मेष - चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशी पासून भाग्यात भावात असेल. आज नकारात्मक विचार, व्यवहार व नियोजना पासून दूर राहावे लागेल. अन्यथा आळस व दुःखात वाढ होईल. प्रकृती नरम गरमच राहील. मात्र, हातातील कार्ये सहजपणे पार पडतील. आज व्यावसायिक कामा निमित्त प्रवास करावा लागेल. इतरांना मदत करण्याचा आपण प्रयत्न कराल.
वृषभ -चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशी पासून अष्टमात भावात असेल. आज आपल्या हातून एखादे सरकार विरोधी कार्य होण्याची शक्यता असल्याने सावध राहावे लागेल. नवीन कार्यात अडचणी येतील. प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. नशिबाची साथ मिळणार नाही. वरिष्ठांची नाराजगी ओढवून घ्यावी लागेल. संतती विषयक काळजी निर्माण होईल.
मिथुन - चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सातवा भावात असेल. आजचा दिवस सौख्यदायी आहे. मात्र, आपण दिवसभर आपली दैनंदिन कामेच करत राहाल. मन प्रसन्न राहण्यासाठी आपण मनोरंजनाचा आधार घ्याल. या आनंदात मित्र व संबंधितांना सहभागी करून घ्याल. दुपार नंतर मात्र मनात चिंता निर्माण होतील. हळवेपणाचे प्रमाण वाढेल. संतापावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
कर्क -चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सहावा भावात असेल. आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना दिवस लाभदायी आहे. नोकरीतील उत्तम कामगिरीमुळे बढती मिळण्याची शक्यता निर्माण होईल. दुपार नंतर मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. व्यापार - व्यवसायात भागीदारांशी यशस्वीपणे विचार विनिमय करू शकाल.
सिंह -चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशी पासून पाचवा भावात असेल. साहित्य व कला ह्यातील गोडी वाढेल. पोटाच्या तक्रारींमुळे अस्वस्थता जाणवेल. दुपार नंतर आर्थिक अडचण दूर होईल. घरातील वातावरण आनंदी राहील. प्रकृतीत सुधारणा होईल. व्यापार - व्यवसायात लाभ होतील.
कन्या -चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशी पासून चवथा भावात असेल. आज शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मातेची प्रकृती बिघडेल. स्वकीयांवर संकट ओढवेल. धनहानी संभवते. शक्यतो प्रवास टाळावेत. संततीचे आरोग्य व अभ्यास ह्या विषयी चिंता निर्माण होईल. रागावर संयम ठेवा. वाद होण्याची शक्यता असल्याने बौद्धिक चर्चेपासून दूर राहणे हितावह होईल.