मुंबई : जन्मकुंडलीतील 21 एप्रिल 2023 रोजीच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या कशी असतील. कसा असेल तुमचा दिवस, कशी राहील नोकरीतील स्थिती, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर कशी असेल ग्रहस्थिती, तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही' भारतवर वाचा, राशी भविष्य.
- मेष : आज तुमचे प्रत्येक काम उत्साहात आवेशांनी यांनी पूर्णतः भरलेले असल्याचा अनुभव तुम्हाला येऊन शरीर, मन स्फूर्ती आणि टवटवीतपणाने भरेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहून मित्रांसह आनंदात वेळ घालवणार आहात, त्यासह आईकडून तुम्हाला लाभ होईल.
- वृषभ : आज क्रोधासह निराशेची भावना मनात पसरुन प्रकृती साथ देणार नाही, त्यासह घर, परिवाराच्या चिंतेबरोबरच खर्चाच्या बाबतीतही चिंता राहील. तुमची उग्रवाणी कोणाशी मतभेद किंवा भांडणाचे कारण बनू शकमार असून तुमचे परिश्रम वाया जात आहेत असे वाटून गैरसमजापासून जपून राहावे लागेल.
- मिथुन : आज तुमच्या कुटुंबात खुशीचे, आनंदाचे वातावरण राहून नोकरीत लाभाच्या बातम्या मिळतील. उच्च पदाधिकारी आपल्या कामाची प्रशंसा करुन विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. स्त्री आणि स्नेह्यांकडून विशेष लाभ होऊन उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. दाम्पत्य जीवनात माधुर्याचा आनंद घेऊन संततीकडून आनंददायी बातम्या मिळण्याची शक्यता आहे.
- कर्क : आज नोकरीत वरिष्ठांच्या प्रोत्साहनाने तुमचा उत्साह द्विगुणित होऊन तुमची पगारवाढ किंवा पदोन्नती झाल्यास आश्चर्य वाटायला नको. आई तसेच इतर कुटुंबीयांशी सौहार्दाचे संबंध राहून मानप्रतिष्ठेत वाढ झाल्याने तुम्ही आनंदित होऊन तुमचे स्वास्थ्य उत्तम राहील.
- सिंह : आज आळस, थकवा व ऊबग तुमच्या कामाचा वेग कमी करुन पोटाच्या तक्रारीमुळे अस्वस्थता अनुभवण्याची शक्यता आहे. नोकरीत विघ्न संतोषी लोकांमुळे प्रगतीत अडथळा येऊन वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता असून तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
- कन्या : आज तुम्हाला मनावर संयम ठेवावा लागून स्वभावांतील अतिरागामुळे तुमचे इतरांशी मतभेद होऊ शकतात. हितशत्रू विघ्न उपस्थित करण्याचा प्रयत्न करत असल्याने नवीन कार्यारंभ लांबणीवर टाकण्याची तुम्हाला गरज आहे.
- तूळ : आज दैनंदिन कामाच्या व्यापातून जरा हलके वाटावे म्हणून तुम्ही मेजवानी, सिनेमा किंवा पर्यटनाची योजना आखून मित्रांना आमंत्रित करण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे तुम्हाला खूप आनंद होऊन नवीन वस्त्रालंकारांची खरेदी किंवा परिधान करण्याची संधी मिळेल. सार्वजनिक मानसन्मान प्राप्त होऊन वैवाहिक जोडीदाराच्या प्रेमाची उब व सहवास यामुळे तुम्ही आनंदित होण्याची शक्यता आहे.
- वृश्चिक : कौटुंबिक वातावरण आनंदासह उत्हासाने पूर्णपणे भरलेले असून शरीरात चैतन्य, उत्साह संचारणार आहे. प्रतिस्पर्धी तसेच गुप्त शत्रूंवर तुम्ही मात करू शकणार आहात. कामात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळून मित्रमैत्रिणींचा सहवास तसेच प्रणयालापामुळे तुमचा आनंद व्दिगुणित होईल.
- धनू : आज शक्यतो प्रवासाचा बेत तुम्हाला स्थगित ठेवावा लागून कार्यातील अपयश मनात नैराश्य निर्माण केल्याने तुमचा संताप वाढेल. पण हा राग नियंत्रणात ठेवल्यास गोष्टी जास्त चिघळणार नाहीत, पोटाच्या तक्रारीने तुम्हा आज हैराण व्हाल. वादविवाद किंवा चर्चामुळे समस्या निर्माण होऊन संततीची काळजी वाटेल. प्रेमीजनांना प्रेमालापासाठी आजचा दिवस अनुकूल असून धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे.
- मकर : आज उत्साह, स्फूर्तींचा अभाव असल्याने तुम्हाला अस्वस्थता वाटून मनाला चिंता लागून राहील. कुटुंबियांशी मतभेद झाल्याने तुमचे मन खिन्न होऊन वेळेवर भोजन, शांत झोप मिळणार नाही. स्त्रीयाकडून काही नुकसान होऊन काही कारणाने त्यांच्याशी मतभेद होतील, त्यासह धन, खर्च व अपयशापासून सांभाळून राहावे लागेल.
- कुंभ : आज तुम्हाला चिंतामुक्त झाल्याने जरा हायसे वाटणार असून तुमचा उत्साह आज वाढणार आहे. वाडवडील व मित्रांकडून फायद्याची अपेक्षा ठेवू शकता, त्यासह स्नेहसंमेलन किंवा प्रवासाच्या माध्यमातून कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवण्याची संधी तुम्हाला आज मिळेल. प्रिय व्यक्तीचा सहवास घडून दाम्पत्य जीवनाचा मनसोक्त आनंद तुम्ही आज उपभोगू शकाल.
- मीन : आज तुम्हाला बोलण्यावर खूप संयम ठेवावा लागणार असून रागामुळे एखाद्याशी तुमचे मतभेद होण्याची शक्यता आहे. शारीरिक कष्ट वाढून विशेषतः डोळ्यांकडे लक्ष द्यावे लागणार असून कुटुंबीय, प्रियजनांशी तुमचे मतभेद होण्याची शक्यता आहे. तुमच्या मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव होऊन खाण्यापिण्यावर तुम्हाला आज संयम ठेवावा लागेल.