मेष -आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. शरीरास आळस व थकवा जाणवेल तर मन अशांत राहील. आज संताप वाढल्याने कामे बिघडतील. निर्धारीत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा लागेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. आपला प्रत्येक प्रयत्न चुकीच्या मार्गाने होण्याची शक्यता आहे.
वृषभ - आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आजचा दिवस काळजीपूर्वक राहण्याचा आहे. नवीन कार्याचा आरंभ शक्यतो टाळावा. स्वास्थ्य बिघडू शकते. खाण्या - पिण्याकडे विशेष लक्ष देणे हिताचे ठरेल. शारीरिक थकवा व मानसिक व्यथा अनुभवाल. कार्यालयात कामाचा व्याप वाढल्याने अधिक थकवा जाणवेल. प्रवास लाभदायी होणार नाहीत.
मिथुन -आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आजच्या दिवसाचा प्रारंभ आरामदायी व प्रसन्न वातावरणात होईल. पाहुणे व मित्रांच्या सहवासात मेजवानी, सहल, किंवा मनोरंजनाचा बेत ठरवाल. नवे कपडे, दागीने व वाहन खरेदी करू शकाल. मन आनंदाने भरून जाईल. भिन्नलिंगी व्यक्तीचे आकर्षण राहील. सार्वजनिक जीवनात सन्मान मिळेल व लोकप्रियता वाढेल. व्यापारात भागीदारीमध्ये फायदा होईल.
कर्क -आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा राहील. कुटुंबियांना वेळ देऊ शकाल. त्यांच्या सहवासात घरात वेळ घालवाल. कार्यात सफलता मिळेल. नोकरदारांना नोकरीत लाभ होईल. सहकारी सहकार्य करतील. प्रकृती उत्तम राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.
सिंह - आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आज आपण शारीरिक व मानसिक दृष्टया स्वस्थ राहाल. साहित्य लेखनात नवीन कार्य प्रदान कराल. प्रिय व्यक्तीचा सुखद सहवास लाभेल. संततीच्या प्रगतीच्या बातम्या मिळतील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. हातून एखादे परोपकारी कृत्य घडेल. गूढ व रहस्यमय विद्येकडे कल होईल.
कन्या - आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आपणाला आज प्रतिकूलतेला तोंड दयावे लागेल. आरोग्य यथा तथाच राहील. मनाला चिंता लागून राहील. आईशी असणारे संबंध दुरावतील किंवा तिची प्रकृती बिघडेल. स्वाभिमान दुखावला जाणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. घर, वाहनाच्या खरेदी - विक्रीसाठी आजचा दिवस चांगला नाही. पाण्यापासून धोका संभवतो.