महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Today Horoscope : 'या' राशींच्या पुरुषांना शुभ कार्य करण्याची मिळेल प्रेरणा; प्रणयामुळे दिवस जाईल आनंदात, वाचा राशी भविष्य - तुमची कुंडली

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 5 एप्रिलच्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

Horoscope
संग्रहित छायाचित्र

By

Published : Apr 4, 2023, 5:45 PM IST

Updated : Apr 5, 2023, 6:21 AM IST

मुंबई : जन्मकुंडलीतील 5 एप्रिल 2023 रोजीच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या कशी असतील. कसा असेल तुमचा दिवस, कशी राहील नोकरीतील स्थिती, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर कशी असेल ग्रहस्थिती, तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही' भारतवर वाचा, राशी भविष्य.

  • मेष : आजचा दिवस दूरगामी आर्थिक योजनेसाठी तुम्हाला अनुकूल असून आजचा दिवस तुम्हाला व्यावसायिक दृष्टया फायदेशीर आहे. शारीरिक, मानसिक उत्साहाचा अनुभव तुम्हाला होणार असून मित्रांकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही आज सद्भावनेने केलेले परोपकार मनाला आत्मिक आनंद देईल.


  • वृषभ : आज तुमच्या बोलण्याच्या जादूने कोणी प्रभावीत झाल्याने तुमचाच फायदा होईल, तसेच सौम्य वक्तव्याने नवे संबंध प्रस्थापित व्हायला मदत होईल. आज तुम्हाला शुभ कार्य करण्याची प्रेरणा मिळून आज तुम्हाला वाचन, लेखनासारख्या साहित्य प्रकारात अभिरुची वाढेल. कष्टाच्या मानाने यश कमी मिळत असले तरी सुद्धा आपली कामातील तत्परता, कुशलता प्रगतीस मदत होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी अभ्यासात चांगली प्रगती करून त्यांना प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल.


  • मिथुन : आज तुमच्या द्विधा मनःस्थितीमुळे तुम्ही कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ शकणार नसल्याने वैचारिक वादळामुळे मानसिक अस्वस्थता अनुभवाल. अती हळवेपणा तुमची दृढता कमकुवत करणार असून पाण्यासह इतर प्रवाही पदार्थांपासून सावध राहा.


  • कर्क : आज तुम्हाला शारीरिक, मानसिक उत्साहाबरोबर घरातील वातावरणही आनंदी राहणार असून मित्रांकडून अविस्मरणीय बेट मिळेल. मंगल कार्याची सुरूवात करायला आजचा दिवस अनुकूल असून कामातील यश आणि प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे आपण आनंदी राहाल. आर्थिक लाभ होण्यात नशिबाची साथ मिळणार असून तुम्ही आज सहलीस जाण्याचा योग आहे.


  • सिंह : आजचा दिवस तुम्ही कुटुंबासह सुखात घालवून तुम्हाला स्त्री मित्रांकडून विशेष मदत प्राप्त होईल. दूरचे मित्रांसह स्नेह्यांसोबत साधलेला संपर्क फायदेशीर ठरणार आहे. आपल्या प्रभावी संभाषणाने लोकांचे लक्ष वेधून घेऊन तुम्ही नियोजित कामात यश मिळवमार आहात.


  • कन्या : आजचा दिवस तुम्हाला लाभदायक असून आज तुमची वैचारिक समृद्धी वाढणार आहे. तुमचे वाकचातुर्य, मधुरवाणीमुळे मैत्रीपूर्ण संबंध विकसीत करू शकाल त्यामुळे उत्तम भोजनासह भेटवस्तू आदींची प्राप्ती होईल. शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य टिकून राहून आनंदाची प्राप्ती होऊन तुम्हाला आज जीवनसाथीचा सहवास लाभणार आहे.

  • तूळ : आज थोडा सुद्धा असंयम, अवैध व्यवहार तुम्हाला अडचणीत आणणार असून एखादी दुर्घटना होण्याचीही शक्यता आहे. तुमच्या बोलण्यातील शिथीलतेने उग्र तक्रार वाढवण्याची शक्यता आहे, त्यामुळे सगेसोयऱ्यांशी तुमचे पटणार नाही. मनोरंजनासह फिरण्यात पैसे खर्च होऊन भिन्नलिंगी आकर्षण प्रबळ होईल, मात्र शारीरिक, मानसिक व्यग्रता कमी करण्यासाठी तुम्हाला आज प्रयत्न करावे लागतील.


वृश्चिक :आज नोकरीसह व्यापार, व्यवसायात तुम्हाला लाभप्राप्ती होऊन मित्रांबरोबर गाठीभेटी होऊन तुम्हा प्रवास ठरवू शकाल. विवाहेच्छुक तरूण तरूणींसाठी चांगली संधी असून वाडवडील किंवा थोरले बंधू त्या लाभात निमित्तमात्र बनतील. वैवाहिक जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगून आजचा दिवस तुम्हाला मोठा यशदायी ठरणार आहे.




धनू : आज तुमच्या यश, कीर्ती व प्रतिष्ठेत वाढ होऊन नोकरीत वरिष्ठ खूश असल्यामुळे पदोन्नतीची शक्यता आहे. सरकारकडून फायदा मिळून आर्थिक योजना चांगल्या प्रकारे पूर्ण करु शकाल. व्यापारासाठी प्रवास होऊन इतर लोकांना मदत करण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या वैवाहिक जीवनात आज माधुर्य राहणार असून आज पत्नीकडून लाभ होईल.


  • मकर : आजचा दिवस बौद्धिक कार्य किंवा साहित्य लेखनासाठी तुम्हाला अनुकूल असून व्यवसायात नवे विचार प्रवाह आणल्याने आपल्या कामाला नवे स्वरूप येईल. व्यवसायातील प्रतिकूल वातावरण मनाला अस्वस्थ करत असल्याने शारीरिक थकवा जाणवून संततीच्या समस्या त्रस्त करतील.


  • कुंभ : आज निषेधात्मक, नकारात्मक विचारांपासून तुम्हाला दूर राहावे लागणार असून भांडणे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रागासह बोलण्यावर संयम ठेवून कौटुंबिक वातावरण कलुशित होणार नाही, याची काळजी घ्या. आर्थिक चणचण जाणवून खूप विचार केल्याने मानसिक थकवाही आल्याचे जाणवेल. आपल्या मनावरचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा लागेल त्यामुळे प्रकृतीची काळजी घ्या.


  • मीन : आज दैनंदिन कामातून मोकळीक मिळून बाहेर हिंडण्याफिरण्याला तुम्हाला जाण्यास मिळाल्याने मनोरंजनासाठी वेळ काढाल. कुटुंबीय आणि मित्रांना पण त्यात समाविष्ट करून गेतल्याने त्यांनाही त्याचा आनंद वाटेल. शारीरिक व मानसिक दृष्टया आज दिवसभर प्रफुल्लित राहून आज तुमची प्रतिष्ठा वाढण्याचा योग आहे.
Last Updated : Apr 5, 2023, 6:21 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details