मेष - आज चंद्र सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. साहित्य निर्मिती व कलात्मक अभिरुची वाढविण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. स्नेही भेटल्याने मन प्रसन्न राहील. दुपार नंतर घरातील वातावरण शांतिपूर्ण राहील. शत्रू व प्रतिस्पर्धी ह्यांच्याशी आपला संघर्ष होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद संभवतात.
वृषभ -आज चंद्र सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपणास वाणी व वर्तन ह्यावर संयम ठेवावा लागेल. अपघाताच्या शक्यतेमुळे जलाशया पासून दूर राहावे. जमीन किंवा संपत्तीच्या दस्तावेजात फसवणूक होण्याची शक्यता असल्याने सही करताना काळजी घ्यावी लागेल. दुपार नंतर परिस्थितीत सुधारणा होईल. शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. मनात सुंदर कल्पना येतील.
मिथुन -आज चंद्र सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज सकाळी कार्यात यशस्वी व्हाल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. ह्या सर्वांमुळे सकाळी आपण आनंदात असाल. नशिबाची साथ लाभेल. दुपार नंतर मात्र परिस्थितीत बदल होईल. कौटुंबिक मतभेद संभवतात. मातेची प्रकृती नरम गरम होईल. मनात नकारात्मक विचार येतील.
कर्क - आज चंद्र सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. घरातील सर्वांचे सहकार्य मिळेल. बोलण्याच्या सुंदर शैलीमुळे आपली कामे सहजपणे पूर्ण होतील. दुपार नंतर सहलीचा बेत ठरवू शकाल. सहकार्यांशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित होतील. प्रकृती उत्तम राहील. मनाच्या प्रसन्नतेमुळे दिवसाचा आनंद वाढेल.
सिंह - आज चंद्र सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपली कार्य पद्धती खंबीर मनोबलयुक्त राहील. मोठया लोकांकडून लाभ होतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. बोलण्यातील उग्रता कमी केल्यास कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. खर्च नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करा. दूर राहणारे स्वकीय व मित्र यांच्याशी खूप कालावधी नंतर होणारा एखादा व्यवहार आज आनंददायी व लाभदायी ठरेल.
कन्या -आज चंद्र सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. भावनेच्या भरात चुकीचे पाऊल पडेल. गैरसमज दूर करावे लागतील. एखादा वाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद संभवतात. प्राप्तीच्या प्रमाणात खर्च वाढेल. दुपार नंतर वडील व वडीलधार्यांचे सहकार्य लाभेल. त्यामुळे मनातील चिंता कमी होईल व मन आनंदी बनेल. आरोग्याच्या बाबतीत असमाधानच राहील.