मेष - आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल. घराच्या सजावटीत बदल करण्याचा विचार मनात येईल. सरकारी फायदा मिळण्याची शक्यता आहे. कामासाठी एखादा प्रवास घडेल. काम वाढेल. शारीरिक थकवा जाणवेल. आईकडून लाभ संभवतो.
वृषभ - आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज नवीन काम करण्याची प्रेरणा मिळून त्याची आपण सुरुवात सुद्धा करु शकाल. एखादया रमणीय स्थळाला भेट देऊन आपले मन प्रसन्न होईल. दूरचे प्रवास संभवतात. दूरवरच्या मित्रांच्या शुभ बातम्या समजतील. परदेशी जाण्याची संधी लाभेल. व्यापारात आर्थिक लाभ संभवतो. आरोग्य मध्यम राहील.
मिथुन -आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज संतापाची भावना आपले नुकसान करेल. आजारी व्यक्तींची तपासणी किंवा शस्त्रक्रिया करावी लागेल. मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल. खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रकृती बिघडेल. मानसिक दृष्टया निराश व्हाल. मनाला शांतता मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
कर्क -आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज संवेदनशीलता व प्रेमाने व्याप्त होऊन आपले मन भिन्नलिंगी व्यक्तीकडे आकर्षित होईल. मौल्यवान मौज - मजेच्या वस्तू, वस्त्राभूषणे तथा वाहन इत्यादींची खरेदी होईल. दांपत्य जीवन उत्तम राहील. व्यापार्यांना विदेशी व्यापारात चांगला फायदा होईल. भागीदारी फायदेशीर ठरेल. प्रणयाराधनात सफलता मिळेल.
सिंह - आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज उदासीनता व साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल. दैनंदिन कामे पूर्ण व्हायला विलंब लागेल. खूप परिश्रम कराल पण त्यामानाने कमी फळ मिळेल. नोकरीत सांभाळून राहा. सहकारी फारसे सहकार्य करणार नाहीत. मातुल घराण्या कडून काळजी वाटणार्या बातम्या येतील. शत्रूला तोंड द्यावे लागेल. वरिष्ठांशी मतभेद संभवतात.
कन्या - आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस चिंता व उद्वेगाने भरलेला असेल. पोटाच्या त्रासामुळे प्रकृती बिघडेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील. अचानक धनखर्च होईल. बौद्धिक चर्चेत असफल व्हाल. प्रियव्यक्तीचा सहवास लाभेल. भिन्नलिंगी व्यक्तीकडे आकर्षित व्हाल. शेअर, सट्टा ह्यापासून दूर राहणे उचित ठरेल.