मुंबई :जन्मकुंडलीतील 28 मार्च 2023 रोजीच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या कशी असतील. कसा असेल तुमचा दिवस, कशी राहील नोकरीतील स्थिती, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर कशी असेल ग्रहस्थिती, तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही' भारतवर वाचा, राशी भविष्य.
मेष :आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी आहे. तुमचे विचार एकदम बदलून महत्त्वपूर्ण कार्यात अंतीम निर्णय घेणे जमणार नसल्याने कोणताही निर्णय न घेणे हितावह राहील. कामानिमित्त तुम्हाला प्रवास करावा लागणार असून लेखनकार्यास दिवस अनुकूल आहे. बौद्धिक आणि तार्किक विचार विनिमय होईल मात्र कोणत्याही स्त्रीशी वाद घालू नका.
वृषभ :आज चंचल मनःस्थितीमुळे हाती आलेली संधी तुम्ही गमावून बसाल. समजूतदारपणा दाखवल्यास कोणाशी संघर्ष होणार नाही मात्र प्रवासात अडचणी येण्याची शक्यता आहे. लेखक, कलाकार आणि सल्लागार याच्यासाठी दिवस अनुकूल आहे.
मिथुन : तुम्हाला आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी असून रूचकर भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. मित्र आणि कुटुंबीय यांच्या सहवासामुळे तुम्हाला मानसिक दृष्टया दिवस अत्यंत आनंददायी ठरेल. प्रकृती उत्तम राहणार असून खर्चावर मात्र नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तुम्हाला भेटवस्तू मिळाल्याने आनंद होईल मात्र नकारात्मक विचार मनात येऊ न देणे चांगले राहील.
कर्क : आज तुमची मनःस्थिती त्रिशंकू अवस्थेत गेल्यामुळे कोणताही महत्वाचा निर्णय तुम्ही घेऊ शकणार नाही. प्रापंचिक कार्यावर खर्च होऊन वाणीवर संयम ठेवणे गरजेचे आहे. मनातील साशंकता दूर करावी लागून आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
सिंह : आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायत असून स्त्रीया व मित्रवर्गाकडून लाभाची शक्यता आहे. रम्यस्थळी प्रवासाला जाल मात्र निर्णय न घेण्याच्या वृत्तीमुळे हाती आलेली संधी गमावून बसाल. महत्वाची संधी गमावल्यामुळे महत्वाचे निर्णय लांबणीवर टाकणे हिताचे राहणार आहे. विचार करण्यात खूप वेळ जाईल, मात्र आर्थिक लाभ होऊ शकतात.
कन्या :आजचा दिवस तुम्हाला शुभ फलदायी असून नव्या कार्याचे बेत तडीस जातील. व्यापारी आणि नोकरदारांसाठी दिवस अनुकूल असून व्यापारात फायदा व नोकरीत बढतीची शक्यता आहे. पित्याकडून लाभ झाल्याने घरात आनंदी वातावरण राहील.
तूळ :व्यावसायिक क्षेत्रात तुम्हाला आज लाभ होण्याची शक्यता आहे मात्र नोकरी, व्यापारात सहकारी सहकार्य करणार नाहीत. दूरवरच्या प्रवासाचे आयोजन करून लेखनकार्यात तुम्ही आज सक्रिय राहणार आहात. परदेशातील मित्र आणि नातेवाईकांकडून आनंददायी बातमी मिळेल.
वृश्चिक : आजचा तुमचा दिवस शांततेत आणि सावधानतेत घालवावा लागणार आहे. तुम्ही आज नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता असल्याने आज नवीन कामे सुरू न करणे चांगले राहील. रागावर नियंत्रण ठेवावे लागणार असून सरकार विरोधी प्रवृतींपासून दूर राहणे चांगले आहे. खर्च वाढल्याने तुमच्यावर आर्थिक संकटाची टांगती तलवार असणार आहे.
धनू :आजचा तुमचा दिवस आनंदात जाणार असून मनोरंजनाच्या प्रसंगामुळे मन आनंदी राहणार आहे. भिन्नलिंगी व्यक्तीच्या सहवासातून आनंद मिळून मित्रांसह प्रवास होण्याची शक्यता आहे. लेखनकार्यासाठी आजचा दिवस तुम्हाला अनुकूल असून भागीदारीतूनही फायदा होऊ शकतो.
मकर : आजचा दिवस तुम्हाला व्यापार आणि व्यवसायास अनुकूल असून व्यापार वृद्धी होईल. तुमचे सगळे आर्थिक व्यवहार यशस्वी होऊन घरातील वातावरण आनंदी राहील. योग्य ठिकाणीच पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. नोकरीत तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळाल्याने दिवस आनंदात जाऊ शकतो. व्यापाऱ्यांना कायदेशीर त्रास होऊन परदेशाशी व्यापार वाढण्याची शक्यता आहे.
कुंभ : तुम्ही आज कोणत्याही नवीन कामाची सुरुवात न करणे हितावह राहणार आहे. तुमच्या विचारात सतत बदल होत असल्याचे दिसून येणार असून महिलांनी बोलण्यावर संयम ठेवावा. तुम्हाला आज प्रवास शक्यतो टाळण्याची गरज आहे. संतती विषयी काळजी राहणार असून लेखन आणि नवनिर्माणाच्या कामासाठी आजचा दिवस तुम्हाला अनुकूल आहे. बौद्धिक चर्चेत सहभागी होण्याची संधी मिळून अचानक खर्च उद्भवणार आहेत.
मीन :आजचा दिवस तुमच्या मनाविरुद्ध गोष्टी घडण्याचा दिवस असल्याने त्यामुळे तुमचा उत्साह मावळेल. कुटुंबात वाद होऊन आईची प्रकृती बिघडून चिंता निर्माण होईल. मन नाराज राहणार असून स्वास्थ्य बिघडल्याने झोप लागणार नाही. स्त्रियांशी काळजी पूर्वक व्यवहार करावेत, हानी होण्याची शक्यता आहे. नोकरीतील वातावरण चिंताजनक असून स्थावर मालमत्ताच्या संबंधित दस्तावेजात काळजी घेण्याची गरज आहे.