मेष : चंद्र वृषभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी असेल. आज आपले मन चंचन झाल्याने निर्णय घेणे कठीण जाईल व त्यामुळे महत्वाची कामे आपण पूर्ण करू शकणार नाही. प्रतिस्पर्ध्यांशी सामना करावा लागेल. नवीन काम करण्याची प्रेरणा मिळेल. बौद्धिक किंवा तांत्रिक चर्चेत आपण सहभागी होऊ नये. आज छोटासा प्रवास संभवतो. आज स्त्रीयांनी आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. साहित्य लेखनासाठी आजचा दिवस चांगला असल्याने आपण आपली प्रतिभा शक्ती दाखवू शकाल.
वृषभ : चंद्र वृषभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आज मन स्थिर ठेवून काम न केल्यास चांगल्या संधी हातातून निसटून जाऊ शकतात. आज हट्ट न करता समाधानी राहिलात तर चांगले होईल. ठरविलेले प्रवास होणार नाहीत. भावंडां कडून प्रेम व सहकार्य मिळेल. कलावंत, कारागीर, व लेखक हे आपली प्रतिभा दाखवू शकतील. स्वास्थ्य उत्तम राहील. प्रतिस्पर्ध्याला पराभूत करू शकाल.
मिथुन : चंद्र वृषभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी असेल. आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी आहे. शारीरिक व मानसिक दृष्टया आपणास प्रसन्नता व उत्साह यांचा अनुभव येईल. स्वादिष्ट भोजन व चांगले कपडे घालावयास मिळतील. मित्र व कुटुंबियांसह दिवस आनंदात घालवाल. त्यांच्याकडून भेटवस्तू मिळतील. आर्थिक फायदा होईल. मनात येणार्या नकारात्मक विचारांना काढून टाकण्याचा प्रयत्न करा. दांपत्य जीवन सुखावह होईल.
कर्क : चंद्र वृषभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी असेल. आज आपणास खिन्नता व भीतीचा अनुभव येईल. कुटुंबात मतभेद झाल्याने कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण असेल. मन द्विधा झाल्याने आपण बेचैन व्हाल. बोलण्यावर ताबा ठेवा नाहीतर मतभेद होऊ शकतात. स्वास्थ्याकडे लक्ष द्या. आज खूपच खर्च होईल. गैरसमज व मानहानी संभवते. मनास शांती मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
सिंह :चंद्र वृषभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी असेल. आज व्यापारात लाभ व मिळकतीत वाढ होईल. उत्तम भोजन प्राप्ती होईल. मित्रांसह रम्य स्थळाला भेट देऊ शकता. स्त्री मित्रांचे विशेष सहाय्य मिळेल. मुलाची भेट होईल. वाडवडील किंवा मोठया भावंडांचा सहवास मिळेल. एखादा मंगल प्रसंग असू शकतो. वैवाहिक जीवन चांगले राहील. पत्नीचे सहकार्य लाभेल. आजचा दिवस नवीन वस्तू खरेदीला अनुकूल आहे.
कन्या :चंद्र वृषभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आपण नव्या कामाची जी योजना बनवली आहे ती पूर्ण होईल. व्यापार व नोकरी असलेल्यांना आजचा दिवस फायद्याचा आहे. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश झाल्याने पदोन्नतीची संधी मिळेल. पितृघराण्या कडून फायदा होईल. स्वास्थ्य चांगले राहील. कुटुंबातील वातावरण आनंदाचे राहील. पत्नीसह चांगला वेळ घालवाल. व्यावसायिक कामासाठी बाहेर जावे लागेल.
तूळ : चंद्र वृषभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज नव्या कामाची सुरूवात करण्याचा आपण प्रयत्न कराल. बौद्धिक काम व साहित्य लेखन यात गुंतून राहाल. प्रवासाची संधी मिळेल. परदेशात राहणारे मित्र व सगे सोयरे ह्यांची खुशाली समजल्याने आपण आनंदात राहाल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. संततीची चिंता लागून राहील. आज कोणत्याही चर्चेत किंवा वाद - विवादात भाग न घेणे हितावह राहील.
वृश्चिक : चंद्र वृषभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी असेल. आज आपणास प्रकृतीकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. कफ, श्वास, किंवा पोट यांचा त्रास होऊ शकतो. शरीराने व मनाने आज आपण अस्वस्थ राहाल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कोणतेही अवैध काम किंवा सरकारी काम ह्या पासून दूर राहा, नाहीतर अडचणीत याल. जलाशया पासून दूर राहा. आज खर्च खूप वाढतील.
धनू : चंद्र वृषभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस सुखशांती व आनंदात व्यतित होईल. मित्रांचा सहवास, स्वादिष्ट भोजन, नवे कपडे इत्यादी प्राप्त होतील.भिन्नलिंगी व्यक्तींचे आकर्षण वाढेल. त्यांच्याशी रोमांचक भेट होईल. विचारात स्थैर्य राहणार नाही. भागीदारीत फायदा होईल. सार्वजनिक जीवनात मान - सन्मान होतील. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.
मकर : चंद्र वृषभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी असेल. आज व्यापार - व्यवसायात मोठे यश मिळाले तरी आपण कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. व्यापार - व्यवसायाच्या दृष्टीने केलेल्या भावी योजना यशस्वी होतील. आर्थिक देवाण - घेवाणीचा व्यवहार व्यवस्थित पार पडेल. देश- परदेशात व्यवसाय असणार्याना फायदा होईल. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवू शकाल. धनलाभ संभवतो. कामात यशस्वी व्हाल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल.
कुंभ : चंद्र वृषभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपण बौद्धिक क्षमता, लेखनकार्य व नवनिर्मिती व्यवस्थित पूर्ण करू शकाल. विचार एकाच गोष्टीवर स्थिर राहणार नाहीत व त्यात सातत्याने बदल होत राहील. स्त्रीयांनी आपली वाणी संयमित ठेवावी. शक्यतो आज प्रवास टाळावेत. संतती संबंधी प्रश्न भेडसावतील. आज नवीन काम सुरू न करणे हितावह राहील. अचानक खर्च उदभवण्याची शक्यता असल्याने त्याची तरतूद करून ठेवावी.
मीन : चंद्र वृषभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी असेल. आज घर, वाहन इत्यादींची कागदपत्रे सांभाळून ठेवावी लागतील. घरातील वातावरण बिघडू नये ह्यासाठी संभाव्य वाद टाळावेत. आईचे आरोग्य बिघण्याची शक्यता आहे. धन व प्रतिष्ठेची हानी संभवते. स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे. उत्साह व स्फूर्तीचा अभाव जाणवेल. शक्यतो प्रवास टाळावेत. अपघाताची शक्यता असल्याने जलाशया पासून दूर राहावे. आज आपण अती हळवे झाल्याचा त्रास होईल.