासाठी बाहेर जाऊ शकाल. उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता आहे. भागीदारांशी चांगले संबंध राहतील. सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा व नावलौकिक मिळेल. आत्मविश्वासाने कार्यात यश मिळेल.
मीनआज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आज दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील. घरात सुख शांती नांदेल. स्वभाव तापट राहील. उक्ती व कृती ह्यात समतोल साधावा लागेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. सहकार्यांचे सहकार्य आपले व्यावसायिक काम सरळ बनवतील. मातुल घराण्या कडून लाभ होईल. 11 OCTOMBER 2022 आजचे राशीभविष्य, HOROSCOPE FOR THE DAY, HOROSCOPE FOR THE DAY 11 OCTOMBER, 11 OCTOMBER Rashi Bhavishya, 11 OCTOMBER 2022