महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 18, 2023, 6:03 PM IST

Updated : Apr 19, 2023, 6:27 AM IST

ETV Bharat / bharat

Today Horoscope : 'या' राशींच्या पुरुषांच्या प्रगतीचा मार्ग रुंदावेल, उत्तम सांसारिक सुख मिळेल, वाचा राशी भविष्य

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 19 एप्रिलच्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

Horoscope
संग्रहित छायाचित्र

मुंबई : जन्मकुंडलीतील 19 एप्रिल 2023 रोजीच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या कशी असतील. कसा असेल तुमचा दिवस, कशी राहील नोकरीतील स्थिती, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर कशी असेल ग्रहस्थिती, तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही' भारतवर वाचा, राशी भविष्य.

  • मेष : आज शारीरिक, मानसिक अस्वास्थ्याचा अनुभव तुम्हाला येऊन सर्दी, खोकला, ताप इत्यादींचा त्रास होईल. पारमार्थिक काम करताना दाम खर्च करावा लागून त्यामुळे खर्च वाढणार असून मोहाच्या प्रलोभनापासून दूर राहणे योग्य ठरेल. जमीन, घर इत्यादींच्या कागदपत्रात फसवणूक होण्याची शक्यता असून आईची प्रकृती बिघडण्यासह निर्णय शक्ती डळमळीत राहिल.
  • वृषभ : आज अयोग्य ठिकाणी पैशाची गुंतवणूक होणार नाही याकडे लक्ष द्यावे लागून आज कुटुंबात सुख व शांती राहील. कुटुंबीय व मित्रांसह आनंदात वेळ घालवल्याने उत्पन्नासह व्यापारातही वाढ होईल. रम्यस्थळी पर्यटनाला जाण्याचा बेत आखून स्त्रीकडून लाभ होऊन आज तुम्हाला आदरही मिळेल.
  • मिथुन : आज तुमचे प्रत्येक काम सुरळितपणे पार पडून घर, कार्यालय व सार्वजनिक ठिकाणी अनुकूल वातावरण राहिल्याने मनास प्रसन्न वाटेल. मानसन्मान वाढून वरिष्ठांच्या सहकार्यामुळे आपल्या प्रगतीचा मार्ग रुंदावेल. कौटुंबिक जीवनात आनंद पसरुन सांसारिक सुख उत्तम मिळेल.
  • कर्क : आज आरामदायी दिवस असून तुमचे प्रत्येक काम सहज पूर्ण होऊन नोकरीत वरिष्ठ खूश असतील. गृहसजावटी संदर्भात नवीन काही योजना आखून कामासाठी प्रवास करावा लागेल.
  • सिंह : आज तुम्हाला प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागून त्यासाठी पैसा सुद्धा खर्च होऊ शकतो, त्यासह आज घरचे पदार्थ खाणे अधिक फायदेशीर होऊ शकेल. नकारात्मक विचार मनात येतील, ते दूर करावे लागून मानसिक शांतता लाभण्यासाठी योग्य मार्गदर्शन घ्यावे व त्यासाठी प्रयत्न सुद्धा करावेत.
  • कन्या : आज तुम्हाला यश, कीर्ती सहजपणे प्राप्त होऊन व्यापारात भागीदारांशी संबंध सकारात्मक राहून वस्त्र, आभुषणे इत्यादींची खरेदी केल्याने खुश व्हाल.
  • तूळ : आज तुमचे स्वास्थ्य उत्तम राहून व्यापारात लाभ होऊन सहकार्‍यांचे अपेक्षित सहकार्य तुम्हाला आज मिळणार आहे. कुटुंबियांसह वेळ आनंदात घालवून तुम्हाला आज बोलण्यावर ताबा ठेवावा लागेल.
  • वृश्चिक : आज तुम्ही वादविवादात अडकून संतती विषयी चिंता तुम्हाला लागमार असून विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळाल्याने त्यांचा उत्साह अधिकच वाढेल. शेअर्स, सट्टा यामध्ये गुंतवणूक न करणे हितावह राहणार असून शक्य असेल तर प्रवास टाळा. भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास आजचा दिवस अनुकूल असल्याने केलेल्या कष्टाचे यथोचित यश सुद्धा मिळेल.
  • धनू : आज मन अनुत्साही असल्यामुळे मनात अशांती असणार असून कौटुंबिक वातावरण क्लेशदायक असेल. कुटुंबीयांशी मतभेद होऊन स्थावर मिळकतीचे व्यवहार करताना सावध राहावे. धनहानीसह मानहानी होऊन मातेच्या स्वास्थ्याविषयी चिंता राहील.
  • मकर : आज तुम्ही एखाद्या पर्यटन स्थळाला भेट देऊन स्थावर मिळकती संबंधीची कामे आज करू शकाल. व्यवसाय करणार्‍यांना आजचा दिवस अनुकूल असून विद्यार्थ्यांना सुद्धा अनुकूलताच लाभेल. प्रतिस्पर्धी पराभूत होऊन आज तुमचे स्वास्थ्य टिकून राहून आज तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतात.
  • कुंभ : आज तुमची द्विधा मनःस्थिती असल्याने निर्णय घ्यायला त्रास होऊन निरर्थक खर्च होणार आहे, त्यासह बोलण्यावर ताबा नसल्याने कुटुंबीयांशी मतभेद होऊ शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या वेळी मन एकाग्र होणार नसून कामे यशस्वी होण्यास उशीर लागेल.
  • मीन : आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य तुम्हाला उत्तम लाभणार असून वातावरण उत्साहपूर्ण असल्याने नवीन कामे सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असल्याने मित्रांसह कुटुंबीय यांच्यासह प्रवासास जाऊ शकाल.
Last Updated : Apr 19, 2023, 6:27 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details