मेष -आज चंद्र रास बदलून कुंभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. स्नेही, स्वकीय व मित्रांसह सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मित्रांकडून लाभ होतील. त्यांच्यासाठी पैसा सुद्धा खर्च करावा लागेल. वडीलधारी व स्नेहीजन ह्यांच्याशी संपर्क होऊन काही व्यवहार वाढतील. एखाद्या रम्य स्थळी सहलीस जाण्याचा बेत आखू शकाल. अचानक धनलाभ संभवतो. संतती कडून एखाद्या लाभाची अपेक्षा बाळगू शकता.
वृषभ -आज चंद्र रास बदलून कुंभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. नवीन कामाच्या योजना यशस्वीपणे आखू शकाल. नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. अपूर्ण कामे तडीस जातील. बढती मिळून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. घरात वर्चस्व राहील व आपलेपणा वाढेल. भेटवस्तू व मान - सन्मान प्राप्त झाल्याने मन प्रसन्न होईल.
मिथुन -आज चंद्र रास बदलून कुंभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा असल्याने आपल्या कामास विलंब होईल. शरीरात स्फूर्ती व मनात उत्साह असणार नाही. पोटाचे विकार सतावतील. नोकरीत वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. राजकीय अडचणी व्यत्यय आणतील. महत्वाचे काम किंवा निर्णय आज स्थगित ठेवणे हिताचे राहील. संततीशी मतभेद होतील. प्रतिस्पर्धी व विरोधक ह्यांचा त्रास होईल.
कर्क -आज चंद्र रास बदलून कुंभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आपल्या मनातील नकारात्मकता नैराश्य निर्माण करेल. बाहेरील पदार्थांच्या खाण्या पिण्यामुळे आरोग्य बिघडेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबियांशी भांडण होईल. नवे संबंध त्रासदायक ठरतील. आर्थिक चणचण भासेल. एखादी दुर्घटना किंवा शस्त्रक्रिया संभवते. मनाला शांतात लाभण्यासाठी प्रयत्न करावेत.
सिंह -आज चंद्र रास बदलून कुंभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज पती - पत्नीत किरकोळ कारणांनी खटका उडून मतभेद होतील. जोडीदाराच्या प्रकृतीची चिंता राहील. प्रापंचिक गोष्टींबाबत उदासीन राहाल. सार्वजनिक जीवनात अपयश किंवा मानभंग होण्याची शक्यता आहे. भागीदारांशी मतभेद होतील. भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास त्रासदायक ठरेल. कोर्ट - कचेरीतील प्रश्न सुटायला विलंब होईल.
कन्या - आज चंद्र रास बदलून कुंभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज आपणास शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभेल. कुटुंबातील शांती - सुखाचे वातावरण मनाला प्रसन्ना देईल. आर्थिक लाभ व कामात यश मिळेल. आजारातून मुक्त व्हाल. नोकरीत फायदा होईल. आपल्या हाता खालचे कर्मचारी व सहकारी यांचे सहकार्य मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल.