महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Horoscope : 'या' राशींच्या पुरुषांना अचानक धन लाभ होण्याची शक्यता, खुश राहाल, वाचा राशी भविष्य - उद्याचा दिवस

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन 14 मार्च रोजी चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. उद्याची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 14 मार्चच्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

Horoscope
संग्रहित छायाचित्र

By

Published : Mar 13, 2023, 7:20 PM IST

Updated : Mar 14, 2023, 7:17 AM IST

मुंबई :जन्मकुंडलीतील 14 मार्च 2023 रोजीच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या कशी असतील. कसा असेल तुमचा उद्याचा दिवस, कशी राहील नोकरीतील स्थिती, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर कशी असेल ग्रहस्थिती, तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही' भारतवर वाचा, उद्याचे राशी भविष्य.

मेष : आज चंद्र वृश्चिक राशीत असून तुमच्या राशीपासून तो अष्टमात स्थानावर आहे. आज तुम्ही सांसारिक गोष्टी बाजूला ठेवून तुम्हाला गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील. आज तुम्हालाल एखादी अलौकिक अनुभूती होण्याची शक्यता आहे. वाणीवर संयम ठेवल्याने तुम्ही गैरसमज टाळू शकाल. अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. हितशत्रूपासून जपून राहण्याची गरज आहे. नवीन कार्यारंभ धोकादायक ठरू शकतात. स्त्री व पाण्यापासून जपून राहण्याची गरज आहे.



वृषभ : आज चंद्र वृश्चिक राशीत असून तुमच्या राशीपासून तो सातव्या स्थानावर आहे. आज तुमचे दाम्पत्य जीवन आनंदी असेल. छोटा प्रवास केल्यामुले दिवस आनंदात जाण्याची शक्यता आहे. नातेवाईकांसह उत्तम भोजनाचा आस्वाद घेता येईल. मित्रांकडून चांगली बातमी कळेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यापारात यश येईल . सामाजिक क्षेत्रात यशासह प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे.


मिथून :आज चंद्र वृश्चिक राशीत असून तुमच्या राशीपासून तो सहाव्या स्थानावर आहे. आजचा दिवस यश व कीर्ती मिळवण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. घरात सुखशांतीचे वातावरण राहणार आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. तुम्हाला आज आर्थिक लाभाची शक्यता आहे. खर्च होईल पण तो अनावश्यक वाटणार नाही. अडलेली कामे पूर्ण होण्याचा मार्ग सापडणार आहे. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. स्वभावातील रागावर आवर घालण्याची आवश्यकता आहे.


कर्क : आज चंद्र वृश्चिक राशीत असून तुमच्या राशीपासून तो पाचव्या स्थानावर आहे. आजचा दिवस अगदी शांततेत जाण्याची शक्यता आहे. तुमच्या शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैन राहल. अचानक खर्च उद्भवतील. प्रणयी जीवनात वाद होऊन मतभेद होण्याची शक्यता आहे. भिन्नलिंगी व्यक्तींकडे आकर्षित झाल्याने संकटात सापडू शकता. आज यात्रा, प्रवास आणि नवीन कामाची सुरुवात करणे हानिकारक ठरू शकते.


सिंह :आज चंद्र वृश्चिक राशीत असून तुमच्या राशीपासून तो चवथ्या स्थानावर आहे. आज नकारात्मक विचार नैराश्य निर्माण करण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला शारीरिक व मानसिक तणाव जाणवेल. घरात विसंवादाचे वातावरण राहणार आहे. आई - वडिलांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यांची प्रकृती बिघडू शकते. जमीन, घर, वाहन खरेदी विषयक कागद पत्रांसंबंधी सावध राहण्याची गरज आहे. जलाशयापासून दूर रहा. भावनेच्या भरात वाहवत जाऊ नका, अन्यथा हानी होण्याची शक्यता आहे.


