मेष : 14 ऑगस्ट 2023 सोमवार आज चंद्र कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपले मन अधिक संवेदनशील बनेल. त्यामुळे कोणाचे बोलणे किंवा वागणे यामुळे मनाला दुःख होईल. मानसिक भीती बरोबर शारीरिक अस्वस्थतेमुळे आपण बेचैन व्हाल. आईचे स्वास्थ्य खराब असेल. वाहन चालविताना सावधानी बाळगा. आज महत्वाचा व्यवहार करू नका. कार्यालय किंवा अन्य ठिकाणी स्त्री वर्गाकडून नुकसान होऊ शकते. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी मध्यम फलदायी आहे.
वृषभ : 14 ऑगस्ट 2023 सोमवार आज चंद्र कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज चिंतेपासून मुक्तता मिळाल्याने आपण स्फूर्ती व उत्साह अनुभवाल. हळवेपणा व काल्पनिकता यांच्या जगात वावराल. आपल्या अंतर्गत कला व साहित्य बाहेर येण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबीयांकडे चांगले लक्ष राहील. मित्रांसह प्रवास ठरवाल. आर्थिक गोष्टी पूर्ण होतील. आवडीचे भोजन मिळेल. नशिबाची साथ लाभेल.
मिथुन :14 ऑगस्ट 2023 सोमवार आज चंद्र कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज आपणास कामात सफलता मिळेल, फक्त थोडा उशीर लागेल. तरीही प्रयत्न सुरू ठेवून ती पूर्ण करू शकाल. आर्थिक कामात अडथळे दूर होऊन मार्ग मोकळा सापडेल. नोकरी - व्यवसायात बरोबरचे कार्यकर्ते किंवा सहकारी यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.
कर्क : 14 ऑगस्ट 2023 सोमवार आज चंद्र कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपणास शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल. मित्र व स्वजन यांच्यासह आजचा दिवस खूप आनंदात व उल्हासात जाईल. आपले मन अगदी संयमी राहील. वैवाहिक जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगू शकाल. प्रवासाची व आर्थिक लाभाची शक्यता आहे.
सिंह :14 ऑगस्ट 2023 सोमवार आज चंद्र कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज मनास चिंता लागून राहिल्याने स्वास्थ्य बिघडेल. उग्र स्वभावाने किंवा वाद - विवादामुळे कोणाबरोबर संघर्ष होईल. कोर्ट - कचेरीच्या कामात सावधपणे पाऊले टाका. भावनेच्या प्रवाहात वाहत जाऊन काही अविचारी काम हातून घडणार नाही याकडे लक्ष द्या. वाणी व व्यवहार ह्यात संयम व विवेक राखावा.
कन्या :14 ऑगस्ट 2023 सोमवार आज चंद्र कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस तन मनाच्या स्वस्थते बरोबर आपणास विविध लाभ मिळवून देईल. व्यापारात व नोकरीत आर्थिक लाभ होईल. वरिष्ठ आपल्यावर खूष झाल्याने पदोन्नतीची शक्यता आहे. विवाहोत्सुकासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. स्त्री मित्र लाभदायक होतील. निसर्ग सौंदर्य स्थळी पर्यटन होईल. वैवाहिक सुखाचा मनसोक्त आनंद मिळवाल.
तूळ : 14 ऑगस्ट 2023 सोमवार आज चंद्र कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज आपली कामे सहजतेने पूर्ण होतील. मान - सन्मानात वाढ होईल. कार्यालयात वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळाल्याने आपला आत्मविश्वास वाढेल. व्यापार्यांच्या व्यापारात तसेच मिळकतीत वाढ होईल. कौटुंबीक जीवन आनंदपूर्ण राहील. स्वास्थ्य चांगले राहील. उत्तम सांसारिक सुख प्राप्त होईल.
वृश्चिक : 14 ऑगस्ट 2023 सोमवार आज चंद्र कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आळस, थकवा व चिंता यामुळे कामाचा उत्साह मंद पडल्याचे जाणवेल. विशेषतः संततीची आपणास चिंता वाटेल. कार्यक्षेत्रात सुद्धा अधिकारी वर्गाचे नकारात्मक वागणे आपणास हताश बनवेल. प्रतिस्पर्धी व विरोधक यांची ताकद वाढेल. व्यवसायात संकटे येतील. आज महत्वाचे निर्णय घेऊ नका.
धनू :14 ऑगस्ट 2023 सोमवार आज चंद्र कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. अनपेक्षित घटना, आजारपण, राग यामुळे आपला मानसिक व्यवहार हताश झालेला असेल. म्हणून रागावर नियंत्रण ठेवावे. सरकार विरोधी प्रवृत्ती घातक ठरेल. काही कारणाने वेळेवर भोजन मिळणार नाही. खर्चावर नियंत्रण ठेवा. भांडण - तंट्या पासून दूर राहा.
मकर : 14 ऑगस्ट 2023 सोमवार आज चंद्र कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस कामाचा व्याप व मानसिक ताण यातून सुटका होऊन मित्र व संबंधितांसह आनंदात व्यतीत कराल. भिन्नलिंगी व्यक्तिंचे आकर्षण वाढेल. उत्तम वैवाहिक सुख प्राप्त होईल. व्यापारी आपल्या व्यापाराचा विस्तार करू शकतील. आर्थिक लाभ व मान - सन्मान ह्यात वृद्धी होईल. स्वास्थ्य उत्तम राहील. प्रिय व्यक्तीचा सहवास व एखादा प्रवास आपल्या आनंदात भर घालू शकेल.
कुंभ :14 ऑगस्ट 2023 सोमवार आज चंद्र कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज आपल्याला कामात यश मिळेल. कुटुंबियांशी अधिक स्नेहाचे व्यवहार होतील. शारीरिक व मानसिक स्वस्थता मिळेल. नोकरी - व्यवसायात सहकारी सहकार्य करतील. घरात आनंद व उत्साहाचे वातावरण राहील.
मीन : 14 ऑगस्ट 2023 सोमवार आज चंद्र कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपली कल्पना शक्ती खुलून उठेल. साहित्य निर्मितीसाठी देखील आजचा दिवस अनुकूल आहे. विद्यार्थी अभ्यासात उत्तम प्रगती करू शकतील. आपल्या स्वभावात हळवेवणा राहील. पोटाच्या आजाराची शक्यता आहे. मनात एखादी अनामिक भीती निर्माण होईल. मानसिक संतुलन बिघडू देऊ नका. आजचा दिवस प्रणयाराधनेसाठी अनुकूल आहे.
हेही वाचा :
- Panchang Today : सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, शुभ मुहूर्त, राहुकाल तिथी, वाचा आजचे पंचांग
- Horoscope Today : या राशींच्या व्यक्तीना उत्पन्नाच्या नवीन संधी उपलब्ध होतील, वाचा राशीभविष्य
- Love horoscope Today : या राशींच्या व्यक्तींच्या प्रेम जीवनात सकारात्मकता राहील; वाचा लव्हराशी