मेष -आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज आपण सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल. गूढ रहस्यमय विद्येचे आपणास आकर्षण राहील. आपणाला एखादी अलौकिक अनुभूती होईल. वाणीवर संयम ठेवून अनेक गैरसमज आपण टाळू शकाल. अचानक धन लाभ होईल. हितशत्रूपासून जपून राहा. नवीन कार्यारंभ करू नका. स्त्री व पाण्यापासून जपून राहावे लागेल.
वृषभ -आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आज संसारात व दांपत्य जीवनात सुख - शांती अनुभवाल. कुटुंबीय व निकटचे मित्र यांच्या सह उत्तम भोजनाचा आस्वाद घ्याल. एखाद्या जवळच्या प्रवासाचे नियोजन कराल. प्रकृती उत्तम राहील. धनलाभ होईल. दूर राहणार्या स्नेह्यांकडून येणारी बातमी आपणास खुश करील. भागीदारीत लाभ व सार्वजनिक जीवनात मान - सन्मान मिळतील.
मिथुन -आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आजचा दिवस अपूर्ण कामे पूर्णत्वास जाण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. कुटुंबात हर्षोल्हासाचे वातावरण राहील. स्वास्थ्य उत्तम राहील. कामात यश व कीर्ती लाभेल. इतरांशी बोलताना आपल्या रागावर नियंत्रण ठेवून मितभाषी राहिल्यास मतभेदाचे प्रसंग उदभवणार नाहीत. धनप्राप्ती होईल. आवश्यक तेवढाच खर्च कराल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. नोकरीत लाभ होतील.
कर्क -आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आजचा दिवस शांततेत घालवावा लागेल. शारीरिक व मानसिक दृष्टया उद्विग्नता राहील. पोटदुखीचे विकार बळावतील. अचानक पैसा खर्च होईल. प्रेमीजनांत वाद - विवाद होऊन रुसवे- फुगवे होतील. भिन्नलिंगी व्यक्तीचे आकर्षण आपणास अडचणीत टाकेल. नवीन कार्यारंभ अथवा प्रवास न करणे हितावह राहील.
सिंह -आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आज आपणास मानसिक अस्वस्थता जाणवेल. कुटुंबीयांशी मतभेद होतील. जमीन, घर अथवा वाहनाची खरेदी किंवा खरेदीपत्र करण्यास आजचा दिवस अनुकूल नाही. नकारात्मक विचारांमुळे निराशा येईल. जलाशय धोकादायक ठरू शकतात. नोकरीत स्त्री वर्गा पासून जपून राहा.
कन्या - आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आज विचार न करता कोणतेही साहस करू नका. भावनात्मक संबंध प्रस्थापित होतील. मित्र व स्नेह्यांशी संवाद साधू शकाल. गूढ व रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील. एखाद्या विषयात प्रावीण्य प्राप्त होईल. विरोधक व प्रतिस्पर्धी ह्यांचा जोमाने प्रतिकार करावा लागेल.