मेष : ह्या आठवड्यात आपला आत्मविश्वास वृद्धिंगत होईल. विवाहित व्यक्ती आपल्या जोडीदारासह फिरावयास जाण्याची योजना आखतील व घरातील कामात सुद्धा एकमेकांना मदत करतील. प्रणयी जीवनात आपली कृतिशीलता कामी आल्याने आपल्या प्रेमिकेचा रुसवा दूर होईल व आपण तिच्यासह फिरावयास जाण्याचा कार्यक्रम आखाल. आपण आपल्या प्रोफाइल मध्ये सुधारणा करण्याचा खूप प्रयत्न कराल. काही नवीन ठिकाणी नोकरीसाठी मुलाखत देऊ शकाल, ज्यात आपणास यश प्राप्तीची संभावना असेल. एखादी नवीन नोकरी मिळविण्यात यशस्वी होऊ शकता. व्यापारी अत्यंत आनंदात असतील व आपल्या व्यापाराची प्रगती पाहून खुश होतील. ते ह्या दिशेने अजून सुद्धा जास्त प्रयत्न करतील. विद्यार्थ्यांना अध्ययनात काही अडथळे येतील. त्यांना एकाग्र होण्यात त्रास होईल. म्हणून त्यांना ध्यानधारणा करावी लागेल. ह्या आठवड्यात आरोग्य विषयक कोणताही त्रास होताना दिसत नसला तरी आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. आठवड्याचा अखेरचा दिवस वगळता इतर सर्व दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
वृश्चिक: हा आठवडा आपल्यासाठी आनंददायी आहे. विवाहितांसाठी आठवडा उत्तम असून दांपत्य जीवनाच्या बाबतीत आपण निश्चिन्त राहाल. एकमेकांत सामंजस्य राहील. प्रेमीजनांना मात्र काहीसा त्रास जाणवेल. त्यांच्यात सामंजस्याचा अभाव असल्याचे दिसून येईल. घरगुती खर्च व घरगुती कामे ह्यावर जास्त लक्ष राहील. जमीन - जुमल्याशी संबंधित गोष्टी आपले लक्ष वेधून घेतील. त्यासाठी भरपूर खर्च सुद्धा होईल. ह्या आठवड्यात आपण खर्चाच्या भोवऱ्यात अडकल्याचे दिसून येईल. आपल्या प्राप्तीत कपात होऊन खर्च अत्यंत तीव्र वेगाने वाढू शकतात. ह्या खर्चांवर आपले नियंत्रण न राहिल्याने आपणास त्रास होईल, तेव्हा सावध राहा. ह्या आठवड्यात कोणतेही नवीन कर्ज घेऊ नका, अन्यथा त्रास होईल. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती आपणास अनुकूल राहील. कोणाशीही वाद होणार नाही याची दक्षता घ्यावी. व्यापारात उत्तम यश प्राप्ती संभवते. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी उत्तम आहे. त्यांचे अभ्यासात मन लागून त्यांना त्याचे चांगले परिणाम सुद्धा मिळतील. ह्या आठवड्यात आपली प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. एखादी दुखापत सुद्धा संभवते. तेव्हा काळजी घ्यावी. आठवड्याचे सुरवातीचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
मिथुन: हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात प्रगती करण्याचा विचार करतील. संतती प्राप्तीची इच्छा जागृत होऊ शकते. प्रणयी जीवनात चढ - उतार येऊन सुद्धा नात्यातील प्रेम टिकून राहील. आठवड्याच्या सुरवातीस आपण मित्रांसह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकता. आपल्या शेजाऱ्यांशी आपला सलोखा राहील. आपल्या लहान भावंडांचा सुद्धा आपणास पाठिंबा मिळेल. आपल्या प्राप्तीत वाढ झाल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरीच्या ठिकाणी मात्र काही लोकांपासून आपणास सतर्क राहावे लागेल. ते आपले वरिष्ठ सुद्धा असू शकतात. कोणाशीही क्रोधीत होऊन संवाद करू नका, विषय समजून घेऊनच पुढे जावे. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. ते आपल्या कामात वेगाने प्रगती करतील. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमेल. त्याचे त्यांना चांगले परिणाम मिळतील. ह्या आठवड्यात आपली प्रकृती उत्तम राहील. असे असून सुद्धा आपणास आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. आठवड्याच्या सुरवाती पासून ते मध्या पर्यंतचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
