मेष -चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सहावा भावात असेल. आजचा दिवस दूरगामी आर्थिक योजनेसाठी अनुकूल असून आर्थिक व व्यावसायिक दृष्टया फायदेशीर आहे. मित्र व स्वकीयांकडून भेटवस्तू मिळतील. त्यांच्यासह आनंदात वेळ जाईल. तसेच त्यांच्यासह एखाद्या समारंभास किंवा सहलीस जाऊ शकाल. सद्भावनेने केलेले परोपकारी काम मनाला आत्मिक आनंद देईल.
वृषभ -चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशी पासून पाचवा भावात असेल. आज आपल्या बोलण्याच्या जादूने कोणी प्रभावीत झाल्याने आपलाच फायदा होईल, तसेच मधुर व सौम्य वक्तव्याने नवे संबंध प्रस्थापित व्हायला मदत होईल. विद्यार्थी अभ्यासात चांगली प्रगती करू शकतील. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. पोटाच्या तक्रारीने त्रस्त व्हाल.
मिथुन - चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशी पासून चवथा भावात असेल. आज आपल्या द्विधा मनःस्थितीमुळे आपण कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ शकणार नाही. वैचारिक वादळामुळे मानसिक अस्वस्थता अनुभवाल. अती हळवेपणा आपली दृढता कमकुवत करेल. कुटुंब किंवा जमीन या संबंधी विषयावर चर्चा किंवा प्रवास टाळणे हितावह राहील. शारीरिक व मानसिक स्वस्थतेचा अभाव राहील.
कर्क - चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशी पासून तिसरा भावात असेल. आज भावंडांकडून लाभ होतील. मित्र व स्वकीयांच्या सहवासाचा आनंद लाभेल. रम्य स्थळी सहलीस जाण्याची शक्यता आहे. प्रत्येक कामात यश मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. भावनेला प्राधान्य दिल्याने संबंध सुखद होतील. नशिबाची साथ मिळेल. सामाजिक व आर्थिक सन्मान होतील.
सिंह - चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दुसरा भावात असेल. आजचा दिवस कुटुंबियांसह सुख शांतीत घालवाल. त्यांचे सहकार्य मिळेल. स्त्री मित्रां कडून विशेष मदत प्राप्त होईल. दूरचे मित्र व स्नेही यांच्याशी संपर्क फायदेशीर ठरेल. आपल्या प्रभावी संभाषणाने लोकांचे लक्ष वेधून घ्याल. उत्कृष्ट भोजन मिळेल. नियोजित कामात यश जरा कमीच मिळेल.
कन्या - चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशी पासून प्रथम भावात असेल. आजच्या लाभदायक दिवसाने वैचारिक समृद्धी वाढेल. वाकचातुर्य व मधुरवाणी ह्यांच्या साह्याने मैत्रीपूर्ण संबंध विकसीत करू शकाल. उत्तम भोजन, भेटवस्तू, वस्त्र इत्यादींची प्राप्ती होईल. शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. आनंदाची प्राप्ती, जोडीदाराचा सहवास व प्रवास ह्यात आपला दिवस आनंदात जाईल.