मेष -आज आपले शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. आपण एखाद्या काल्पनिक विश्वात रमून जाल. कलावंतांना आपली कला प्रदर्शित करण्याची संधी लाभेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील. दैनंदिन कार्यात मात्र काही अडचणी निर्माण होतील. नोकरीत वरिष्ठांशी मतभेद संभवतात. परिश्रमाचे अपेक्षित यश मिळू शकणार नाही.
वृषभ -आज मातेच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. स्थावर संपत्ती संबंधित कागदपत्रावर सह्या करणे टाळावे. नकारात्मक विचार दूर सारावे लागतील. दुपार नंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुधारेल. विद्यार्थ्यांना अनुकूल दिवस आहे. सृजनशीलता वाढेल. हातून एखादे परोपकारी कार्य घडेल.
मिथुन -आजचा दिवस सुखा - समाधानात जाईल. भावंडांशी सौहार्दता निर्माण झाल्याने आपला फायदा होईल. स्नेहीजन व मित्रांचा सहवास घडेल. दुपार नंतर मात्र मनावर नकारात्मक विचारांचा पगडा बसेल. भोजनाची वेळ पाळू शकणार नाही. आज आपण अधिक हळवे व्हाल. घरातील वातावरण प्रतिकूल राहील. जमीन वा इतर कागदपत्रांवर विचारपूर्वक सही करा. जास्त भावनाशील होऊ नका.
कर्क - आजचा दिवस लाभदायी आहे. घरातील सर्वांचे सहकार्य मिळेल. बोलण्याच्या सुंदर शैलीमुळे आपली कामे सहजपणे पूर्ण होतील. दुपार नंतर सहलीचा बेत ठरवू शकाल. सहकार्यांशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित होतील. प्रकृती उत्तम राहील. मनाच्या प्रसन्नतेमुळे दिवसाचा आनंद वाढेल.
सिंह -आज आपली कार्य पद्धती खंबीर मनोबलयुक्त राहील. मोठया लोकांकडून लाभ होतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. बोलण्यातील उग्रता कमी केल्यास कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. खर्च नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करा. दूर राहणारे स्वकीय व मित्र यांच्याशी खूप कालावधी नंतर होणारा एखादा व्यवहार आज आनंददायी व लाभदायी ठरेल.
कन्या - भावनेच्या भरात चुकीचे पाऊल पडेल. गैरसमज दूर करावे लागतील. एखादा वाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद संभवतात. प्राप्तीच्या प्रमाणात खर्च वाढेल. दुपार नंतर वडील व वडीलधार्यांचे सहकार्य लाभेल. त्यामुळे मनातील चिंता कमी होईल व मन आनंदी बनेल. आरोग्याच्या बाबतीत असमाधानच राहील.