मेषचंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून बारावा भावात असेल. आज ''कमी वेळात अधिक लाभ'' अशा एखाद्या योजनेत आपली फसवणूक होण्याची शक्यता असल्याने सावध राहावे लागेल. कोर्ट- कचेरीच्या प्रकरणात अडकू नका. आज कोणाला जामीन राहू नका. आज मनाची एकाग्रता कमी राहील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक देवाण - घेवाणीत लक्ष द्यावे लागेल. एखादी दुर्घटना संभवते. दुपार नंतर मात्र खूप खुशीत राहाल. घरात सुख- शांतीचे वातावरण राहील. कटुंबात एखादे धार्मिक कार्य होण्याची शक्यता आहे. एखादा प्रवास संभवतो. आजचा दिवस नवीन काम हाती घेण्यास अनुकूल आहे. अचानक धनलाभ संभवतो.
वृषभचंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून लाभात भावात असेल. आज घर व संतती ह्यांच्याशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळेल. जुन्या परंतु बालपणीच्या मित्रांच्या सहवासाने मनाला आनंद होईल. नवीन मैत्री सुद्धा होईल. व्यावसायिक व आर्थिक लाभ होईल. तरीही दुपार नंतर सांभाळून राहावे लागेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. गुंतवणूक करताना सावधानी बाळगा. धार्मिक कार्यावर पैसा खर्च होईल. कोर्ट - कचेरीची प्रकरणे सांभाळून हाताळा.
मिथुनचंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दशमात भावात असेल. आजचा दिवस व्यापारासाठी शुभ फलदायी आहे. व्यापारी लोकांना व्यवसायवृद्धी बरोबरच यश मिळेल व येणी वसूल होतील. वडील आणि वडीलधार्यांकडून लाभ होईल. अर्थ प्राप्ती संभवते. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. त्यामुळे काही लाभ संभवतात. मित्रांकडून सुद्धा लाभ होतील. दुपार नंतर एखाद्या ठिकाणी सहलीस जाण्याचा बेत आखू शकाल. अचानक धनलाभ संभवतो.
कर्कचंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून भाग्यात भावात असेल. आजच्या दिवसाचा प्रारंभ मानसिक तणाव व बेचैनीने होईल. शारीरिक दृष्टया आळस व मरगळ जाणवेल. पोटाचा त्रास संभवतो. कोणत्याही कार्यात नशिबाची साथ लाभणार नाही. संतती विषयक चिंता वाढेल. दुपार नंतर मात्र मन प्रसन्न होऊन शारीरिक उत्साह वाढेल. व्यापारी येणी वसूल होतील. उच्च पद व मान- प्रतिष्ठा लाभेल.
सिंहचंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून अष्टमात भावात असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आचार विचारांवर संयम ठेवून अवैध गोष्टींपासून दूर राहणे हितावह राहील. मानसिक व शारीरिक त्रास वाढतील. त्यामुळे प्रकृती बिघडेल. अचानक धनलाभ होईल. संतती विषयक चिंता वाढल्याने निरर्थक खर्च करावा लागेल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतो. नकारात्मक विचार दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.
कन्याचंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सातवा भावात असेल. आजचा सकाळचा वेळ मित्रांसोबत फिरणे, खाणे - पिणे व मनोरंजन ह्यात आनंदाने घालवाल. भागीदारांशी संबंध चांगले राहतील. दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल. प्रकृतीस त्रास संभवतो. एखाद्या आजारावर अचानकपणे खर्च करावा लागेल. त्याच बरोबर अचानक धनलाभ झाल्याने आपली काळजी काही प्रमाणात दूर होऊ शकेल.