कन्या : आज चंद्र वृश्चिक राशीत असून तुमच्या राशीपासून तो तिसऱ्या स्थानावर आहे. आज तुम्ही अविचाराने कोणतेही काम करण्यापासून दूर रहा. कामात यश मिळेल. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. भावंडे व शेजारी यांच्याशी चांगले संबंध राहतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. प्रियजनांचा सहवास लाभू शकतो. समाजात मान सन्मान मिळेल. चित्तवृत्ती प्रफुल्लित राहण्याची शक्यता.


तूळ : आज चंद्र वृश्चिक राशीत असून तुमच्या राशीपासून तो दुसऱ्या स्थानावर आहे. आज तुमचा हट्टीपणा सोडून समाधानी वृत्तीने काम करण्याची गरज आहे. तुमच्या वायफळ वाणीने कोणाशी मतभेद निर्माण होतील. दोलायमान स्थितीत अडकलेले मन ठोस निर्णय घेऊ देणार नाही. आज शक्यतो महत्त्वाचा निर्णय घेऊ नये, हानी होईल. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.



वृश्चिक : आज चंद्र वृश्चिक राशीत असून तुमच्या राशीपासून तो प्रथम स्थानावर आहे. आज तुम्ही तन - मनाने खुश व ताजेतवाने राहाल. कुटुंबीय व मित्रांसह उत्तम भोजन, प्रवास, मनोरंजन होण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी जवळीक वाढणार आहे. आर्थिक लाभ होऊ शकतो. मंगल कार्यानिमित्त बाहेर जावे लागेल. आनंददायक बातमी मिळेल.



धनू : आज चंद्र वृश्चिक राशीत असून तुमच्या राशीपासून चंद्र बाराव्या स्थानावर आहे. आजचा दिवस कष्टदायक असू शकतो. प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. कुटुंबियांशी कटकट झाल्याने मन दुःखी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मानसिक दृष्टया सुद्धा अस्वस्थ राहू शकता. रागावर जरा अंकुश ठेवण्याची गरज आहे. एखादा अपघात होऊ शकतो. कोर्ट - कचेरीतील प्रकरणांपासून सावध राहा. अधिक खर्च झाल्याने पैशाची चणचण भासू शकते.


मकर :आज चंद्र वृश्चिक राशीत असून तुमच्या राशीपासून तो लाभात स्थानावर आहे. आजचा दिवस नोकरी, व्यवसाय शुभ फळ देणारा आहे. मित्र आणि नातेवाईकांसह फिरायला जाऊ शकता. मंगल कार्यात हजेरी लावण्याचा योग आहे. मैत्रिणी, पत्नी व संतती यांच्याकडून लाभ होऊ शकतो. विवाहोत्सुक युवक - युवतींचे विवाह ठरण्याची शक्यता आहे. प्रवास व सहल होऊ शकतो.


कुंभ : आज चंद्र वृश्चिक राशीत असून तुमच्या राशीपासून चंद्र दशमात स्थानावर आहे. आज तुमचे प्रत्येक काम निर्विघ्नपणे पूर्ण झाल्याने तुम्ही खुश व्हाल. नोकरीत तुम्हाला अनुकूल परिस्थिती राहील. तुम्ही केलेल्या कार्यात यश मिळेल. वडीलधारी व वरिष्ठ अधिकारी यांची मर्जी असल्याने कोणत्याही प्रकारच्या मानसिक दडपणातून मुक्त होऊ शकाल. संसारात आनंद वाटेल.


मीन : आज चंद्र वृश्चिक राशीत असून तुमच्या राशीपासून चंद्र भाग्यात स्थानावर आहे. नकारात्मक विचार वरचढ होणार नाहीत याची काळजी घ्या. मानसिक अस्वास्थ्य सतावणार आहे. आरोग्याची तक्रार राहील. नोकरीत वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. संततीच्या समस्या ताण वाढवतील. प्रतिस्पर्धी वरचढ होण्याची शक्यता आहे. आज शक्यतो कोणताही महत्वाचा निर्णय न घेणेच योग्य आहे.

Last Updated : Mar 14, 2023, 7:17 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details