कर्क :हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. विवाहितांना आपल्या वैवाहिक जीवनात काही नवीन अनुभव आले तरी जोडीदाराच्या वागणुकीचा आपणास थोडा त्रास होऊ शकतो. आपल्या जोडीदाराचे लहान - सहान गोष्टींवरून क्रोधीत होणे ह्यास कारणीभूत होऊ शकते. प्रणयी जीवन सुखद असेल. नात्यात दृढता राहील. एकमेकांवरील विश्वास वाढेल. आपण आपल्या प्रणयी जीवनात समाधानी असल्याचे दिसून येईल. आपणास काही नवीन काम करण्याची संधी सुद्धा मिळेल. आपली ऊर्जा वृद्धिंगत होईल. आपण काही नवीन कामे हाती घ्याल, ज्यामुळे आपण खुश व्हाल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामात मग्न राहतील, परंतु काही लोकांशी आपले मतभेद सुद्धा संभवतात. व्यापारी आपल्या कामांसाठी खूप मेहनत करतील. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी खूपच चांगला आहे. त्यांना अभ्यासात आपली प्रतिभा दाखविण्याची संधी मिळेल. ह्या आठवड्यात आपणास आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. अति श्रमाचा प्रभाव आपल्या प्रकृतीवर होताना दिसून येईल. तेव्हा काळजी घ्यावी. आठवड्याचे सुरवातीचे व मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
सिंह : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. विवाहितांना आपल्या वैवाहिक जीवनात समाधान अनुभवास येईल. खूप दिवसा नंतर आपण जोडीदाराच्या सहवासात वेळ घालवू शकाल. प्रेमीजनांना आपल्या नात्यात दृढता प्राप्त होईल. आपल्या नात्यास ईश्वरकृपा लाभल्याने आपले नाते दृढपणे प्रगती करेल. आपण आपल्या प्रेमिकेस विवाहासाठी मागणी सुद्धा घालू शकता. आपण आपल्या इच्छेनुसार काम करण्याचा प्रयत्न कराल, त्यातच आपणास फायदा व यश प्राप्त होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल. एखाद्या धार्मिक स्थळी सुद्धा जाऊ शकता. आपल्या प्राप्तीत मोठी वाढ झाल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती उत्तम असेल. व्यापारी स्वतःला अनुभवी समजून त्याच्या आधारे नवीन संपर्क स्थापित करून व्यापारात प्रगती करतील. हा आठवडा विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेत असतील त्यांच्यासाठी तर हा आठवडा अत्यंत अनुकूल आहे. ह्या आठवड्यात आरोग्य विषयक कोणतीही मोठी समस्या असल्याचे दिसत नाही. असे असले तरी आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल, तसेच आपल्या दिनचर्येत नियमितता बाळगावी लागेल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.
कन्या : हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. विवाहितांना आपले वैवाहिक जीवन सुखद असल्याचे जाणवेल. सासुरवाडी कडील लोकांशी सुद्धा सलोखा राहील. असे असले तरी लहान - सहान वाद सुद्धा संभवतात. जोडीदाराची प्रकृती उत्तम राहील. कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही ह्यासाठी आपण प्रयत्नशील राहाल. प्रणयी जीवनासाठी आठवडा सामान्यच आहे. आपली प्रेमिका आपले म्हणणे टाळणार नाही यासाठी आपण प्रयत्न कराल. ह्या आठवड्यात आपल्यात आत्मविश्वासाचा थोडा अभाव असण्याची संभावना आहे. त्यामुळे काही ठिकाणी आपल्या कामात सुद्धा खोळंबा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा सामान्यच आहे. आपण एखादे मोठे आव्हान स्वीकारून वाटचाल कराल. व्यापाऱ्यांना आपल्या व्यापारवृद्धीसाठी एखाद्या व्यक्तीच्या मदतीची आवश्यकता भासेल. विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. त्यांना आपल्या अध्ययनात अडथळ्यांना सामोरे जावे लागेल. ह्या आठवड्यात आपली प्रकृती बिघडण्याची संभावना असून आपण आजारी पडू शकता. आपली रोग प्रतिकार शक्ती कमकुवत होईल. ह्या दरम्यान शक्यतो प्रवाही पदार्थ व भाज्यांचे सेवन करावे, कि ज्यामुळे आपली प्रकृती बिघडणार नाही. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.