Today Horoscope : 'या' राशींचे पुरुष शेअरबाजारात यशस्वीपणे करू शकतील गुंतवणूक, सृजनशील गोष्टींकडे द्याल लक्ष, वाचा राशी भविष्य
कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 19 मार्चच्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.
संग्रहित छायाचित्र
मुंबई :जन्मकुंडलीतील 19 मार्च 2023 रोजीच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या कशी असतील. कसा असेल तुमचा दिवस, कशी राहील नोकरीतील स्थिती, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर कशी असेल ग्रहस्थिती, तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही' भारतवर वाचा, राशी भविष्य.
- मेष : आजचा दिवस आपणास लाभदायी असून व्यापार आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढू शकेल. दिवसभर आनंदी आणि खेळीमेळीचे वातावरण राहणार आहे. गृहसजावटीत काही नाविन्य आणाल. घर सुशोभित करण्यासाठी व्यवस्था बदलाल. वाहनसौख्य मिळण्याची शक्याता आहे. सामाजिक कार्यासाठी प्रवास होऊन रमणीय स्थळाच्या प्रवासाचा आनंद उपभोगू शकाल.
- वृषभ : आज आपण व्यापार वृद्धीवर आपले लक्ष केंद्रित करुन नवीन योजनेच्या वापराने व्यापार प्रगतीच्या दिशेने वाढत जाईल. मात्र कामात यश मिळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. दुपारनंतर व्यापारातील परिस्थिती अनुकूल होऊ शकते. कामानिमित्त प्रवास करावा लागण्याची सुद्धा शक्यता आहे. आपल्या कामाच्या पद्धतीमुळे वरिष्ठ आपणावर खूश होतील.
- मिथून : आज आपल्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. अचानकपणे प्रवास करावा लागल्याने दुपारनंतर परिस्थितीत बदल होईल. नैराश्य दूर होऊ शकेल. लेखन वा साहित्यीक प्रवृत्तीमध्ये रस घेऊ शकाल. व्यापारात विकासाच्या दृष्टीने नव्या योजना अमलात आणू शकाल.
- कर्क : आज आपण एखाद्याशी भावनात्मक नात्याने जोडले जाण्याची शक्यता आहे. आनंदासह मनोरंजनात्मक प्रवृत्तीमुळे मन प्रफुल्लित राहणार आहे. त्यात मित्रांचे सहकार्य मिळाल्याने मनोरंजनाचा आनंद द्विगुणित होऊ शकतो. दुपारनंतर तब्बेत बिघडू शकते. वाहन जपून चालवा आणि रागावर नियंत्रण ठेवा. शब्द जपून वापरण्याची गरज आहे.
- सिंह : आजचा दिवस व्यापार विस्ताराच्या दृष्टीने आर्थिक नियोजन करण्यास अनुकूल राहणार आहे. व्यावसायिकांना त्यांच्या हाताखाली असणार्या लोकांकडून व्यावसायिक लाभ होऊ शकतात. व्याज, दलाली आदी मार्गांनी प्राप्तीत वाढ होऊन आर्थिक विवंचना दूर होईल. चांगले कपडे, स्वादिष्ट भोजन यामुळे मन प्रफुल्लित होऊ शकते.
- कन्या : आज वस्त्र आणि अलंकारांची खरेदी आनंददायी राहणार आहे. कलेत विशेष आवड निर्माण होऊन व्यापारातील विकासामुळे मनास आनंद होईल. आजचा दिवस व्यवसायासाठी अनुकूल असून प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.
- तूळ :आजचा दिवस मध्यम फलदायी असून स्थावर संपत्ती विषयक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आईच्या तब्बेतीची काळजी राहणार असल्याने कुटुंबात वाद संभवतात. दुपारनंतर स्वास्थ्य लाभून सृजनशील गोष्टींकडे लक्ष द्याल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस अनुकूल असून अभ्यासात प्रगती होईल.
- वृश्चिक : आजचा दिवस व्यावसायिकांना अनुकूल असून वैवाहिक जीवनात निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण होईल. स्थावर संपत्ती संबंधित कामाचे सुद्धा निराकरण होण्याची शक्यता आहे. भावंडांशी जवळीक साधू शकाल मात्र दुपारनंतर कामात प्रतिकूलता जाणवू शकते. शारीरिक आणि मानसिक व्यग्रता यांचा अनुभव येऊन सामाजिक क्षेत्रात अपयश येईल. कुटुंबियांशी मतभेद होण्याची शक्यता असून धनहानी होण्याची शक्यता आहे.
- धनू : आज संभाव्य मतभेद टाळण्यासाठी उक्ती आणि कृतीवर नियंत्रण ठेवावे लागेल. दिवसभर मनात गूढ आणि रहस्यमय विषयांचे विचार येतील. विद्यार्थ्यांना लेखन आणि वाचनात एकाग्रता ठेवावी लागेल. दुपारनंतर काळजी दूर होण्याचे उपाय मिळून मानसिक शांतता अनुभवाल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राहून प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.
- मकर : आज व्यवसायात अनुकूल वातावरण राहणार असून प्रत्येक कार्य विना विघ्न पार पडणार आहे. दाम्पत्य जीवनातील वातावरणात कटुता निर्माण होऊ शकते. गूढ विषयात गोडी निर्माण होऊन कार्यालयात आपला प्रभाव पडेल. दुपारनंतर मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव राहू शकतो त्यामुळे मनात निराशेचे ढग दाटतील. निर्णय शक्तीचा अभाव जाणवून घरातील कामासाठी पैसा खर्च होण्याची शक्यता. शेअरबाजारात यशस्वीपणे गुंतवणूक करू शकाल, मात्र त्याबाबत खबरदारी घ्या.
- कुंभ : आज आपल्यातील धार्मिक भावना उफाळून येऊन एखाद्या धार्मिक कार्यासाठी खर्च कराल. कोर्ट आणि कचेरीच्या कामात यश मिळून पुण्यकार्यासाठी पैसा खर्च होईल. मनःशांतीसाठी केलेल्या प्रयत्नात यशप्राप्ती होऊ शकते. दुपारनंतर आपले प्रत्येक काम सहजपणे पार पडून दाम्पत्य जीवनात गोडवा राहील.
- मीन : आज शेअरबाजार आणि सट्टा यातून काही आर्थिक लाभ होऊ शकतो. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात लाभ होऊन कुटुंबात सुखशांती लाभेल. रमणीय ठिकाणी प्रवासाला जाण्याचा योग येईल आणि मित्रांकडूनही लाभ होईल. दुपारनंतर काही कारणाने मानसिक चिंता राहू शकते तसेच धार्मिक कार्यावर अधिक खर्च होईल. प्राप्तीच्या प्रमाणात खर्चाचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता असून घरातील वातावरण शांतिदायक राहील.
Last Updated : Mar 19, 2023, 6:58 AM IST