मुंबई : जन्मकुंडलीतील 22 एप्रिल 2023 रोजीच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या कशी असतील. कसा असेल तुमचा दिवस, कशी राहील नोकरीतील स्थिती, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर कशी असेल ग्रहस्थिती, तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही' भारतवर वाचा, राशी भविष्य.
मेष: शारीरिक, मानसिक स्वास्थ्य उत्तम राहणार असून आज उत्साह, चौकसवृत्तीमुळे कोणतेही काम उत्कृष्टपणे पूर्ण करण्यात सहभागी व्हाल. कामात सहजपणे एकाग्रचित्त होऊन धनलाभ होऊन आर्थिक नियोजन सुद्धा यशस्वीपणे तुम्ही आज करू शकाल.
वृषभ :आज शारीरिक, मानसिक स्वास्थ्य साधारण राहणार असून खर्चाच्या काळजीमुळे मन अशांत राहणार आहे. वाणीवर संयम ठेवणे आवश्यक असून बाहेरचे खाणेपिणे टाळणे हितावह राहणार असून कामाच्या ठिकाणी स्त्री सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. मनात नकारात्मक विचार येऊन आर्थिक दृष्टया आजचा दिवस तुम्हाला मध्यम फलदायी असणार आहे.
मिथुन : आजचा दिवस उत्साहात, आनंदात जाऊन व्यापारात आज तुम्हाला लाभ होऊन उत्पन्नाचे स्रोत वाढतील. मित्रांशी चर्चा झाल्याचा आनंद होऊन विवाहेच्छुकांचे विवाह ठरुन शारीरिक, मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. रमणीय स्थळी सहलीचे बेत आखून पत्नीसह संततीकडून तुम्हाला आज चांगलेच सौख्य लाभेल.
कर्क : आजचा दिवस कष्टदायी असल्याने प्रत्येक काम तुम्हाला सावधपणे करावे लागून कुटुंबीय, संततीशी मतभेद होण्याची शक्यता आहे. आवेश, संतापावर नियंत्रण ठेवल्यास कामे बिघडणार नाहीत, त्यासह प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. डोळ्यांचा त्रास जाणवून तुमचा आज एखादा अपघात होऊ शकतो.
सिंह : आज तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचे चांगलेच वर्चस्व राहून वरिष्ठ तुमच्या कामगिरीने प्रभावित होऊन तुमच्यावर खूष होतील. दृढ मनोबल, खंबीर आत्मविश्वासामुळे तुमचे प्रत्येक काम यशस्वी होईल. वडिलांशी सौहार्दाचे संबंध राहून त्यांच्याकडून लाभ सुद्धा होईल, त्यासह जमीन, वाहन, संपत्ती संबंधीत कार्य करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे.