मुंबई : जन्मकुंडलीतील 24 मार्च 2023 रोजीच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या कशी असतील. कसा असेल तुमचा दिवस, कशी राहील नोकरीतील स्थिती, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर कशी असेल ग्रहस्थिती, तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही' भारतवर वाचा, राशी भविष्य.
मेष : आज मनाची एकाग्रता कमी होऊन मनास दुःख झाल्याने मानसिक ताण जाणवेल. गुंवणुकीतून फारसा लाभ होणार नसल्याने आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करण्याची गरज आहे. तुमच्या महत्वाच्या कागदपत्रांच्या बाबतीत अधिक काळजी घ्यावी लागून दुपारनंतर कामाचा प्रारंभ सहजपणे होईल. धार्मिक कार्ये घडतील मात्र खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.
वृषभ :आज घर आणि संतती यांच्याशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळून बालपणीच्या मित्रांच्या सहवासाने मनाला आनंद होईल. नवीन मैत्री सुद्धा होऊ शकते, त्यासह व्यावसायिक आणि आर्थिक लाभ होईल. दुपारनंतर तुम्हाला सांभाळून राहावे लागून शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडेल. गुंतवणूक करताना सावधानी बाळगा त्यासह कोर्टकचेरीची प्रकरणे सांभाळून हाताळण्याची गरज आहे.
मिथून :आजचा दिवस व्यापारासाठी शुभ फलदायी असून व्यापारी लोकांना व्यवसायवृद्धी बरोबरच यश मिळेल, येणी वसूल होतील. वडीलधार्यांकडून लाभ होऊन अर्थ प्राप्ती होऊ शकते. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल्याने काही लाभ होऊ शकतात.
कर्क :आजच्या दिवसाचा प्रारंभ मानसिक तणाव, बेचैनीने झाल्यामुळे शारीरिक दृष्ट्या आळस आणि मरगळ जाणवेल. पोटाचा त्रास होऊन कोणत्याही कार्यात नशिबाची साथ लाभणार नाही. संतती विषयक चिंता वाढली तरी, दुपारनंतर मात्र मन प्रसन्न होऊन शारीरिक उत्साह वाढेल.
सिंह : आज आचार विचारांवर संयम ठेवून अवैध गोष्टींपासून दूर राहणे चांगले राहणार आहे. मानसिक, शारीरिक त्रास वाढल्याने तुमची प्रकृती बिघडेल. अचानक धनलाभ होऊ शकते, मात्र संतती विषयक चिंता वाढल्याने निरर्थक खर्च करावा लागेल.
कन्या : आजचा सकाळचा वेळ तुम्ही मित्रांसोबत फिरणे, खाणेपिणे आणि मनोरंजनात आनंदाने घालवाल. भागीदारांशी संबंध चांगले राहून दुपारनंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल. प्रकृतीस त्रास होऊ शकते, त्यासह एखाद्या आजारावरही अचानकपणे खर्च करावा लागेल. तुम्हाला आज अचानक धनलाभ झाल्याने कुटूंबियांची काळजी काही प्रमाणात दूर होऊ शकेल.
तूळ : आज आपण दृढ मनोबलासह आत्मविश्वासामुळे प्रत्येक कामात यशस्वी होऊ शकता. कौटुंबिक जीवनात सुखशांती लाभून शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. तुमचा स्वभाव उग्र बनल्यामुळे वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. दुपारनंतर परिस्थितीत बदल होऊन आपण मनोरंजनाचा विचार करण्यात गुंतून जाल.
वृश्चिक : आज आपल्यातील मानसिक हळवेपणा वाढल्याने तुम्हाला मानसिक समतोल साधावा लागेल. अभ्यासाबाबतच्या कामात विद्यार्थ्यांना यश मिळून आपली कल्पनाशक्ती आणि साहित्य निर्मिती यात नावीन्य दिसेल. घरात सुखशांतीचे वातावरण राहिल्याने व्यवसायात यशस्वी व्हाल.
धनू : आज कौटुंबिक शांतता राखण्यासाठी निरर्थक वादविवाद टाळणे हितावह होईल मात्र आईची तब्बेत बिघडण्याची शक्यता आहे. धन, प्रतिष्ठेची हानी होण्याची शक्यता असून दुपारनंतर स्वभावातील हळुवारपणा वाढेल.
मकर : आज महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दृढ, स्थिर विचारांना अग्रस्थान द्यावे लागणार आहे. मित्र, प्रिय व्यक्तीच्या भेटीमुळे आनंद वाटून एखाद्या प्रवासाचा बेत आखू शकाल. दुपारनंतर मात्र अप्रिय घटनांमुळे आपले मन अस्वस्थ होऊन शारीरिक दृष्टया स्फूर्ती वाटणार नाही. स्थावर संपत्तीचे व्यवहार करताना सावध राहवे लागणार असून आईच्या तब्बेतीची काळजीही घ्यावी लागेल.
कुंभ : आज वाद होऊन कटुता निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे राग आणि वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. मनात नकारात्मक विचारांना थारा देऊ नका तथा खाण्यापिण्यात संयम बाळगा. दुपारनंतर वैचारिक स्थैर्य लाभून हाती घेतलेले कार्य तडीस नेऊ शकाल.
मीन : आज आपल्या घरी एखादे मंगल कार्य होण्याची शक्यता असल्याने कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. शारीरिक, मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे लागण्याची गरज असली तरी, आजचा दिवस नवीन कामे हाती घेण्यास शुभ आहे. दुपारनंतर संतापी वृत्ती वाढीस लागल्याने उक्ती आणि कृतीवर संयम ठेवावा लागेल. कुटुंबियांशी मतभेद होऊ शकतात, त्यासह मनात नकारात्मक विचार येतील.