महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राशीभविष्य... पाहा कसा जाईल तुमचा होळीचा दिवस... - भविष्यवाणी

जाणून घ्या आज तुमच्या राशीत काय लिहलं आहे ते...

राशीभविष्य
राशीभविष्य

By

Published : Mar 28, 2021, 6:48 AM IST

मेष रास

होळीच्या दिवशी मेष राशीच्या जातकांनी गुलाबी, लाल, पिवळा किंवा पांढऱ्या रंगाने होळी खेळावी. आपण सर्व प्रथम भगवान श्रीगणेश ह्यांना ह्या रंगांचा टिळा लावून होळी खेळण्यास प्रारंभ करावा. केमिकल युक्त रंगाने आपण होळी खेळू नये.

वृषभ रास

होळी खेळण्यासाठी आपण निळा, हिरवा, चमकदार व पांढऱ्या रंगाचा जास्त उपयोग करावा. आपण गडद लाल रंगाने होळी खेळू नये. फुलां पासून बनविण्यात आलेल्या रंगांचाच वापर आपण करावा. आपण सूर्यास अर्घ्य देऊन होळी खेळण्यास प्रारंभ करू शकता.

मिथुन रास

होळी खेळण्यासाठी आपण फिकट निळा किंवा हिरव्या रंगाचा वापर करावा. होळी खेळण्याची सुरवात आपण भगवान श्रीशंकराच्या मंदिरात जाऊन करावी. तेथे जाऊन आपण भगवान श्रीशंकर व त्यांच्या कुटुंबियांच्या मूर्तींना रंगवून भाग्योदयाची प्रार्थना करावी.

कर्क रास

आपण पांढरा, गुलाबी, लाल किंवा कोणत्याही फिकट रंगाने होळी खेळू शकता. होळी खेळण्यापूर्वी गुलाल, अबीर व हळद ह्यांचे मिश्रण भगवान श्रीविष्णुंना लावावे. त्या नंतरच आपण कुटुंबियांसह होळी खेळण्याची सुरवात करावी.

सिंह रास

आपण केशरी, लाल, गुलाबी, हिरवा किंवा फिकट पिवळ्या रंगाने होळी खेळावी. होळी खेळण्यापूर्वी सूर्य देवतेस कुंकू मिश्रित पाण्याने अर्घ्य द्यावा. त्या नंतर सर्व प्रथम आपल्या वडिलांना रंग लावावा.

कन्या रास

होळी खेळण्यासाठी आपण नैसर्गिक रंग जसे कि हिरवा, फिकट हिरवा, आकाशी किंवा समुद्राचा निळा रंग ह्यांचा वापर करावा. होळी खेळण्याची सुरवात आपण भगवान श्रीगणेश ह्यांना रंगवून करावी. त्या नंतर सर्व प्रथम आपल्या गुरूंना रंगवून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत.

तूळ रास

तूळ राशीच्या जातकांना सर्वच रंग आवडत असतात. होळी खेळण्यासाठी आपण गुलाबी, पांढरा, निळा किंवा कोणताही चमकदार रंग वापरावा. होळी खेळण्याची सुरवात आपण आपल्या वैवाहिक जोडीदारास रंग लावून करावी. आपण जर अविवाहित असाल तर एखाद्या लहान कन्येस देवी समजून तिच्या पायांना रंग लावून होळी खेळण्यास सुरवात करावी.

वृश्चिक रास

होळी खेळण्यासाठी आपण पाण्याचा वापर करू नये. वृश्चिक रास हि जल तत्वाची रास असल्याने पाण्याच्या अपव्ययामुळे आपणास नुकसान होण्याची शक्यता आहे. आपण लाल, गडद लाल व गुलाबी रंगाचा वापर होळी खेळण्यासाठी करू शकता. होळी खेळण्याची सुरवात मारुतीस सेंदरी किंवा केशरी रंग लावून करावी.

धनु रास

आपण पिवळा, फिकट पिवळा, फिकट लाल, सेंदरी किंवा केशरी रंगाने होळी खेळू शकता. होळी खेळण्याची सुरवात आपल्या गुरूंना पिवळा रंग लावून करावी. त्यामुळे आपली सौभाग्यवृद्धी होईल.

मकर रास

आपण होळी खेळताना काळ्या रंगाचा वापर अजिबात करू नये. आपण निळा, पांढरा, फिकट निळा, आकाशी व हिरव्या रंगाचा वापर करू शकता. होळी खेळण्यापूर्वी भगवान श्रीकृष्ण्याच्या मंदिरात रंग समर्पित करावा.

कुंभ रास

आपला राशिस्वामी शनि आहे. होळी खेळण्यासाठी आपण निळा, पांढरा किंवा जांभळा रंग वापरावा. आपण भगवान शनि ह्यांच्या मंदिरात निळा रंग समर्पित करून होळी खेळण्यास सुरवात करू शकता. हे जर शक्य नसेल तर भगवान श्रीशंकरास निळा रंग समर्पित करून सुद्धा होळी खेळू शकता.

मीन रास

आपण पिवळा, गडद पिवळा, गुलाबी, फिकट लाल किंवा पांढऱ्या रंगाचा वापर होळी खेळण्यास करू शकता. ह्या रंगांच्या वापराने आपल्या जीवनातील सकारात्मकता वाढीस लागेल. भगवान श्रीविष्णुंना हळद लावून होळी खेळण्यास प्रारंभ करावा.

ABOUT THE AUTHOR

...view details