मुंबई : जन्मकुंडलीतील 16 एप्रिल 2023 रोजीच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या कशी असतील. कसा असेल तुमचा दिवस, कशी राहील नोकरीतील स्थिती, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर कशी असेल ग्रहस्थिती, तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही' भारतवर वाचा, राशी भविष्य.
मेष : आजचा दिवस समाजकार्य, मित्रांसोबत धावपळीत जाऊन त्यांच्यासाठी खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. सरकारी कामात मात्र यश मिळून वडीलधारी व्यक्तींचा तुम्हाला आज सहवास लाभेल. दूरवर राहणार्या संततीकडून आनंददायी बातमी मिळून तुम्ही आज पर्यटनाला जाण्याची शक्यता आहे. अविवाहित तरुण, तरुणींचे विवाह ठरुन त्यांच्या मनाप्रमाणे जोडीदार मिळण्याची शक्यता आहे.
वृषभ : आज तुम्ही नवे काम सुरू करून यश मिळवू शकता, त्यासह नोकरदारांना आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरीत पदोन्नतीसह पगार वाढीची बातमी तुम्हाला मिळणार असून सरकारकडून लाभ मिळेल. सांसारिक जीवनात सुखशांती मिळून वरिष्ठ अधिकार्यांकडून प्रोत्साहन मिळाल्याने तुमचा उत्साह वाढणारा असेल. अपूर्ण कामे तडीस जाऊन दाम्पत्य जीवनात तुम्हाला गोडी वाटून सरकारकडून तुम्हाला आज लाभ मिळतील.
मिथुन : आजचा दिवस प्रतिकूलतेचा असल्याने तुम्हाला कामास विलंब होण्याची शक्यता असून शरीरात स्फूर्ती, मनात उत्साह असणार नाही. पोटाचे विकार सतावणार असल्याने नोकरीत वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल, त्यासह राजकीय अडचणी व्यत्यय आणतील. महत्वाचे काम, निर्णय आज स्थगित ठेवणे तुमच्यासाठी हिताचे राहून संततीशी आज तुमचे मतभेद होतील.
कर्क : आज तुमच्या मनातील नकारात्मकता नैराश्य निर्माण करुन बाहेरील पदार्थांच्या खाण्या पिण्यामुळे तुमचे आरोग्य आज बिघडेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागून कुटुंबियांशी आज तुमचे भांडण होऊन नवे संबंध त्रासदायक ठरतील. आर्थिक चणचण भासून एखादी दुर्घटना होण्याची शक्यता असून मनाला शांतात लाभण्यासाठी तुम्हाला आज प्रयत्न करावे लागणार आहेत.
सिंह : आज पतीपत्नीत किरकोळ कारणांनी खटका उडून मतभेद होण्याची शक्यता असून जोडीदाराच्या प्रकृतीची चिंता तुम्हाला आज सतावत राहील. प्रापंचिक गोष्टींबाबत उदासीन राहून सार्वजनिक जीवनात तुम्हाला अपयश येऊन मानभंग होण्याची शक्यता आहे. भागीदारांशी मतभेद होऊन भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवासही आज तुम्हाला त्रासदायक ठरणार असल्याने काळजी घेण्याची गरज आहे.